Saturday, February 25, 2012

मयुरटीका................हल्लीची राजनिती ..........!!! (ही वात्रटिका नव्हे........तर ही आहे मयुरटीका)


हल्लीची राजनिती ..........!!!

जाऊ तिथे खाऊ,
आम्ही बोम्बलत राहू......
आमच्या विरोधात जाईल त्याला,
यमसदनाला धाडू........

हीच आमची निती,
हीच आमची कृती.......
ह्यालाच म्हणतात,
हल्लीची राजनिती......

वल्गना......!!!

ऐका हो ऐका,
येदियुरप्पांची वल्गना ऐका.....
येत्या सोमवारपर्यंत,
मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाही दिली मला.....
तर सगळ्या माझ्या पाठीराख्यानो,
सदानंद गौडांवर बहिष्कार घाला....
केंद्रीय नेत्यांना आहे ही सूचना,
नाहीतर काहीतरी अघटीत घटेल घटना......

निवडणूकीचे राजकारण........!!!

निवडणूक आली
आणि आरसा दाखवून गेली,
प्रत्येकाच्या पदरात माप
टाकून गेली,
कोणालाच नाही दिले
तिने निर्विवाद संख्याबळ,
नाशिकसारख्या ठिकाणी,
सगळ्यांना मिळाले एकसारखे बलाबल,

मुंबईत ठेवले बी.जें.पी.ला लांब,
नाशिकमध्ये बी.जें.पी.म्हणाली आता थोडे थांब,
गडकरीबरोबर झाले राजकारणाचे मनोमिलन,
गडकरींच्या मिस-कनेक्शन मागे, नाशिकचे राजकारण
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स मधील मथळा)

मयुर तोंडवळकर .............9869704882

Thursday, February 9, 2012

मयूर टीका ........!!! काश्मीर कि कली ........!!!

काश्मीर की कली
आली आली थंडीची लाट आली,
काश्मीर की कली मुंबईत अवतरली.....(१)

थंडीच्या लाटेचा झाला रेकॉर्ड ब्रेक,
चला जाऊया, फिरुया आणि करुया मनालीचा ट्रेक......(२)

मनालीच कशाला हवी,
थंडीच आहे सर्वत्र हावी.......(३)

थंडीच्या या लाटेत सगळे झाले गप्प,
सार्-या जगातच सगळीकडे जीवन झाले ठप्प.......(४)

थंडीचा कहर.........!!!

चित्रात पाहतो आहे थंडीचा परिणाम,
सगळीकडेच असते खाली आलेले तपमान.......

तपमान खाली येताच गोठू लागते जनजीवन,
नाशिकात दवबिंदूंचे बर्फात होते अवतरण,

मुंबईत वाजू लागताच गारेगार थंडी,
आपोआपच बाहेर पडतात स्वेटर आणि बंडी,

सा-या जगभरच झाला थंडीचा कहर,
जनजीवन गेले गोठून, निसर्गाला येईना बहर.......!!!

मयुर तोंडवळकर ..............9869704882

Sunday, February 5, 2012

मयुरटीका ...........!!!

बे सहारा........!!!
जडेजाला केला सलाम,
तर लक्ष्मणला रामराम......
सहाराने मात्र ‘टीम इंडिया’चे प्रायोजकत्व सोडून,
बी सी सी आयला दिले अंधारात लोटून.......(१)

अनेक श्रीमंत सहाय्य करण्यासाठी पाहिले येताना धावून,
म्हणून म्हणाले, आम्ही जड अंत:करणाने घेतो प्रायोजकत्व काढून.......
आता बरेच जण येताहेत नविन करण्या करारा
दोघांच्या वादामध्ये ‘टीम इंडिया’ झाली मात्र बे’सहारा......(२)  

डी सीलोकलची अखेर......!!!

८४ वर्षे ईमानेइतबारे उत्तम सेवा दिली,
मुंबईची जीवनवाहिनी लोकल आता डी सीची ए सी झाली,,,,,,,,

याचा फायदा असा होईल, जीवनवाहिनी आता फारच गतीने जाईल,
सबस्टेशनची संख्या कमी होऊन, देखभालीचा खर्चही कमी होईल........

पर्यायाने उर्जेत प्रचंड बचत होऊन, कोट्यावधी रुपयांची बचत होईल,
इतकेच नव्हे तर, दररोजच्या लोकलची संख्या वाढून सगळेचजण धावू मात्र लागतील......

प्रवाशांनी सोहळा साजरा करून, डी सीलोकलला अखेर केला रामराम,
इथेच न थांबता, त्यांनी ए सी लोकलला दिला आपला सलाम............!!!

मयुर तोंडवळकर ....................9869704882

Wednesday, February 1, 2012

मयूर टीका ........!!!


रेकॉर्ड ब्रेक .........!!!
मुंबईत थंडीने रेकॉर्ड ब्रेक काय केला,
राजकारण्यांच्या रथाला बंडखोरांनी बंड करून ब्रेकच लावला.....(१)
सगळेच जुने पक्ष झाले होते बंडाने बेजार,
त्यातच नव्या पक्षाने म्हटले मी मात्र नाही घेणार माघार.......(२)
हे सारे खोटे ठरविण्यासाठीच की काय,
बंडखोर नाराजानी त्यांना केले बाय – बाय.......(३)

बंडखोरीचे वारे (1)........!!!
नाराज बंडखोरांच्या बंडखोरीचे,
वाहू लागले बोचरे वारे.........
मी मी म्हणाणा–या राजकीय नेत्यांच्या
डोळ्यासमोर चमकून गेले तारे ......(१)
असंत्तुष्टांची नाराजी दूर कशी करावी हे समजेनासे झाले ............
त्यासाठी नेतेच काय, त्यांच्या घरादाराचे धाबे सुद्धा दणाणले.....(२)

बंडखोरीचे वारे (२)..........!!!
बंडखोरांच्या बंडखोरीचे वारे वाहू लागले,
निवडणुकीच्या रिंगणात आता रंग भरू लागले,
त्यातच राजकीय पक्षांचे तीन तेरा वाजले...........(१)
कोणाचे आहे घड्याळ......
तर कोणाचा तिरंगा हात.........
कोणाचे सुटले तीरकमान..........
तर कोणाचे सुटले इंजिन सुसाट..........(२)
मयुर तोंडवळकर ...........9869704882

अनगडवाणी