सेवेक-यानी परोपकार जरूर करावा, परंतु सर्व सर्वप्रथम स्वत:ची मानसिक शक्ति अजमावून परोपकार करावा. जीवात्मा ह प्रत्येक अणु रेणूत भरलेला आहे. मानवाने दानशूर होण्यापेक्षा स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. ही जीवशक्ति अनन्तानी, सतानी प्रत्येक प्राणीमात्रात फेकलेली आहे. मन हीच या शक्तीची मेख आहे. ते सत् सांगते, अनंत सांगतात कि तुझे मनच तू माझ्या ठिकाणी लय कर. कृष्णानी देखील पार्थाला हेच सांगितले कि हे पार्था तू तूझे मन माझ्यातच लय कर. परंतु सेवेकरी काय करतात तर् "वाटता जडभारी, मग आठवावा श्रीहरी," ते म्हणतात "काही प्रसंग आलाच तर् सद्गुरूंची आठवण करुया नाहीतर त्यांना उगाच कशाला त्रास द्या." सेवेक-यानो तुम्हीच सांगा भक्त आणि भगवंत एक आहेत का हो? जर भगवंतच भक्ताच्या हृदयात वास करीत आहेत तर ते वेगळे असू शकतील का? परंतु आम्हाला काय वाटते, भगवंत वेगळा आणि मी वेगळा. आपल्यात्त ते वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आपणाला कल्पना आहे कि जर अद्वैत गती प्राप्त करायची असेल तर् मनाची ठेवण सत् शुद्ध पाहिजे. जर हेतुरहित असेल तर् त्याला आत्मज्ञान म्हणजे शुभ्रप्रकाश तो पाहू शकेल. परंतु मन जर हेतुरहीत नसेल तर आत्मज्ञान होणे दुरापास्त आहे. आपले सेवेकरी याची जान घेत नाहीत की आपले सद्गुरू आपणाला तळमळीने परमोच्च गतीपर्यंत समजाउन सांगतात पण ते ऐकायाचे आणि सोडून द्यायचे. "मी तू रहीत होणे म्हणजेच सत्मय होणे, म्हणजेच सद्गुरूमय होणे." आता आपल्याला सद्गुरुनी तळमळीने अमृत पाजले तर ते अमृत प्राशन करून सेवेक-यानी शक्तिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सेवेकरी काय करतात जिथे ऐकतात तिथेच सोडून मोकळे होतात. सद्गुरू प्रणवाचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरू प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेक-याना आपल्या अमृततुल्य बोलानी समजाऊन सांगतात. जर सद्गुरुनी सांगितलेल्या प्रणवाप्रमाणे जर आपण मार्गस्थ झालात तर सद्गुरुना देखील मनोमन समाधान वाटते. पण जर हेच जर त्या अमृततुल्य बोलांकडे दुर्लक्ष केले तर सद्गुरुना काय वाटेल? आणि जर सेवेक-याना कोणताही त्रास होउ लागला, त्यांच्यावर कोणता प्रसंग ओढवला, मग सेवेकरी गयावया कोठे करणार? सद्गुरुंकडे. मग सद्गुरुंनी काय करावे? म्हणून सांगतो मी तू रहीत होण्याचा प्रयत्न करा कारण ही अत्यंत कठीण, दुरापास्त गोष्ट आहे.
मी तू रहीत होणे म्हणजे सत्-मय होणे. जे काही आपले सद्गुरू सांगतील ते ब्रह्मवाक्य! दूसरे मी काही जाणत नाही. अशी सेवेक-यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविकास प्रत्येक सेवेक-यांच्या मनाची धारणा असली पाहिजे. असा आत्मविकास प्रत्येक सेवेक-यानजवळ असायला पाहिजे. सद्गुरूंचे वाक्य जर
सेवेक-याने प्रमाण मानले नाही तर् कोणाचे वाक्य प्रमाण मानावे? मी तू रहीत होणे म्हणजेच अद्वैत ! हे होण्यासाठी सेवेक-यांनी मनाने सत्मय होणे आवश्यक आहे. मन एकदा सत्मय झाले की सर्वस्व सत्मय झालेच म्हणून समजा. म्हणून सद्गुरूंच्या ठायी, सत् चरणांवर मन अर्पण करताना कसे असले पाहिजे तर् ठाम !
सेवेक-यांच्या मनात ही भावना सदैव असली पाहिजे, मी सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू माझे आहेत.
सद्गुरूंचा जो सेवेक-यानवर विश्वास असतो त्याची परिपूर्तता करणे प्रत्येक सेवेक-याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा जाउ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सेवेक-याची आहे. एखादा सेवेकरी विचित्र त-हेने जाउ लागला, वागू लागला तर मात्र सद्गुरू त्यावर नाराज होतात. पण सेवेक-यांसाठी सद्गुरू सदैव खालीवर होतात. त्यांच्या मनात सेवेक-यानबद्दल तळमळ असते. भक्त आणि भगवंत वेगळे आहेत का? हे समजण्यावर आहे. सेवेकरी कसा पाहिजे तर सत् शुद्ध आणि ठाम ! माझे सद्गुरू सांगतील तेच प्रमाण त्यावेगळे दूसरे काही नाही अशी त्याच्या मनाची ठाम धारणा असली पाहिजे. सेवेक-यावर एकदा प्रसंग आला, आपत्ती आली तर सद्गुरू असे म्हणतात का, "मला तुझ्या संसाराशी काय घेणे देणे आहे? तूझे तूच बघ." वेळ प्रसंगी सद्गुरू धाव घेत नाहीत असे कधी झाले आहे का? सर्वात प्रथम सेवेक-यासाठी धाव घेत नाहीत असे कधी झाले आहे का? सर्वात प्रथम सेवेक-यासाठी धाव घेणारे सद्गुरू असतात, भक्तांसाठी भगवंतच धाव घेतात. माया नाही. आप्तस्वकीय जबाबदारी पडल्यावर दूर जातात, दूर लोटतात. परंतु कितीही जबाबदारी पडली तरी सद्गुरू मात्र सेवेक-याला दूर लोटत नाहीत. मग अशा सद्गुरूंच्या ठिकाणी का ठाम राहू नये? का अद्वैत राहू नये? सेवेक-याला प्रसंगातून सोडविण्यासाठी जीवाचे रान करतात, संतांनीच सांगितले आहे की तू अद्वैत हो, सर्वस्व सद्गुरू चरणांवर अर्पण कर. हे केल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की आत्मज्ञान तुझ्यापासून दूर नाही. परंतु होत नाही याला कारण माया! ज्यांना आपण माझे म्हणतो, ते कोणीही तुला आत्मज्ञान दाखवू शकणार नाहीत. मानवाने, सेवेक-यांनी परोपकार जरूर करावेत पण कसे तर चंदनासारखे चंदन स्वत: झिजते आणि झीजताना दुस-याला सुगंध देते. परंतु या मायावी स्थितीत कितीही जरी झीजलो तरी सुगंध स्थिती येते का हो?
Mayur Tondwalkar
No comments:
Post a Comment