*आत्मविश्वास*
शब्द किती सोपा.
असे कां बरे म्हटले जाते?
काय असेल बरे हा शब्द?
आत्मविश्वास हा एकच शब्द आहे की हा संधी आहे.
या शब्दाची फोड करावयाची झाल्यास हा संधी देखील होऊ शकतो. जसे, खालीलप्रमाणे लिहिले, तर......
*आत + मधील + विश्वास*
येणे स्वत:च्या आत असणारा म्हणजे आत मनामध्ये असणारा विश्वास.
हा आत्म्याचा विश्वास होऊ शकत नाही, कारण आत्म्याला म्हणजे आपल्यात आत असणारी मा अर्थात ज्योत, जी बिंदू स्वरुपी असून, तिचा या पंचमहाभूताच्या देहाशी तसे पाहिले तर काही एक संबंध नसतो. परंतु तो आत्मा जर त्या पंचमहाभूताच्या देहात नसेल तर पंचमहाभूताचा देह हा असून नसल्यासारखाच असतो.
पंचमहाभूतांचा देह हा सदा न कदा मनाच्या ओढणीने कार्यरत असतो, त्यामुळे तो मायेत असतो. परंतु आत्मा हा स्वयं असतो. ना तो कोणाच्या इशा-याने चालत, ना कोणाच्या आदेशाने हलत. तो स्वतंत्र आहे.
हा ! तो चालतो फक्त नामाच्या गतीने. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम.
जो भक्त नेहमी सदा न कदा, त्या भगवंताच्या, त्या सताच्या, त्या सद्गुरुंच्या, त्या ओंकारांच्या, त्या अनंतांच्या नामस्मरणात दंग असतो, त्या भक्ताचा त्याच्या *आत मधील विश्वास* हा कसा असणार, तर तो *आत्मविश्वासपूर्णच* असणार नाही कां?........अनगड