Friday, September 30, 2016

उरीवरचा हल्ला

उरी वरचा हल्ला
उरावरच बसला
वाटले उगाच हल्ला केला
उरच बड़वूनी घेतला

उरी वरचा हल्ला
महागातच पडला
आतंकवादीयांचा रखवाला
सा-या जगासमोर
   उघड़ाच की हो पड़ला

उरी वरचा हल्ला
बोबड़ीच वळवूनी गेला
वाटले नव्हते मजला (पाक)
माझ्यावरीच (पाक) तो उलटला

उरी वरचा हल्ला
माझ्या उरातच की हो घुसला
सा-या जगताने त्याला
उचलूनीच की हो धरला

उरी वरचा हल्ला
नव्हती कल्पना कुणाला
आतंकवादीयांचा हौसला
वेळच्या वेळीच जाईल चिरड़ला

उरी वरचा हल्ला
आतंकवादीयानी होता केला
वाटले होते त्या देशाला (पाक)
नमविल भारताला

पण अंगलट आले सगळे
आम्ही झालो दुबळे (पाक)
भारताने सर्जिकल केले
आणि प्लॅनच सगळे विस्कटले
................मयुर तोंड़वळकर

Tuesday, September 20, 2016

वृथा अभिमान जातीभेदांचा

वृथा अभिमान जातीभेदांचा
काय कामास येणार आहे?
राजकारण्यांच्या राजकारणाला
सामान्य माणूस बळी जाणार आहे......

हे व्यासपीठ नव्हे वादविवाद वाढविण्याचे,
हे व्यासपीठ आहे, सौहार्द वातावरणाचे,
येथे लिहिताना संयम बाळगावा,
कोणत्याही जाती धर्माचा प्रचार न करावा.......

कुठून आल्या ह्या जाती,
कुठून आले हे धर्म,
नाही आम्हास ते ज्ञात,
आम्ही आपले पळतो, त्यांच्याच शोधात.......

मी असे मराठा, मी असे ब्राह्मण,
आहे का मला माझी संपूर्ण ती जाण ?
वृथा बाळगतो मी जाती पातींचा अभिमान,
नाही मला त्याचे क्षणीकही भान......

माझ्याच शरीरात वसती भाग ते चार,
तयासच म्हणती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र
कां मग करीतो आपण विचार अभद्र ?
जात पात आणि जातीभेदांचा क्षुद्र........

जखम जर कां झाली मला,
रक्त वाहे त्यातून भळभळा,
रक्ताला नसे जातपातीचा लळा,
ते तर अंतरंगी लालच असे सकळा.........

मानवता हा असे माझा धर्म,
मी नाही करणार कोणताही अधर्म,
जाती भेदांच्या नावाखाली,
मुळीच नाही होऊ देणार, मी माझ्याकडून दुष्कर्म.......

नर आणि मादी, जाती असती दोन,
त्यातच सामावले विश्व अवघे कोण,
मग कां ही तेढी आणि जाती पातींचे भांडण,
कां बिघड़वती सामाजिक वातावरण........

अनगडवाणी