Wednesday, October 21, 2015

केंळे - लाभदायक फळ


केळे - एक लाभदायक फळ !!!

लहान मुलांकरीता केळे हे अतिशय
लाभदायक असून विशेषकरून
खोकल्यामध्ये नैसर्गिक उपाय आहे.
केळे हे जसे लहानांना लाभदायक
आहे तसे ते मोठ्या माणसांसाठी
देखील तितकेच फायदेशीर आहे.

केळे हे स्वादिष्ट असून स्वास्थकारक
तसेच पौष्टिकही आहे. केळे खाणे हे
शरीराला फारच फायदेशीर ठरते. केळे
खाल्ल्याने शक्ती बरोबरच भरपूर मात्रे
मध्ये विटामिन-ए, विटामिन-बी
आणि मैग्नीशियम मिळत असते.
त्याचबरोबर केळ्यामध्ये विटामिन सी,
बी-6 पोटैशियम, थायमिन, राइबोफ्लेविन
सुद्धा असते, ज्यामुळे मुलांना त्याचा
फायदाच होतो.

परंतु आपणाला हे माहित आहे कां की
हे केळे खोकल्यामध्येसुद्धा एक
उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे,
त्याचबरोबर सततच्या खोकल्यामध्ये
आणि ब्रोंकाइटिस मध्येसुद्धा बरेच
लाभदायक आहे.

लहान मुलांच्या श्वसन आजारामध्ये
केळे हे विशीष्ट कारणांमुळे प्रभावी
आहे हे दिसून आलेले आहे. असे जरी
असले तरी मोठी माणसे देखील त्याचा
उपयोग करू शकतात.

पोटासाठी केळे हे लाभदायक असून
ते स्वास्थकारक तसेच स्वादिष्ट व
पौष्टिक सुद्धा आहे.

लहान मुलांच्या घशाच्या आजारामध्ये
किंवा त्याना जर एकसारखा खोकला
येत असेल त्यामध्ये केळ्यापासून
तयार करण्यात आलेले क्रिम अतिशय
अद्भुतरित्या काम करतांना दिसून येते.

हे अद्भुत क्रीम तयार करण्याची पद्धत -

क्रीम तयार करण्यासाठी लागणारी
सामग्री:

2 मध्यम आकाराची सालीवर छोटे
छोटे टिपके असलेली पिकलेली
पिवळी केळी (केमिकलमध्ये न
पिकविलेली केळी)

2 मोठे चमचे मध किंवा साखर
(जर कां तुम्ही यामध्ये मध घालणार
असाल तर तो मिश्रण थंड झाल्यावर
घालावा, कारण उच्च तापमानांत मध
आपल्या नैसर्गिक गुणांना हरवू शकतो)

400 मिलीलीटर उकळते पाणी

तयारी:
केळ्याची साल काढून टाका. नंतर
ते स्मँश करा. त्यासाठी लाकडी चमचा
मिळाल्यास अतिउत्तम. त्यानंतर
त्यामध्ये साखर घालून व्यवस्थित
मिसळून घ्या. आता ह्या पेस्टमध्ये
गरम पाणी घालून ते व्यवस्थित ३०
मिनीटांसाठी झाकून ठेवा.

आपणांस जर कां मधाचा वापर
करावयाचा असल्यास पेस्टला
थंड झाल्यवर मध त्यामध्ये मिसळा.
शेवटी हे मिश्रण गाळणीने गाळून
घ्या.

खाण्याची रित :

ह्या पेस्टला हलकेसे गरम करून
दिवसातून ४ वेळा घ्यावे. म्हणजेच
प्रत्येक वेळेला १०० मिलि.चे सेवन करावे.

उपचारासाठी आपल्याला रोज नविन
पेस्ट बनविणे गरजेचे आहे. कांही
दिवसातच आपला खोकला हा
महागड्या औषधांशिवायच बरा
झालेला दिसेल.

केळे हे नरम असल्याने आपल्या
गळ्यावर ते अनुकूल असा परिणाम
करते. घशांत खवखव असल्यास
ह्याच्या सेवनाने केणत्याही प्रकारे
अनिष्ट परिणाम होत नाहीत किंवा
घसा सुजत नाही आणि त्यामुळे
खातांना त्रास होत नाही.

केळ्यामध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३
टक्के प्रोटीन, २४.७ टक्के कार्बोहाइड्रेट
आणि ब-याच कमी प्रमाणांत
ग्लाइसेमिक इंडेक्स असते.

(हे उपाय करतांना आपल्या डॉक्टरांचा
सल्ला घेतल्यास उत्तम)

Tuesday, October 20, 2015

मराठी माणूस....!!!

मराठी माणूस.....👌
मराठी माणसाची
रित लय भारी
त्याच्या वागण्याची
रितच कांही न्यारी
........कुणी म्हणतसे
.......त्याला खेकडा
.........तर कुणी म्हणे
........हा अपुला बापडा
करीतसे गोष्टी
फार मोठ्या मोठ्या
धाव असे कुंपनापर्यंत
फार छोट्या छोट्या
..........व्यवहार करताना
..........भावनेला तो मध्येमध्ये आणि
..........फायद्याच्या गोष्टींवर
..........सोडून देई पाणी
भावना जेव्हा आड येई
तेव्हा पैसा त्याचा जाई
पैशाला पैसा खेचतो
याची जाण त्याला नाही
...........गरीबीतच राहण्यास
...........मानितसे धन्यता
..........मोठ मोठ्या गप्पा मारून
...........स्वत:ची फसवणुक करीतसे अन्यथा
म्हणूनच मराठी माणूस
दिसत नसे व्यवसायात
इमाने इतबारे सेवा करून
मान मिळविण्याचा प्रयत्न करीतो
धनिकांच्या दप्तरात
............राहणार नाही काय मागासलेला
............मग तो आर्थिक व्यवहारात?
............कसा बरे तो दिसू लागेल
............व्यापार उदिमात?
...........मयुर तोंडवळकर
दिनांक: १९ ऑक्टोबर २०१५

Thursday, October 15, 2015

पेरूने करा सहा आजारांवर मात


पेरूने करा सहा आजारांवर उपचार

पेरू हे फळ विटामिन सी, विटामिन ए, विटामिन बी2, ई आणि के, फाइबर, कँल्शियम, लोह, मँगेनीज, फॉस्परस सारख्या पोषक तत्वांचा सुंदर असा स्रोत आहे. ह्यामुळे बरेचसे आजार आपण बरे करू शकतो.

1 आजारी लोकांसाठी पेरू उपयुक्त
2 पेरूमुळे डोळे सुदृढ राहतात
3 त्वचेला चमक येते
4 मधुमेह्यांसाठी पेरू उपयुक्त
5 थॉयराइड नियंत्रित करतो
6 हृदया सम्बंधी आजारांपासून बचाव
7 कैंसर सारख्या धोक्यापासून बचाव

पेरूला सुपर फ्रुट म्हटल्यास कांही वावगे नाही होणार. हेच कशाला, संत्र्याच्या तुलनेत पेरूमध्ये चार पट
अधिक विटँमीन सी सापडते आणि एका लिंबूच्या तुलनेत दहा पट जास्त विटँमीन ए असते. सांगायचे तात्पर्य हे की एका पेरूमध्ये बरेचसे गुण लपलेले आहेत. येथेच पेरूचे विशेषत्व संपत नाही तर पेरूच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून सुटका करून घेता येते. तर चला पाहू या कोणकोणत्या आजारांपासून सुटका होते ती?

आपणांस कल्पना आहेच की रोजच्या कामकाजी जीवनांत बरेच जण हे सतत कॉम्प्युटरच्या पुढ्यात स्क्रीन समोर बसून काम करीत असतात. त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे हे अत्यंत जरूरीचे होऊन
बसले आहे. डोळ्यांच्या तेजस्वितेसाठी विटँमीन ए हे आवश्यक असे तत्व आहे आणि ते पेरूमध्ये भरपूर
प्रमाणात उपलब्ध असते व ते डोळे सुदृढ ठेवण्यास मदत करते. डोळ्याचा कॉर्निया हा भाग पेरूमुळे साफ
राहतो, तसेच डोळ्यांच्या सेल्सचेही संरक्षण केले जाते.

विटामिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. परंतु नियमितपणे पेरू खाल्ल्यास
रातांधळेपणा टाळता येऊ शकतो. वाढत्या वयानुसार. डोळ्यांच्या उद्भवणा-या समस्या पेरूच्या नित्य सेवनाने कमी केल्या जाऊ शकतात. डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी तद्य्न लोक पेरू खाण्यास किंवा पेरूचा रस घेण्यास सांगतात.

प्रदूषण किती प्रमाणात वाढले आहे ह्याची चर्चा येथे करण्यात काहीच उपयोग नाही. परंतु येथे हे सांगणे
गरजेचे आहे की प्रदूषणामुळ कशाप्रकारे आपली त्वचा प्रभावित होते. इतकेच नव्हे तर कमी वयातच त्वचेवर
सुरकुत्या पडायला सुरूवात होते. तसेच चेहरा काळवंडतो, ह्या सगळ्या समस्यांपासून सुटका
होण्यासाठी पेरू हा त्यावरील एक चांगला उपाय होय. पेरू, विशेषत्वाने लाल पेरूमध्ये एंटीआक्सीडेंट
प्रोपर्टीज़ पहाण्यात येतात. एंटी ऑक्सीडेंट त्वचेला होणा-या क्षतीपासून रक्षण करीतो. इतकेच नव्हे
तर रोज पेरू खाल्ल्याने चेहरा टवटवीत होतो. तसेच शुष्कतेपासूनही बचाव होतो.

मधुमेह हा आजचा सगळ्यात महत्वाचा  असा आजार आहे. एखादेच घर असे असेल जेथे मधुमेहाचे रूग्ण
सापडणार नाहीत. वास्तवात मधुमेह हा अतिशय वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.

चीनी चिकित्सकीय प्रणालीमध्ये मधुमेहासाठी कित्येक वर्षापासून पेरूचा इलाज केला जात आहे. त्याचप्रमाणे तमाम शोध आणि अभ्यासाद्वारे ह्या गोष्टीवर
शिक्कामोर्तब करण्यात आले आहे की मधुमेहाच्या रोग्यांमध्ये पेरू हा अतिशय लाभकारी आहे.

पेरूमध्ये असणारे फायबर (तंतूमय) साखरेचा स्तर नियंत्रित करीत असतात. विशेषद्न्यांच्या मते दर
दिवशी एक किंवा दोन पेरू अवश्य खावेत. तसेच मधुमेहाचे प्रमाण जास्त असणा-या रोग्यांनी पेरूच्या पानांची चहा पिण्यास हरकत नाही.

पेरूमध्ये कॉपर म्हणजे तांबे मुबलक प्रमाणात सापडते, जे थॉयरॉईडसाठी आवश्यक तत्व आहे. वास्तवात
कॉपर हे हारमोनचे उत्पादन नियंत्रित करीत असते. पेरूमध्ये पोटँशियमसुद्धा सापडते, जे तत्व थॉयरॉईडसाठी महत्वपुर्ण असे आहे. ह्या शिवाय
पेरूमुळे आपले वजन नियंत्रित राखण्यास मदत होत असते. परिणामस्वरूप आपली ऊर्जा योग्य
राखण्यास मदत मिळते.

थॉयराइडपासून बचाव होण्यासाठी स्वास्थ्य चिकित्सकांचे हे मानने आहे कि पेरू ह्या फळाला आपल्या नियमित जीवनशैलीचाच एक भाग बनवा. इतकेच नव्हे तर पेरूच्या पानांची चहा नियमित सेवन करणे हे देखील आरोग्याला उपकारक होय.

हृदयासम्बंधीत आजार हे हल्ली नित्याची बाब झालेली दिसून येते. कमी वयापासून ते वयस्करांमध्ये हृदयासम्बंधीत आजाराने ग्रस्त झालेले रोगी दिसून येतात आणि त्यासाठीच हृदय रोगापासून वाचण्यासाठी ठोस उपाय शोधणे गरजेचे झाले आहे.

तमाम शोध व अध्ययनांद्वारे हे निश्चीत झाले आहे की नियमीतरित्या पेरू खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण करता येते तसेच शरीरातील चरबीही कमी होते.

वास्तवात पेरूमध्ये असणारी विटामिन सी, पोटँशियम ही तत्वे ह्याला जबाबदार आहेत. खरे सांगायचे तर
पोटँशियम हार्टबीट नियमित राखत असते उच्च रक्तदाबालाही नियंत्रित ठेवण्यास तेवढेच जबाबदार असते.

पेरूमध्ये कँसर रोधी आणि ट्यूमर रोधी तत्व जसे लाइकोपीन, विटामिन सी, पोलिफेनोल्स अस्तित्वात असतात, त्यामुळे नियमितपणे पेरू खाल्ल्यास
कँसर आणि ट्यूमरचा धोका कमी केला जाऊ शकतो. पेरूच्या नित्य सेवनाने प्रोस्टेट कँसरचा आकार देखील कमी केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर ब्रेस्ट म्हणजे स्तन किंवा छाती, तोंड, पोट, फुफ्फुस आदी कँसर केसेसमध्ये पेरू हा लाभदायी असल्याचे सिद्ध झालेले आहे.

अनगडवाणी