सोने
सोने शोधा,
सोने शोधा,
साधुबाबांचे
फर्मान आले,
निधर्मी
म्हणविणारे सरकार,
ताबडतोब
कामाला लागले......१
एक सरकार
करते कायदा,
जादूटोणाविरोधी
विधेयक आणून,
तर दुसरे
सरकार राबवते कायदा,
साधुबाबांचे
फर्मान ऐकून.......२
सोने शोधण्यासाठी
लोटते जत्रा,
जनमाणसानसकट
अधिकारी सतरा,
मिडिया
म्हणा, वर्तमानपत्रे म्हणा,
सगळीकडे
चर्चा, “हा नाही नां खतरा?”........३