डांस बार
!!!
डांस बार,
करती गार,
गि-हाईके
त्यांची,
सगळी
माहितगार.....१
सरकारी
मामला,
कोर्टात
फसला,
सुप्रीम
कोर्टाने,
दिला
फैसला.........२
चालू राहू
द्या,
पोट भरु
द्या,
बंधन
त्यांच्यावर,
टाकू
नका........३
नाचणे,
बागडणे,
हा नाही
गुन्हा,
पुन्हा
असे,
तुम्ही करू
नका........४
मी बाई
नारी,
भोळी गं,
अंगात
माझ्या
चोळी
गं........५
आरोप
माझ्यावर,
करता कसले,
मन
रिझविन्याचे,
कामच
आपले.....६
गि-हाईके
येती,
मन
रिझवीती,
त्यातच मी,
फसले
गं......७
हे शब्द
ऐकून,
मन झाले
बेजार,
सामान्य
माणसाने,
घेतला
आजार......८
सरकारची
तर,
बोबडीच
वळली,
कार्य
करण्याची,
शक्तीच
गळली.......९
जावे तर,
जावे कोठे?
ह्याची
मात्र,
संभ्रमणा
वाढली.....१०
आता
म्हणती,
फेरविचार
करू,
चुकलेले
निर्णय
आपण
सुधारू......११
पण हे डांस
बार
बंद करू,
डांस बार,
बंद
करू.........१२
................मयुर तोंडवळकर.