Tuesday, July 31, 2012
Wednesday, July 25, 2012
मेगाब्लॉक........!!!
मेगाब्लॉक........!!!
(ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे मयुरटिका.....वास्तविका....!!!)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)
मेगाब्लॉक घ्या
नाहीतर मेगाटॅाक घ्या
रेल्वे काही सरळ
रुळावर येईना........
आज कुठे
ओवरहेड तुटली
उद्या कुठे
रेल्वेच घसरली
परवा अपघात
होऊन
रेल्वे
एकमेकावरच चढली
हे झाले आहे नित्याचे रडणे
दोन्ही रेल्वेचे हे सततचे रडगाणे
काय बरे करावे ह्या रेल्वेला ?
कोणी संपवेल का रेल्वेचा हा अवतार रडवेला.......
Monday, July 23, 2012
आघाडी तेथें बिघाडी
आघाडी तेथें बिघाडी
(ही नव्हे वात्रटिका
तर ही आहे मयुरटीका.......वास्तविका)
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
आघाडी तेथें बिघाडी
सावरता सावरता
राजकारण्यांची बिघडते
नाडी
जुळवून आणता आणता
नाकी नऊ येतात
त्यासाठी जनतेची
मात्र दमछाक करतात
पैसेवाल्यांशी
साटेलोटे करतात
दरवाढ करतात___भाव
वाढवितात
जनतेची मात्र
लुबाडणूक करतात
सरकारी जमिनी लाटतात
कॉन्क्ट्रॅक्टरांशी
संगनमत करतात
जनतेची मात्र फसवणूक
करतात
साखर सम्राट होतात
शिक्षण सम्राट होतात
जनतेला मात्र
भिक्षांदेही करतात
अशी ही आघाडी
बिघडवते सामन्यांची
नाडी
समाजावर मात्र करतात
कुरघोडी
Tuesday, July 10, 2012
वाकडी वाट ......!!! मयुर टीका .......वास्तविका ......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)
वाकडी वाट ......!!!
मयुर टीका
.......वास्तविका ......!!!
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
सार्वजनिक जीवनातील
भ्रष्टाचार,
झाली आहे ही नित्याची बाब,
ह्या महाभाग भ्रष्टाचा-यांना
कोण विचारणार आहे त्याचा जाब?
म्हणे मी द्यायला तयार
आहे
माझा आदर्श मधील फ्लॅट
पण जनता म्हणे, आपण
का धरली
अगोदरच वाकडी वाट?
आरोप पत्र .......!!! मयुर टीका .......वास्तविका ......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)
आरोप पत्र .......!!!
एका माजी
मुख्यमंत्र्यांवर
आरोप पत्र दाखल
झाले,
तिघा माजी
मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, अधिकारी
यांना चौकशी
आयोगासमोर उभे राहावे लागले,
लोकं म्हणतात,
मंत्री म्हणजे पाजी,
त्यात आले सगळे,
आजी आणि माजी
तर लोकसेवक,
झाले रिश्वतखोर.
सगळीकडून पैसे खाऊन,
बनलेत हरामखोर,
चारोळी......!!! भ्रष्टाचाराची प्रकरणे
चारोळी......!!! भ्रष्टाचाराची प्रकरणे
भ्रष्टाचाराची प्रकरणे
यांची झाली जगजाहीर
अनेक भानगडी आल्या
त्यांच्या जगासमोर बाहीर
दोषी अधिकारी /
नेत्यांवर कायद्याचा बडगा कोण आहे घालणार?
याचे उत्तर मात्र कोणाकडे
नाही मिळणार.......!!!
Monday, July 2, 2012
मला काय देणे घेणे?
मला काय देणे घेणे?
मंत्रालयातील आगीचे
मला काय घेणे?
इथे तर चाले पैशाचे
देणे-घेणे..........
सहृदयता कोणी दाखवावी?
सहृदयता का दाखवावी?
सरकारला नाही ह्याचे काही सोयर-सुतक
तर आम्हाला तरी का असावे ह्या गोष्ठीचे मिथक?
ह्याला अपवाद असे
केवळ रतन टाटांचा
तर परकेपणाचा
दृष्टीकोन असे सा-या उद्योग जगताचा
म्हणूनच रतन टाटांनी
दिले स्वहस्ताक्षरातील लेटर
बाकी इतर म्हणतात
काय अडले आहे आमचे खेटर ?
...................................
काय अडले आहे आमचे खेटर ?
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...