MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
Friday, December 3, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
धन संपत्तीत देखील फरक आहे. एक सात्विक संपत्ती आणि एक अघोर संपत्ती. कष्ठ करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जीत प्राप्त झाली ती सत संपत्ती. परंतू इतरांना त्रास देवून, खोटे बोलून, विश्वासघात करून, प्राप्त झाली ती अघोर संपत्ती. सात्विक संपत्तीला विचार असतो. अघोर संपत्तीला विचार कोठला ? अघोर संपत्ती कमविणारे अघोर अविचाराने पाहणार. कितीही अघोर संपत्ती एकाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार. परंतू भक्ती मार्गाने जाणारे, सत संपत्तीचा संचय करणा-यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार. सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्तीला पुरवणी नसते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतू सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी.
ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असू द्यावे समाधान !!
आपले सद्गुरू जे आपल्याला सांगत असतात त्यांची छानणी करणे, उजळणी करणे, प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरुंनी सांगितलेली एखादी गोष्ठ लक्षात आली नाही तर समजावून सांगतील. परंतू तुम्ही भक्तीची चाकोरी सोडू नका. एक अखंड नाम हि महान चित् शक्ती आहे. भक्ती आणि तपोभूमी यांची तुलना होवू शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ट आहे. सतयुगापासून ज्योतींना अदृश्य त-हेने सत सान्निध्य मिळवावयाचे आहे. प्रत्येक सेवेक-याने याकरिता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंताना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.
समाप्त ..........
ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असू द्यावे समाधान !!
आपले सद्गुरू जे आपल्याला सांगत असतात त्यांची छानणी करणे, उजळणी करणे, प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरुंनी सांगितलेली एखादी गोष्ठ लक्षात आली नाही तर समजावून सांगतील. परंतू तुम्ही भक्तीची चाकोरी सोडू नका. एक अखंड नाम हि महान चित् शक्ती आहे. भक्ती आणि तपोभूमी यांची तुलना होवू शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ट आहे. सतयुगापासून ज्योतींना अदृश्य त-हेने सत सान्निध्य मिळवावयाचे आहे. प्रत्येक सेवेक-याने याकरिता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंताना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.
समाप्त ..........
Wednesday, December 1, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात. शैवाणी तिला आत नेवून ठेवले. तिची भक्ती श्रेष्ट होती, तिची तप:स्च्यर्या खूप ! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलून काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू, या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला.
भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम ! महान चैतन्य शक्ती, चित् शक्ती म्हणजेच अखंड नाम. या नामाच्या जोरावर या अघोरांचा नाश केला. अनंताचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ, भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरुना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल? सद्गुरुना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरुंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेक-याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला, तर कुठे व कसा भात्केल हे सांगता येत नाही. हि चिंता सद्गुरुना असते. किती श्रेष्ठत्व आहे, हे लक्ष्यात घ्या. ते क्षणीक पाहत नाहीत.
“तूरत् दान महापुण्यम” नाही. पुढे हि ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरुना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेक-यांची कशी प्रगती होईल? म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात. भक्तीनेच सेवेकरी पुढे जावू शकेल. स्वत:ची प्रगती साधू शकेल. तप:स्च्यर्येने अनंतना प्राप्त करून घेवू म्हणाल तर कितीही जन्म घेवून देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतू भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल. पाहू शकाल.
पुढे चालू..........6
Friday, November 26, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला).....5
म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नाश / नि:प्पात kकरता आला. या सर्वस्वांचे मुळ कोणते तर भक्ती ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतू आजच्या कलियुगी मानवाना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही. तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामानसात रहा अन जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा. अन मला डोळे भरून पहा. अन हे दोघांचे एकदा समीकरण केलेत कि पाचवा प्रणव प्रगत होईल. अन एकदा का पाचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तीने लावला. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राज मार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !
गुरुदेव कसे आहेत? तर अत्यंत लीन अन् अफाट शक्ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे. भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य या त्रिभुवनात कोणाकडे नाही. या नामाचा नाश हे तपस्वी देखील करू शकणार नाहीत. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नाम् रहित ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहित तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहित ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त ! अहंकार षड् रिपू रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.
भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित् शक्ती आहे.
या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतू कलियुगी मानवाना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र वेळ मिळतो, परंतू नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेक-यानो ! किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, “दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.”
जाते घडी हि अपुली साधा ! काय करता करा !!
आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे, अन प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमविता येत नाही. नामाच्या या महान चित् शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला. तीच चित् शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तीच चित् शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सातच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकारणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंताची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच कि अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्य नाश केलेल्या ज्योतीना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येइना.
आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरानी. परंतू शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात शैvaniवाणी तिला आत नेवून ठेविले होते. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:स्च्यर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार प्राप्त झाले होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलुन काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणे? तर अघोरांनी. परंतू शेवटी विजय कोणाचा ? तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.
पुढे चालू..........5
Wednesday, November 24, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नत मस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती? असे ते गुरुदेव पितामह ! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ठ यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगीनींचा छळ करायला निघाला, ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! “ब्रम्ह म्हणजे सर्व व्यापक आहे. ते ब्रह्म”. अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट आणि गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरानि कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र – मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ असेल, तरी देखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्याचे काही चालत नाही. चालणारहि नाही. भक्ती म्हणजे काय, एकच नामस्मरण ! अन सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती !!
हि भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ती कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या तीस वर्षात जी काही कर्तव्ये या आसना कडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो कि भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महा बलाढय चालत नसे. ह्या अघोरणी सर्व काही प्राप्त करून घेतले होते. तरीदेखील तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती कि अघोर तप:श्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ. एकाच नामाच्या जोरावर चालणारी हि भक्ती ! अघोरांकडे मात्र अनेक त-हा, मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे? तर सताचे !
पुढे चालू..........
Friday, November 5, 2010
MAYUR TONDWALKAR: भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स...
MAYUR TONDWALKAR: भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स...: " Normal 0 false false false EN-US X-NONE X-NONE ..."
भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?
भक्तीचे स्वरुप - पुढे चालू .....
जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे, काय मिळवावयाचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता? तर भक्ती!! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे? भक्तीने !! आपल्याला काट्या कुटयातून जायचे नाही, गिरिकनदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपले इप्सित ठिकाणी पोहचणार. अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशहि सतच करणार आणि सतानेच तो केला आहे याबद्दल शंका नाही.
एवढी २५ अवतार कार्ये झाली पण ओमकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही, तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ती, अहंकारी भक्ती, दुष्ठ बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर,द्वेष, याचा नाश झाला. आपल्याला माहीतच आहे, कोपिस्ठ विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्यावर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिस्ठ? संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधी-कधी आम्ही चिडतो, परंतू ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यानीही ते मान्य केले. ते सांगतात सता !! आम्ही त्या युगात पाळले, परंतू आता मीही पाळणार नाही. ते कसे आहेत तर दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात. ब्रम्हरशी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात, असे ते पद आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात.
Wednesday, November 3, 2010
Sunday, October 31, 2010
सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने
एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीन शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतू शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले, तर सताने ! जरी अघोराना वरद्हस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापीटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतू अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार. अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात. अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करत आहोत.
कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरानी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापर युगापासून जेवढे अघोर अवतार कार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवाना शक्य होइल का? ज्यांच्यासाठी ओम् कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्या करिता अनन्तानी ओमकाराना आदेश देवून जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सुक्ष्माचा नाश तुम्ही कलीयुगी मानव करू शकता का? आपण पाहतोच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्दीकरण स्थिती होत असताना काही बलाढय, तर काही महाबलाढय, ८५० पाय-या च्या अघोर ज्योतीचा देखील नाश केला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी – सिद्धी, तंत्र – मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धी करणातून नाश केला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहेच,
आन्धळ्याशी जग सारेची आंधळे
Wednesday, October 20, 2010
ध्यान
ध्यान म्हणजे ‘आत’ जाण, अंतरमुख होण, अज्ञाताच्या प्रांतात शिरण, याचाच अर्थ या घडीला आपण, ‘बाहेर’ आहोत, बहि:र्मुख आहोत आणि तथाकथीत ज्ञाताच्या प्रांतात आहोत. खर सांगायचं तर ज्ञात आणि अज्ञाताबाबत आपले आकलन आपल्या मर्यादानुसार आहे. पण, प्राथमिक पातळीवर साधकाच्या दृष्टीने ‘आत’ आणि ‘बाहेर’ अशी त्याच्या जगाची विभागणी झाली आहे. आपण जोवर बहि:र्मुखतेणे, आत्मकेंद्रित होवून जीवन जगत असतो तोवर ‘बाहेर’चं जगच आपल्याला खर वाटत असत. आपण दृष्याला, स्थूलाला चिकटलेलो असतो. आपण जसजस अंतरमुख होवू लागतो तसतस आपल्याच अंतरंगाला विराट पण सूक्ष्म चेतनेची ओढ लागते. मग आतल जग आणि बाहेरच जग अशा दोन जगात आपलच मन संघर्ष उत्पन्न करत. साधकाला हळू हळू अस वाटू लागत कि, आपल जे आतल जग आहे ते अधिक खर आहे. ते आपल्या कह्यातल आहे. आपल्याशी प्रतारणा न करणार आणि आपल्याला आधार देणार आहे. बाहेरच जग मात्र क्षणोक्षणी बदलत राहणार आहे.
काळाच्या कह्यात असल्याने आपली सत्ता न जुमाननारे आहे – ते सम्बधांवर आधारित आहे. प्रत्येकाला हे जग स्वत:च्या मनासारखे असावे आणि व्हावे, असे वाटते आणि त्या दृष्टीनेच तो आपल्या सम्बंधांची उभारणी करीत असतो. अशा हजारो ‘मी’ च्या सापेक्ष भावनानवर हे सम्बंध उत्पन्न होत असल्याने त्या समबंधातही कायमच्या आधाराची हमी नाहि. त्यामुळे हे बाहेरचे जग साधकाला अनिश्चित – अस्थिर वाटते. पण जन्मापासून याच जगाची त्याला सवय असते. जे सुख मिळवायचे ते याच जगात, अशी त्याची स्वाभाविक भावना असते. अंत:र्यामीचे जग त्याला अपरिचित असते. आपल्या ख-या स्वरूपाबद्दल तो अनभिज्ञ असतो. तेव्हा अज्ञातात शिरणे म्हणजे आपल्या आताच शिरणे ! कारण आपण आपल्याला सर्वाधिक अज्ञात आहोत !!! म्हणून आपल्या अंतर्यामी शिरणे – तेथे स्थिर होत राहणे, हेच ते ध्यान.
पण हे आत शिरणे आणि स्थिर होणे साधत नाही. याच कारण आपल्या मनात सुरु असलेले दोन जगातले द्वंद्व आणि बाहेरच्या दृश्याकडे या मनाची उपजत असलेली धाव.
मुख्य म्हणजे या दोन जगातले सर्वात श्रेष्ठ आणि आपल जग कोणत्, याच मूल्यमापन झालेलं नाही. त्यामुळे उपासना करू तेव्हा पटकन आत जाने साधाव, अशी आपली अपेक्षा असते. पण उपासनेला बसल कि बाहेरच्या जगातले आघात, कल्लोळ, लहरी आतमध्ये आदळू लागतात. बाहेरचे आघात आतून आपल्याला अस्थिर, अशांत, अस्वस्थ करीत राहतात. शांत व्हावयाचा प्रयत्न केला कि भले बुरे विचार,
ब-या-वाइट आठवणी उफाळू पाहतात आणि मनाचा ताबा घेउ पाहतात. मग आत जाणच साधत नाही तर तेथे स्थिर होणे कसे साधावे?
आता भल्याबू-या आठवणी किंवा अवती-भवतीच्या माणसानच बरेवाइट वागणे सोडा हो, उपासनेत लहान-सहान गोष्टीनचाही अडथळा होत असतो. अगदी क्षुल्लक वाटना-या गोष्ठीही मनाचा ताबा घेतात.
घराला ओल आहे., घरात पाली झुरळे किटकानपासून ते उनदरापर्यंतच्या प्रान्यानचा मुक्त संचाराचा त्रास आहे. इतक्या क्षुल्लक गोष्टीही साधकाला अस्वस्थ करू शकतात. त्या क्षणी उपासनेत मनात या गोष्टी मध्येच डोकावतात आणि साधक त्याच दिशेने विचार किंवा चिंता करू लागतो. गोष्टी फार साध्या आहेत खरे. पण जोवर बाहेरच्या या गोष्टी त्रास देत असतात तोवर तुम्ही आतूनही स्थिर होवू शकत नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. पण यावर उपाय काय ? उपाय एकच – उपासनाच वाढवत राहावी.
उपासानेत खंड पडता काम नये. उपासनाच उपासनेची गोडी निर्माण करील आणि टीकवीलहि. तेव्हा बाहेरच जग आघात करीत असले तरी आत शिरणे थांबवू नये. बाहेरच्या जगात व्यवहारानुसार गरजेच ते कराव. प्रयत्नही चिकाटीने करावेत. ऐहिक सुखही अवश्य मिळवाव पण आत जाने थांबवू नये. ते साधत गेल कि जाणवेल जग एकच आहे. आत आणि बाहेर अस काहीच नाही. जे आहे ते एकच आहे. सर्वव्याप्त आहे. त्याच्या असनेपनात आनंद आहेच आणि त्यात आपणही आहोत. या जानिवेतही आनंद आहे.
चैत्यन्य प्रभू.
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...