Saturday, September 29, 2018

# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*

# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*
*समस्त प्राणीजात त्यांच्यासमोर असतो खुजा* #

*सद्गुरूंच्या मनी येता अभिलाषा*
*अपुल्या भक्तांची ते, पुरवतील आशा*

*कोण घेणार मग भक्तांची परीक्षा*
*त्यानांच घ्यावी लागेल, सद्गुरूंची दिक्षा*

*नतमस्तक होता, सद्गुरूंच्या पुढे*
*लयाला जातील पापे, नाही घेणार ते आढेवेढे*

*अनगड म्हणे बा सद्गुरू नाथा*
*तुझ्याच चरणी ठेवितो मी माथा*

*माफ करा समस्त अज्ञ जीवा*
*घडू द्या अमुच्याकडून, अपुल्या चरणांची सेवा*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

👏👏👏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा म्हणजेच *आकार* आणि तोच परिपूर्ण परमात्मा जेव्हा सूक्ष्म रूपात भेटतो तेव्हा तो *निराकार* स्वरूपात असतो. तसेच सूक्ष्म, अतिसूक्ष्म - अणू, रेणू, परमाणू यामध्ये असूनही अलिप्त असणारे तत्व देखील हेच *निराकार* तत्व होय. अर्थात आपले सद्गुरू परब्रह्म तत्व होय.

आपण *आकारातून* *निराकारात* कधी जाऊ शकतो?

जेव्हा आपण आपल्यातील *स्वः* ला विसरून *नामस्मरण* करीतो तेव्हाच.

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

Tuesday, September 18, 2018

तुकोबांचे अभंग

🙏👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

*आतां माझ्या भावा ।*
   *अंतराय नको देवा ॥1॥*

येथे तुकाराम महाराज म्हणतात, "आता माझ्या भावा" म्हणजे माझी जी भगवंता तुझ्याप्रत भावना आहे, ती तशीच तुझ्याप्रत प्रेमाची राहू दे. तिच्यात अंतर पडू देऊ नकोस. ती अधिकाधीक वृद्धींगत होऊ दे.

*आलें भागा तें करितों ।*
    *तुझें नाम उच्चारितों ॥2॥*

पुढे ते म्हणतात,"जे माझ्या भाग्यात आले ते मी करीत राहीन, ते म्हणजे सदासदैव तुझेच नाम उच्चारीत राहीन. तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नकोस, हीच तुझीया चरणी नम्र विनंती.

*दृढ माझें मन।*
     *येथें राखावें बांधोन ॥3॥*

त्यासाठी माझे हे उच्छृंखल मन आहे, जे सदानकदा इथे तिथे भरकटत असते, त्याला तुच तुझ्या शक्तीने तुझ्याच चरण कमलाशी असे बांधोनी ठेव की त्याला इकडे तिकडे धावता येणार नाही.

*तुका म्हणे वाटे ।*
   *नको फुटों देऊं फांटे॥4॥*

शेवटी तुकोबा राय म्हणतात,"हा भक्तीमार्ग अनुसरताना माझ्या मनात शुद्ध भाव निर्माण कर. त्यात तर्क वितर्कांचे फाटे फुटू देऊ नकोस. सदोदित माझे मन आपल्या चरणांवर रत राहू दे."

........................अनगड बुवा.............................

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

सतवचने

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

बाबा म्हणतात, *"आजकाल सेवेकरी का फसतात?*
बाबाच पुढे उत्तर देतात, *"कारण सेवेकरी आपले कान हलके ठेवतात* *शक्तीशी तुल्यबळता करतात*

बाबा पुढे म्हणतात, *सद्गुरू ज्या सान्निध्यात आहेत त्याठिकाणी अपयश येणे शक्य नाही.*

*तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ*

*भगवंत उपासना सोडून दैवत उपासक बनू नका.*

*भक्ती आपुलकीने करा, प्रेमाने करा.*

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*

🙏💐🙏👏🙏💐🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*
*तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्*
............... *श्री भगवत गीता* .............

जे निष्काम व पूर्ण ज्ञानी आहे व *जे अनन्य भावयुक्त मला आत्मरूपाने जाणतात व माझे निरंतर चिन्तन करतात, स्मरण करतात* व सर्व उपासनेत श्रेष्ठ अशी निष्काम उपासना करतात, अशा माझ्या त्या परमार्थ ज्ञानी भक्तांचा *योगक्षेम* मी चालवितो. *अप्राप्य वस्तूची प्राप्ती येणे नाम योग व प्राप्य वस्तूचे रक्षण येणे नाम क्षेम होय.*  *योग आणि क्षेम* ही दोन्ही कामें मी स्वतः करीत असतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. ह्याचे कारण ज्ञानीयाला मी माझ्या आत्मास्वरूपा सारखाच आहे आणि ते मला प्रिय असल्यामुळें असे भक्त माझ्या आत्मरूपा सारखेच आहेत.

तद्वतच ह्या भक्तांव्यतिरिक्त इतर भक्तांचे योगक्षेमही भगवंतच चालवित असतात. परंतु ह्यामध्ये एक भेद आहे तो म्हणजे काही भक्त आहेत ते असे समजतात की त्यांचा योगक्षेम ते स्वतःच चालवितात. परंतु जे अनन्य साधारण भक्त आहेत ते असे म्हणत नाहीत. कारण ते *जीवन आणि मरण* ह्या वासनेत लिप्त होऊन राहत नाहीत. अशांचा योगक्षेमही भगवंतच करीत असतो.
🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

सतवचने

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

बाबा म्हणतात, *सुसंगत म्हणजे सज्जनांची संगत असेल तर चांगलीच वाक्ये आपल्या कानी पडणार.* 

*विचाराने वागतात ते सुजन किंवा सज्जन. ते अगदी शांत असतात. त्यांचे वागणे व विचार देखील चांगले असतात.*

*पवित्र विचार व वासना ठेवणारा स्वतः पवित्र असतो.*

*सत् पद हे नेहमी निर्भिड असते.*

*मनाची ठेवण पवित्र असेल तर भावना शुद्ध असेल तरच तो सत् बनेल.*

*अनीतीने जाणारी ज्योत नेहमी कमी दर्जाची असते.*

*नीतिमत्तेने जाणा-या भक्ताचे कधीही अकल्याण होणार नाही.*

*सद्गुरू बंधुत्वाचे नाते हे उच्च दर्जाचे आहे.*

*गुरूबंधु आणि भगिनी यांचे नाते फार श्रेष्ठ आहे. याच्या विरूद्ध जाणारी ज्योत महत् पापी होय.*

👏 *परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज* 👏

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Monday, September 10, 2018

सत वचने

👏🌷👏

*卐卐||ॐ प.पूज्य श्री भगवान महाराज परिवार ||卐卐*

*|| जय श्री सद्गुरू माऊली ||*

👏 सद्गुरू माऊलींचे वर्णन अवर्णनीय 👏

सद्गुरू माऊलीचा सहवास लाभणे हे दुरापास्तच. पण तो जर का आपल्याला लाभला तर तो टिकविणे फारच आवश्यक असते. त्यासाठी शाब्दिक कसरती न करता, मनोभावे, मनोमन शरण जाऊन त्यांनाच विनंती करावी की *हे भगवंता ! हे दयाघना मला आपण आपल्या चरणांशी तर घेतले आहेच, तरी ते तसेच अबाधित ठेवा व मला आपल्या सेवेत व नामात सतत राहू द्यात.*

सद्गुरूंचे मनापासून होऊन रहावे आणि त्यांनी दिलेले नाम सतत घ्यावे.

👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏

सत वचने

👏🌷👏

*प.पूज्य भगवान महाराज परिवार*

*卐卐 || जय श्री सद्गुरू माऊली || 卐卐*

श्री सद्गुरू सांगतात, *"माझी इच्छा मी नाहीशी केली आणि भगवत इच्छेने सर्व होते ही जाण ठेवली तर मनाला स्वास्थ्य लाभेल आणि आनंदाची प्राप्ती होईल."*

*कर्तेपणाचा अभिमान सोडल्याने, हव्यास टाकल्याने मनाला स्वास्थ्य लाभते.*

*होते ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग काळजीचे कारणच उरत नाही.*

सद्गुरू सांगतात, *"सतत भगवंताच्या नामात राहून देहाचे विस्मरण होऊ द्या.*

*भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली असता भगवंत भेटतो.*

*भगवंताचे नाम कधीही सोडू नये.*

*आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेनेच चालतो ही जाणीव सतत आपल्या मनाजवळ ठेवावी आणि जगात वावरावे आणि वागावे.*

*जगात शाश्वत सत्य एकच आहे, ते म्हणजे नाम*

*नामात राहिल्यानेच मुक्ती लाभेल*

*मुक्ती आणि मोक्ष म्हणजे काय?*
मुक्ती आणि मोक्ष म्हणजे आपल्या सद्गुरू माऊलींचे चरण प्राप्त होणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष. एवढेच नव्हे तर ते चरण प्राप्त झाल्यानंतर नामस्मरणाच्या गतीने जाऊन ते टिकविणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष.

*सत्संगांमध्ये आपल्याला आपले दोष कळतात आणि चित्त शुद्ध होण्यास मदत होते.*

👏🌷👏💐👏🌷👏💐👏

सत वचने

👏👏👏

...म्हणून समर्थ सांगतात *"माझा जो सेवेकरी आहे, त्याने कोणत्याही त-हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे.* 
*सद्गुरू मारक नसून तारक असतात.*

*नारायणाचा नारायण - अशा तत्वाचे आपण सेवेकरी आहात* - 

आपण कसे असावयास पाहिजे? तर *नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे.*

*मी तुमच्यातलीच एक ज्योत आहे* पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर *दोषात्मक* आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व चालू देणार नाही.

🌷👏🌷👏🌷👏🌷👏🌷

Friday, August 3, 2018

सद्गुरू दर्शन

कुणी म्हणेल आपण रोज भगवंताचे नामस्मरण करतो, पण आपल्याला कुठे भगवंताचे दर्शन घडतेय ?

बरोबरच आहे म्हणा. आपल्याला त्या भगवंताचे दर्शन होईलच कसे ? कारण आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतके आकंठ मायेमध्ये बुडालेले असतो की आपल्याला त्या भगवंताचे नावही घ्यायला फुरसत नसते. ध्यानधारणा करणे राहू द्या, नामस्मरण करायला देखील वेळ नसतो. येथे मला अनगड बुवांची आठवण येते. ते म्हणतात,


इत्यादी गोष्टींनी सुरू झालेला दिवस हळूहळू पुढे पुढे सरकतो तो पुर्णपणे मायावी त-हेने. म्हणजेच माया या नावाच्या ह्या विषाने आपली दृष्टी, विचारधारा, दृष्टिकोन वगैरे सगळं कसं विषारी होतं. अशी त-हा असल्यावर भगवंत आपल्याला दिसेलच कसा ? तो आपल्याला दर्शन देईलच कसा ?

अशाप्रकारे उघड्या डोळ्यांनी हे सगळं विखारी जग पाहिल्यावर आपले जे अव्यक्त मन आहे, ते भगवंताच्या ठिकाणी स्थीर होईल कसे ? भगवंताचे नामस्मरण होईलच कसे ? आणि हे जर आपल्याकडून झाले नाही तर आपल्याला त्याचे दर्शन तरी कसे लाभेल ?

तर ह्यावर उपाय एकच तो म्हणजे, "हे जरी खरे असले तरी आपण हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे की आपले शरीर बाहेरील वातावरणामुळे तसेच वर उल्लेखिलेल्या अनेक कारणांमुळे जे मलिन होते, ती मलिनता तसेच आलेली मरगळ घालविण्यासाठी रोज सकाळी उठून आपण काय करीत असतो? तर या देहाला आंघोळ घालीत असतो.
तशीच आंघोळ जर आपल्या मनाला रोज नित्यनेमाने घातली तर आपले मन नाही कां शुद्ध होणार ?

मग ती आंघोळ आपण आपल्या मनाला कशी बरे घालू शकणार ?

त्यासाठी पहिला उपाय म्हणून आपल्या सद्गुरूनी आपल्याला जे नाम बहाल केलेले आहे, त्याचे नामस्मरण करणे.

नामस्मरण करताना ते कसे व्हावयास हवे ?
तर ते सद्गुरूंच्या ध्यानात. म्हणजेच डोळ्यांसमोर आपल्या सद्गुरू माऊलींची मूर्ती तरळली पाहिजे व मनोमनी त्यांचे नांव घ्यावयास हवे. चक्षू आणि अंत:र्चक्षू हे त्या नामातच तल्लीन व्हावयास हवेत.

दुसरा साधा आणि सोपा उपाय जो आपल्या सद्गुरू माऊलीने दिला आहे, तो म्हणजे सत् स्थानात सताच्या सान्निध्यात येऊन बसणे. ह्याने काय होईल ?

ह्यामुळे सत् स्थानात येऊन सताच्या सान्निध्यात बसल्यानंतर आपल्या देहावर, आपल्या मनावर सत प्रकाश जितका वेळ आपण तेथे बसू तितका वेळ तो आपल्यावर सातत्याने पडल्यामुळे आपली देहशुध्दी तसेच मनशुध्दी होईल व आपण शुचि:र्भूत शुद्ध होऊन बाहेर पडू.

आहे की नाही साधा आणि सोपा उपाय. इतर काहीही आवश्यकता नाही. आणि या व्यतिरिक्त जर त्या सत सान्निध्याच्या कालावधीत आपण नामस्मरण केलेत तर सोन्याहूनी पिवळे. नुसत्या सतप्रकाशात बसण्यामुळे आपल्याला हा लाभ आपोआपच मिळविता येईल.

Wednesday, June 6, 2018

निवृत्ती म्हणजे काय ?

निवृत्ती म्हणजे काय ?

      "नि"वृत्ती म्हणजे  = निरागस वृत्ती.

आयुष्याचा आपला बहुमोल कालावधी जो आपण आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी घालवितो आणि मग त्यातून आयुष्याची अठ्ठावण्ण किंवा साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार कार्य करण्याचे थांबवितो, यालाच विशेषकरून निवृत्ती असे म्हटले जाते. ही झाली व्याख्या.

पण खरच आपण निवृत्त होतो कां ?
खरे पाहता, आपण वयोमानानुसार नोकरीतून निवृत्त होतो, कर्तव्यातून नव्हे. उलटपक्षी आपली रोजची कामे कमी न होता वाढतच जातात. आपले हे नोकरीतून निवृत्त होण्याचे वय म्हणजे आपल्या मुलामाणसांमध्ये कर्तव्यरत असण्याचे वय.

अशावेळेस मुलांमुलींची लग्ने होतात, त्यांना मुले-बाळें होतात अर्थात आपण आजी-आजोबा होतो. नात्रां-गोत्रांत रममाण होतो आणि या मायेच्या रहाटगाडयात पुरते अडकून जातो.

आपली व्यावसायिक वृत्ती ब-याच अंशी लोप पावली जाते व आपण निरागस वृत्तीकडे म्हणजेच निवृत्तीकडे झुकण्यास सुरूवात करतो. आपण बालकांसारखे होऊन त्यांच्यासोबत एक बालकच होऊन राहतो. त्यांच्याप्रमाणे आपणही निरागस होऊन वाटचाल करण्यास प्रारंभ करतो. त्यांच्यासोबत खेळतो, बागडतो, त्यांच्यासारखेच लहान होतो.

तसे पाहिले तर आपण आपल्या नवीन आयुष्याला ख-या अर्थाने सुरुवात करीत असतो. बालक जसे आपल्या बालपणी आयुष्याची सुरुवात करीत असते, तसेच निवृत्त माणसाच्या आयुष्याची दुसरी सुरुवात देखील येथूनच निवृत्तीतूनच होत असते. त्यांची देखील स्थिती त्या निरागस बालकाप्रमाणेच असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते निरागस वृत्ती म्हणजेच निवृत्ती.

निवृत्तीचा दुसरा अर्थ म्हणजे सायंकाळ.

मानवाची पहाटे उठल्यापासून जी आयुष्याची सुरुवात होते ती सायंकाळ होईपर्यंत सातत्याने चालूच असते. अर्थात सायंकाळ म्हणजेच निवृत्तीचा काळ.

दिवसभर धावपळ करून, काबाडकष्ट करून मानव संध्याकाळी आपल्या घराकडे जसा परत फिरत असतो, तसाच तो आयुष्यभर धावपळ करून सरतेशेवटी निवृत्तीकडे प्रयाण करीत असतो. हा काळ मानवाची सायंकाळ होय. सायंकाळनंतर येते ती रात्र. म्हणजेच कार्य समाप्तिचा कालावधी. निवृत्तीनंतर मानवाची वाटचालही त्याच्या आयुष्याच्या समाप्तिकडेच सुरू झालेली असते.

अस्मादिकानी  एके ठिकाणी म्हटलेलेच आहे,

आनंद जाहला मनी
  या निवृत्तीच्या क्षणी
पाहूनीया माळा गळा
  आनंदची होई सकळा
कर्तव्यातून झाली मुक्ती
  नाही आता कामाची सक्ती
मुक्तपणे हिंडा-फिरा
  मनसोक्तपणे मारा चकरा
दिस येतील, दिस जातील
  लोक मात्र म्हणतील,
  "रामकृष्णहरि, रामकृष्णहरि".....!!!
...........(मयुर तोंडवळकर)...........

Friday, September 30, 2016

उरीवरचा हल्ला

उरी वरचा हल्ला
उरावरच बसला
वाटले उगाच हल्ला केला
उरच बड़वूनी घेतला

उरी वरचा हल्ला
महागातच पडला
आतंकवादीयांचा रखवाला
सा-या जगासमोर
   उघड़ाच की हो पड़ला

उरी वरचा हल्ला
बोबड़ीच वळवूनी गेला
वाटले नव्हते मजला (पाक)
माझ्यावरीच (पाक) तो उलटला

उरी वरचा हल्ला
माझ्या उरातच की हो घुसला
सा-या जगताने त्याला
उचलूनीच की हो धरला

उरी वरचा हल्ला
नव्हती कल्पना कुणाला
आतंकवादीयांचा हौसला
वेळच्या वेळीच जाईल चिरड़ला

उरी वरचा हल्ला
आतंकवादीयानी होता केला
वाटले होते त्या देशाला (पाक)
नमविल भारताला

पण अंगलट आले सगळे
आम्ही झालो दुबळे (पाक)
भारताने सर्जिकल केले
आणि प्लॅनच सगळे विस्कटले
................मयुर तोंड़वळकर

Tuesday, September 20, 2016

वृथा अभिमान जातीभेदांचा

वृथा अभिमान जातीभेदांचा
काय कामास येणार आहे?
राजकारण्यांच्या राजकारणाला
सामान्य माणूस बळी जाणार आहे......

हे व्यासपीठ नव्हे वादविवाद वाढविण्याचे,
हे व्यासपीठ आहे, सौहार्द वातावरणाचे,
येथे लिहिताना संयम बाळगावा,
कोणत्याही जाती धर्माचा प्रचार न करावा.......

कुठून आल्या ह्या जाती,
कुठून आले हे धर्म,
नाही आम्हास ते ज्ञात,
आम्ही आपले पळतो, त्यांच्याच शोधात.......

मी असे मराठा, मी असे ब्राह्मण,
आहे का मला माझी संपूर्ण ती जाण ?
वृथा बाळगतो मी जाती पातींचा अभिमान,
नाही मला त्याचे क्षणीकही भान......

माझ्याच शरीरात वसती भाग ते चार,
तयासच म्हणती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र
कां मग करीतो आपण विचार अभद्र ?
जात पात आणि जातीभेदांचा क्षुद्र........

जखम जर कां झाली मला,
रक्त वाहे त्यातून भळभळा,
रक्ताला नसे जातपातीचा लळा,
ते तर अंतरंगी लालच असे सकळा.........

मानवता हा असे माझा धर्म,
मी नाही करणार कोणताही अधर्म,
जाती भेदांच्या नावाखाली,
मुळीच नाही होऊ देणार, मी माझ्याकडून दुष्कर्म.......

नर आणि मादी, जाती असती दोन,
त्यातच सामावले विश्व अवघे कोण,
मग कां ही तेढी आणि जाती पातींचे भांडण,
कां बिघड़वती सामाजिक वातावरण........

Tuesday, December 29, 2015

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?

प्रवचनें ज्योतीला शुध्दत्वता करण्यासाठी
असतात.

हे प्रवचनरूपी स्नान आहे.
प्रवचन हे न्यानयुक्त प्रणवांची
आंघोळ असते. शुचि:र्भूत शुध्द
प्रणवांची आंघोळ करून तुम्ही
शुध्द व्हावे याकरीता प्रवचन असते.
कांही वेळेला अमृततुल्य प्रणव देखील
बाहेर फेकले जातात. तुमच्या मनावर
असलेली काजळी दूर करून तुम्हांला
तेजोमय बनविण्यासाठी ही प्रवचनें
असतात."
परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज
यांच्या प्रवचनातून साभार सादर.

Wednesday, October 21, 2015

केंळे - लाभदायक फळ


केळे - एक लाभदायक फळ !!!

लहान मुलांकरीता केळे हे अतिशय
लाभदायक असून विशेषकरून
खोकल्यामध्ये नैसर्गिक उपाय आहे.
केळे हे जसे लहानांना लाभदायक
आहे तसे ते मोठ्या माणसांसाठी
देखील तितकेच फायदेशीर आहे.

केळे हे स्वादिष्ट असून स्वास्थकारक
तसेच पौष्टिकही आहे. केळे खाणे हे
शरीराला फारच फायदेशीर ठरते. केळे
खाल्ल्याने शक्ती बरोबरच भरपूर मात्रे
मध्ये विटामिन-ए, विटामिन-बी
आणि मैग्नीशियम मिळत असते.
त्याचबरोबर केळ्यामध्ये विटामिन सी,
बी-6 पोटैशियम, थायमिन, राइबोफ्लेविन
सुद्धा असते, ज्यामुळे मुलांना त्याचा
फायदाच होतो.

परंतु आपणाला हे माहित आहे कां की
हे केळे खोकल्यामध्येसुद्धा एक
उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे,
त्याचबरोबर सततच्या खोकल्यामध्ये
आणि ब्रोंकाइटिस मध्येसुद्धा बरेच
लाभदायक आहे.

लहान मुलांच्या श्वसन आजारामध्ये
केळे हे विशीष्ट कारणांमुळे प्रभावी
आहे हे दिसून आलेले आहे. असे जरी
असले तरी मोठी माणसे देखील त्याचा
उपयोग करू शकतात.

पोटासाठी केळे हे लाभदायक असून
ते स्वास्थकारक तसेच स्वादिष्ट व
पौष्टिक सुद्धा आहे.

लहान मुलांच्या घशाच्या आजारामध्ये
किंवा त्याना जर एकसारखा खोकला
येत असेल त्यामध्ये केळ्यापासून
तयार करण्यात आलेले क्रिम अतिशय
अद्भुतरित्या काम करतांना दिसून येते.

हे अद्भुत क्रीम तयार करण्याची पद्धत -

क्रीम तयार करण्यासाठी लागणारी
सामग्री:

2 मध्यम आकाराची सालीवर छोटे
छोटे टिपके असलेली पिकलेली
पिवळी केळी (केमिकलमध्ये न
पिकविलेली केळी)

2 मोठे चमचे मध किंवा साखर
(जर कां तुम्ही यामध्ये मध घालणार
असाल तर तो मिश्रण थंड झाल्यावर
घालावा, कारण उच्च तापमानांत मध
आपल्या नैसर्गिक गुणांना हरवू शकतो)

400 मिलीलीटर उकळते पाणी

तयारी:
केळ्याची साल काढून टाका. नंतर
ते स्मँश करा. त्यासाठी लाकडी चमचा
मिळाल्यास अतिउत्तम. त्यानंतर
त्यामध्ये साखर घालून व्यवस्थित
मिसळून घ्या. आता ह्या पेस्टमध्ये
गरम पाणी घालून ते व्यवस्थित ३०
मिनीटांसाठी झाकून ठेवा.

आपणांस जर कां मधाचा वापर
करावयाचा असल्यास पेस्टला
थंड झाल्यवर मध त्यामध्ये मिसळा.
शेवटी हे मिश्रण गाळणीने गाळून
घ्या.

खाण्याची रित :

ह्या पेस्टला हलकेसे गरम करून
दिवसातून ४ वेळा घ्यावे. म्हणजेच
प्रत्येक वेळेला १०० मिलि.चे सेवन करावे.

उपचारासाठी आपल्याला रोज नविन
पेस्ट बनविणे गरजेचे आहे. कांही
दिवसातच आपला खोकला हा
महागड्या औषधांशिवायच बरा
झालेला दिसेल.

केळे हे नरम असल्याने आपल्या
गळ्यावर ते अनुकूल असा परिणाम
करते. घशांत खवखव असल्यास
ह्याच्या सेवनाने केणत्याही प्रकारे
अनिष्ट परिणाम होत नाहीत किंवा
घसा सुजत नाही आणि त्यामुळे
खातांना त्रास होत नाही.

केळ्यामध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३
टक्के प्रोटीन, २४.७ टक्के कार्बोहाइड्रेट
आणि ब-याच कमी प्रमाणांत
ग्लाइसेमिक इंडेक्स असते.

(हे उपाय करतांना आपल्या डॉक्टरांचा
सल्ला घेतल्यास उत्तम)

Tuesday, October 20, 2015

मराठी माणूस....!!!

मराठी माणूस.....👌
मराठी माणसाची
रित लय भारी
त्याच्या वागण्याची
रितच कांही न्यारी
........कुणी म्हणतसे
.......त्याला खेकडा
.........तर कुणी म्हणे
........हा अपुला बापडा
करीतसे गोष्टी
फार मोठ्या मोठ्या
धाव असे कुंपनापर्यंत
फार छोट्या छोट्या
..........व्यवहार करताना
..........भावनेला तो मध्येमध्ये आणि
..........फायद्याच्या गोष्टींवर
..........सोडून देई पाणी
भावना जेव्हा आड येई
तेव्हा पैसा त्याचा जाई
पैशाला पैसा खेचतो
याची जाण त्याला नाही
...........गरीबीतच राहण्यास
...........मानितसे धन्यता
..........मोठ मोठ्या गप्पा मारून
...........स्वत:ची फसवणुक करीतसे अन्यथा
म्हणूनच मराठी माणूस
दिसत नसे व्यवसायात
इमाने इतबारे सेवा करून
मान मिळविण्याचा प्रयत्न करीतो
धनिकांच्या दप्तरात
............राहणार नाही काय मागासलेला
............मग तो आर्थिक व्यवहारात?
............कसा बरे तो दिसू लागेल
............व्यापार उदिमात?
...........मयुर तोंडवळकर
दिनांक: १९ ऑक्टोबर २०१५

Thursday, October 15, 2015

पेरूने करा सहा आजारांवर मात


पेरूने करा सहा आजारांवर उपचार

पेरू हे फळ विटामिन सी, विटामिन ए, विटामिन बी2, ई आणि के, फाइबर, कँल्शियम, लोह, मँगेनीज, फॉस्परस सारख्या पोषक तत्वांचा सुंदर असा स्रोत आहे. ह्यामुळे बरेचसे आजार आपण बरे करू शकतो.

1 आजारी लोकांसाठी पेरू उपयुक्त
2 पेरूमुळे डोळे सुदृढ राहतात
3 त्वचेला चमक येते
4 मधुमेह्यांसाठी पेरू उपयुक्त
5 थॉयराइड नियंत्रित करतो
6 हृदया सम्बंधी आजारांपासून बचाव
7 कैंसर सारख्या धोक्यापासून बचाव

पेरूला सुपर फ्रुट म्हटल्यास कांही वावगे नाही होणार. हेच कशाला, संत्र्याच्या तुलनेत पेरूमध्ये चार पट
अधिक विटँमीन सी सापडते आणि एका लिंबूच्या तुलनेत दहा पट जास्त विटँमीन ए असते. सांगायचे तात्पर्य हे की एका पेरूमध्ये बरेचसे गुण लपलेले आहेत. येथेच पेरूचे विशेषत्व संपत नाही तर पेरूच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून सुटका करून घेता येते. तर चला पाहू या कोणकोणत्या आजारांपासून सुटका होते ती?

आपणांस कल्पना आहेच की रोजच्या कामकाजी जीवनांत बरेच जण हे सतत कॉम्प्युटरच्या पुढ्यात स्क्रीन समोर बसून काम करीत असतात. त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे हे अत्यंत जरूरीचे होऊन
बसले आहे. डोळ्यांच्या तेजस्वितेसाठी विटँमीन ए हे आवश्यक असे तत्व आहे आणि ते पेरूमध्ये भरपूर
प्रमाणात उपलब्ध असते व ते डोळे सुदृढ ठेवण्यास मदत करते. डोळ्याचा कॉर्निया हा भाग पेरूमुळे साफ
राहतो, तसेच डोळ्यांच्या सेल्सचेही संरक्षण केले जाते.

विटामिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. परंतु नियमितपणे पेरू खाल्ल्यास
रातांधळेपणा टाळता येऊ शकतो. वाढत्या वयानुसार. डोळ्यांच्या उद्भवणा-या समस्या पेरूच्या नित्य सेवनाने कमी केल्या जाऊ शकतात. डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी तद्य्न लोक पेरू खाण्यास किंवा पेरूचा रस घेण्यास सांगतात.

प्रदूषण किती प्रमाणात वाढले आहे ह्याची चर्चा येथे करण्यात काहीच उपयोग नाही. परंतु येथे हे सांगणे
गरजेचे आहे की प्रदूषणामुळ कशाप्रकारे आपली त्वचा प्रभावित होते. इतकेच नव्हे तर कमी वयातच त्वचेवर
सुरकुत्या पडायला सुरूवात होते. तसेच चेहरा काळवंडतो, ह्या सगळ्या समस्यांपासून सुटका
होण्यासाठी पेरू हा त्यावरील एक चांगला उपाय होय. पेरू, विशेषत्वाने लाल पेरूमध्ये एंटीआक्सीडेंट
प्रोपर्टीज़ पहाण्यात येतात. एंटी ऑक्सीडेंट त्वचेला होणा-या क्षतीपासून रक्षण करीतो. इतकेच नव्हे
तर रोज पेरू खाल्ल्याने चेहरा टवटवीत होतो. तसेच शुष्कतेपासूनही बचाव होतो.

मधुमेह हा आजचा सगळ्यात महत्वाचा  असा आजार आहे. एखादेच घर असे असेल जेथे मधुमेहाचे रूग्ण
सापडणार नाहीत. वास्तवात मधुमेह हा अतिशय वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.

चीनी चिकित्सकीय प्रणालीमध्ये मधुमेहासाठी कित्येक वर्षापासून पेरूचा इलाज केला जात आहे. त्याचप्रमाणे तमाम शोध आणि अभ्यासाद्वारे ह्या गोष्टीवर
शिक्कामोर्तब करण्यात आले आहे की मधुमेहाच्या रोग्यांमध्ये पेरू हा अतिशय लाभकारी आहे.

पेरूमध्ये असणारे फायबर (तंतूमय) साखरेचा स्तर नियंत्रित करीत असतात. विशेषद्न्यांच्या मते दर
दिवशी एक किंवा दोन पेरू अवश्य खावेत. तसेच मधुमेहाचे प्रमाण जास्त असणा-या रोग्यांनी पेरूच्या पानांची चहा पिण्यास हरकत नाही.

पेरूमध्ये कॉपर म्हणजे तांबे मुबलक प्रमाणात सापडते, जे थॉयरॉईडसाठी आवश्यक तत्व आहे. वास्तवात
कॉपर हे हारमोनचे उत्पादन नियंत्रित करीत असते. पेरूमध्ये पोटँशियमसुद्धा सापडते, जे तत्व थॉयरॉईडसाठी महत्वपुर्ण असे आहे. ह्या शिवाय
पेरूमुळे आपले वजन नियंत्रित राखण्यास मदत होत असते. परिणामस्वरूप आपली ऊर्जा योग्य
राखण्यास मदत मिळते.

थॉयराइडपासून बचाव होण्यासाठी स्वास्थ्य चिकित्सकांचे हे मानने आहे कि पेरू ह्या फळाला आपल्या नियमित जीवनशैलीचाच एक भाग बनवा. इतकेच नव्हे तर पेरूच्या पानांची चहा नियमित सेवन करणे हे देखील आरोग्याला उपकारक होय.

हृदयासम्बंधीत आजार हे हल्ली नित्याची बाब झालेली दिसून येते. कमी वयापासून ते वयस्करांमध्ये हृदयासम्बंधीत आजाराने ग्रस्त झालेले रोगी दिसून येतात आणि त्यासाठीच हृदय रोगापासून वाचण्यासाठी ठोस उपाय शोधणे गरजेचे झाले आहे.

तमाम शोध व अध्ययनांद्वारे हे निश्चीत झाले आहे की नियमीतरित्या पेरू खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण करता येते तसेच शरीरातील चरबीही कमी होते.

वास्तवात पेरूमध्ये असणारी विटामिन सी, पोटँशियम ही तत्वे ह्याला जबाबदार आहेत. खरे सांगायचे तर
पोटँशियम हार्टबीट नियमित राखत असते उच्च रक्तदाबालाही नियंत्रित ठेवण्यास तेवढेच जबाबदार असते.

पेरूमध्ये कँसर रोधी आणि ट्यूमर रोधी तत्व जसे लाइकोपीन, विटामिन सी, पोलिफेनोल्स अस्तित्वात असतात, त्यामुळे नियमितपणे पेरू खाल्ल्यास
कँसर आणि ट्यूमरचा धोका कमी केला जाऊ शकतो. पेरूच्या नित्य सेवनाने प्रोस्टेट कँसरचा आकार देखील कमी केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर ब्रेस्ट म्हणजे स्तन किंवा छाती, तोंड, पोट, फुफ्फुस आदी कँसर केसेसमध्ये पेरू हा लाभदायी असल्याचे सिद्ध झालेले आहे.

Saturday, September 26, 2015

पाणी पिणे
आपणा सगळ्यांना माहित असते कि दिवसातून जवळ जवळ २ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे, तरी ते आपणाकडून होत नाही. मग त्यासाठी काही उपाय आहेत कां असे कोणी विचारले तर नक्कीच सांगता येईल कि हो, ते उपाय आहेत.
आपणास माहित आहेच कि, शरीराला पाणी किती आवश्यक आहे, कारण आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानव हा अन्नाविना काही दिवस काढू शकतो, परंतु पाण्याविना जीवित राहणे कठीण आहे. पाणी हे शरीराच्या निर्मितीसाठी तसेच पोषण करण्यासाठी अति महत्वपूर्ण भूमिका बजावत असते आणि त्यामुळेच त्याचे शरीरात पर्याप्त मात्रेमध्ये जाने अति आवश्यक होवून बसते आणि असे असतांना दोन लीटर पाणी पिणे जे शरीरास आवश्यक आहे ते देखील आपण पीत नाही. आपल्या शरीरास आवश्यक असणारे हे पाणी योग्य प्रमाणात शरीरात जाण्यासाठी काही उपाय आपणास करता येतील ते खालीलप्रमाणे होत :
लक्ष्य निर्धारित करणे:
ह्यासाठी आपण ह्या अगोदर किती पाणी पीत होतो आणि आता आपण किती पाणी प्यावयाचे आहे त्याचे लक्ष्य निर्धारित केल्यास, हे करणे सोपे जाईल. ह्यावर एक उपाय करता येईल तो म्हणजे आपली नेहमीची बाटली निश्चित करून जी निरनिराळ्या आकारांची तसेच रंगीत चित्रमय असू शकेल, त्यातूनच पाणी पिणे. हा उपाय लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
पाण्याची बाटली नेहमी आपल्या सोबत ठेवणे :
आपण ज्यावेळेस घराबाहेर काही कामानिमित्त पडतो, त्यावेळेस हि काळजी घ्यावी कि आपल्यासोबत पाण्याची बाटली सोबतच असेल.
रात्री झोपताना आपल्या सोबत पाण्याची बाटली देखील ठेवणे :
ह्याचा फायदा हा होतो कि रात्री झोपेतून उठल्यास व पाण्याची गरज भासल्यास ते सहजच उपलब्ध होवू शकेल. ह्यासोबतच झोपताना झोपण्यापूर्वी पाणी प्याल्यास “हार्ट-अटेक” सारखा भयंकर रोग टाळू शकतो.
बाटली नेहमी भरलेली ठेवा :
ह्या सवयीमुळे आपण जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवयच लावून घेतो.
योग्य तापमान असलेले पाणी पिणे:
काही लोक थंडगार पाणी पसंद करतात, तर काहीजण थोडे गरम असे पाणी पिणे पसंद करतात. काहीजण आहे त्या स्थितीतील तापमानातील पाणी पिणे पसंद करतात. तरी आपल्या पसंतीचे पाणी पिणे चांगले. तरी देखील जास्त थंडगार पाणी पिणे हे आरोग्याला योग्य नव्हे ह्याची जाणीव ठेवूनच पाणी पिणे योग्य.
स्वादिष्ट पाणी पिणे:
काहीजणांना साधे पाणी पिण्याचा कंटाळा आला असल्यास, त्यात काही स्वाद मिसळून ते पाणी पिणे देखील जास्त पाणी पिण्याच्या दृष्टीने चांगले होय. ह्यामध्ये काही सरबतांचा समावेश होवू शकतो. जसे लिंबू सरबत, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, आमरस, संत्रा रस, नारियल पाणी वगैरे वगैरे.
इतर पेय पदार्थ घेणे:
ह्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे ज्यूस अर्थात रस घेणे, थोड्या प्रमाणात चाय कॉफ्फी सारखे पेय पदार्थ पिणे ह्यांचा समावेश होतो.
फलाहार घेणे :

ज्यावेळेस अगदी शक्य नसेल त्यावेळेस पाणी घेवून जाता आले नाही तर त्यासाठी फळांचा रस घेणे, पाणीदार फळे खाणे इत्यादी उपाय करणे देखील पाण्याची मात्र वाढविण्यासाठी अतिशय चांगला उपाय ठरू शकतो.

अनगडवाणी