Tuesday, September 18, 2018

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*

🙏💐🙏👏🙏💐🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*
*तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्*
............... *श्री भगवत गीता* .............

जे निष्काम व पूर्ण ज्ञानी आहे व *जे अनन्य भावयुक्त मला आत्मरूपाने जाणतात व माझे निरंतर चिन्तन करतात, स्मरण करतात* व सर्व उपासनेत श्रेष्ठ अशी निष्काम उपासना करतात, अशा माझ्या त्या परमार्थ ज्ञानी भक्तांचा *योगक्षेम* मी चालवितो. *अप्राप्य वस्तूची प्राप्ती येणे नाम योग व प्राप्य वस्तूचे रक्षण येणे नाम क्षेम होय.*  *योग आणि क्षेम* ही दोन्ही कामें मी स्वतः करीत असतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. ह्याचे कारण ज्ञानीयाला मी माझ्या आत्मास्वरूपा सारखाच आहे आणि ते मला प्रिय असल्यामुळें असे भक्त माझ्या आत्मरूपा सारखेच आहेत.

तद्वतच ह्या भक्तांव्यतिरिक्त इतर भक्तांचे योगक्षेमही भगवंतच चालवित असतात. परंतु ह्यामध्ये एक भेद आहे तो म्हणजे काही भक्त आहेत ते असे समजतात की त्यांचा योगक्षेम ते स्वतःच चालवितात. परंतु जे अनन्य साधारण भक्त आहेत ते असे म्हणत नाहीत. कारण ते *जीवन आणि मरण* ह्या वासनेत लिप्त होऊन राहत नाहीत. अशांचा योगक्षेमही भगवंतच करीत असतो.
🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

No comments:

अनगडवाणी