Tuesday, September 18, 2018

तुकोबांचे अभंग

🙏👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

*आतां माझ्या भावा ।*
   *अंतराय नको देवा ॥1॥*

येथे तुकाराम महाराज म्हणतात, "आता माझ्या भावा" म्हणजे माझी जी भगवंता तुझ्याप्रत भावना आहे, ती तशीच तुझ्याप्रत प्रेमाची राहू दे. तिच्यात अंतर पडू देऊ नकोस. ती अधिकाधीक वृद्धींगत होऊ दे.

*आलें भागा तें करितों ।*
    *तुझें नाम उच्चारितों ॥2॥*

पुढे ते म्हणतात,"जे माझ्या भाग्यात आले ते मी करीत राहीन, ते म्हणजे सदासदैव तुझेच नाम उच्चारीत राहीन. तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नकोस, हीच तुझीया चरणी नम्र विनंती.

*दृढ माझें मन।*
     *येथें राखावें बांधोन ॥3॥*

त्यासाठी माझे हे उच्छृंखल मन आहे, जे सदानकदा इथे तिथे भरकटत असते, त्याला तुच तुझ्या शक्तीने तुझ्याच चरण कमलाशी असे बांधोनी ठेव की त्याला इकडे तिकडे धावता येणार नाही.

*तुका म्हणे वाटे ।*
   *नको फुटों देऊं फांटे॥4॥*

शेवटी तुकोबा राय म्हणतात,"हा भक्तीमार्ग अनुसरताना माझ्या मनात शुद्ध भाव निर्माण कर. त्यात तर्क वितर्कांचे फाटे फुटू देऊ नकोस. सदोदित माझे मन आपल्या चरणांवर रत राहू दे."

........................अनगड बुवा.............................

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

No comments:

अनगडवाणी