मयुरटीका........वास्तविका.....!!!
ही नव्हे वात्रटिका,
तर ही आहे वास्तविका......!!!
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
पळून गेली श्रीमंती......!!!
बजेटने दिला दणका,
पेट्रोल / डिझेलचा
उडाला भडका,
सामान्य माणसांच्या
जीवनाला,
लागला भाववाढीचा
तडका......!!
विमान प्रवास महागला,
होटेल / ट्रान्सपोर्ट कडाडला,
रोजच्या धड्फडीत सामान्य
आपोआपच कलंडला,,,,,,,,!!
चार महिने अगोदर
तिकीट बुक करा,
‘कन्फर्म’ तिकीट
नाही मिळाले तर,
‘वेटिंग लिस्ट’ चा
सोपा,
मार्ग अनुसारा......!!
“शाकाहार” करावा तर भाज्या कडाडल्या,
“मांसाहार” करावा तर बाजार-भावही भडकला,
खावे काय? प्यावे काय? काहीच कळेना,
भाव-वाढीमुळे माणसांचे चित्त स्थिर
होईना....!!
महाग झाली भ्रमंती,
महाग झाल्या गमती,
जमती,
वाढलेले बाजार-भाव
पाहून,
पळून गेली
श्रीमंती......पळून गेली श्रीमंती.......!!!!