पाणी पिणे
आपणा सगळ्यांना माहित असते
कि दिवसातून जवळ जवळ २ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे, तरी ते आपणाकडून होत नाही. मग
त्यासाठी काही उपाय आहेत कां असे कोणी विचारले तर नक्कीच सांगता येईल कि हो, ते
उपाय आहेत.
आपणास माहित आहेच कि,
शरीराला पाणी किती आवश्यक आहे, कारण आपल्या शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने
व्यापलेला आहे. मानव हा अन्नाविना काही दिवस काढू शकतो, परंतु पाण्याविना जीवित राहणे
कठीण आहे. पाणी हे शरीराच्या निर्मितीसाठी तसेच पोषण करण्यासाठी अति महत्वपूर्ण
भूमिका बजावत असते आणि त्यामुळेच त्याचे शरीरात पर्याप्त मात्रेमध्ये जाने अति
आवश्यक होवून बसते आणि असे असतांना दोन लीटर पाणी पिणे जे शरीरास आवश्यक आहे ते
देखील आपण पीत नाही. आपल्या शरीरास आवश्यक असणारे हे पाणी योग्य प्रमाणात शरीरात
जाण्यासाठी काही उपाय आपणास करता येतील ते खालीलप्रमाणे होत :
लक्ष्य
निर्धारित करणे:
ह्यासाठी
आपण ह्या अगोदर किती पाणी पीत होतो आणि आता आपण किती पाणी प्यावयाचे आहे त्याचे
लक्ष्य निर्धारित केल्यास, हे करणे सोपे जाईल. ह्यावर एक उपाय करता येईल तो म्हणजे
आपली नेहमीची बाटली निश्चित करून जी निरनिराळ्या आकारांची तसेच रंगीत चित्रमय असू
शकेल, त्यातूनच पाणी पिणे. हा उपाय लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
पाण्याची
बाटली नेहमी आपल्या सोबत ठेवणे :
आपण
ज्यावेळेस घराबाहेर काही कामानिमित्त पडतो, त्यावेळेस हि काळजी घ्यावी कि
आपल्यासोबत पाण्याची बाटली सोबतच असेल.
रात्री
झोपताना आपल्या सोबत पाण्याची बाटली देखील ठेवणे :
ह्याचा
फायदा हा होतो कि रात्री झोपेतून उठल्यास व पाण्याची गरज भासल्यास ते सहजच उपलब्ध
होवू शकेल. ह्यासोबतच झोपताना झोपण्यापूर्वी पाणी प्याल्यास “हार्ट-अटेक” सारखा
भयंकर रोग टाळू शकतो.
बाटली
नेहमी भरलेली ठेवा :
ह्या
सवयीमुळे आपण जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवयच लावून घेतो.
योग्य
तापमान असलेले पाणी पिणे:
काही
लोक थंडगार पाणी पसंद करतात, तर काहीजण थोडे गरम असे पाणी पिणे पसंद करतात. काहीजण
आहे त्या स्थितीतील तापमानातील पाणी पिणे पसंद करतात. तरी आपल्या पसंतीचे पाणी
पिणे चांगले. तरी देखील जास्त थंडगार पाणी पिणे हे आरोग्याला योग्य नव्हे ह्याची
जाणीव ठेवूनच पाणी पिणे योग्य.
स्वादिष्ट
पाणी पिणे:
काहीजणांना
साधे पाणी पिण्याचा कंटाळा आला असल्यास, त्यात काही स्वाद मिसळून ते पाणी पिणे
देखील जास्त पाणी पिण्याच्या दृष्टीने चांगले होय. ह्यामध्ये काही सरबतांचा समावेश
होवू शकतो. जसे लिंबू सरबत, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, आमरस, संत्रा रस, नारियल
पाणी वगैरे वगैरे.
इतर
पेय पदार्थ घेणे:
ह्यामध्ये
निरनिराळ्या प्रकारचे ज्यूस अर्थात रस घेणे, थोड्या प्रमाणात चाय कॉफ्फी सारखे पेय
पदार्थ पिणे ह्यांचा समावेश होतो.
फलाहार
घेणे :
ज्यावेळेस
अगदी शक्य नसेल त्यावेळेस पाणी घेवून जाता आले नाही तर त्यासाठी फळांचा रस घेणे,
पाणीदार फळे खाणे इत्यादी उपाय करणे देखील पाण्याची मात्र वाढविण्यासाठी अतिशय
चांगला उपाय ठरू शकतो.
No comments:
Post a Comment