केळे - एक लाभदायक फळ !!!
लहान मुलांकरीता केळे हे अतिशय
लाभदायक असून विशेषकरून
खोकल्यामध्ये नैसर्गिक उपाय आहे.
केळे हे जसे लहानांना लाभदायक
आहे तसे ते मोठ्या माणसांसाठी
देखील तितकेच फायदेशीर आहे.
केळे हे स्वादिष्ट असून स्वास्थकारक
तसेच पौष्टिकही आहे. केळे खाणे हे
शरीराला फारच फायदेशीर ठरते. केळे
खाल्ल्याने शक्ती बरोबरच भरपूर मात्रे
मध्ये विटामिन-ए, विटामिन-बी
आणि मैग्नीशियम मिळत असते.
त्याचबरोबर केळ्यामध्ये विटामिन सी,
बी-6 पोटैशियम, थायमिन, राइबोफ्लेविन
सुद्धा असते, ज्यामुळे मुलांना त्याचा
फायदाच होतो.
परंतु आपणाला हे माहित आहे कां की
हे केळे खोकल्यामध्येसुद्धा एक
उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे,
त्याचबरोबर सततच्या खोकल्यामध्ये
आणि ब्रोंकाइटिस मध्येसुद्धा बरेच
लाभदायक आहे.
लहान मुलांच्या श्वसन आजारामध्ये
केळे हे विशीष्ट कारणांमुळे प्रभावी
आहे हे दिसून आलेले आहे. असे जरी
असले तरी मोठी माणसे देखील त्याचा
उपयोग करू शकतात.
पोटासाठी केळे हे लाभदायक असून
ते स्वास्थकारक तसेच स्वादिष्ट व
पौष्टिक सुद्धा आहे.
लहान मुलांच्या घशाच्या आजारामध्ये
किंवा त्याना जर एकसारखा खोकला
येत असेल त्यामध्ये केळ्यापासून
तयार करण्यात आलेले क्रिम अतिशय
अद्भुतरित्या काम करतांना दिसून येते.
हे अद्भुत क्रीम तयार करण्याची पद्धत -
क्रीम तयार करण्यासाठी लागणारी
सामग्री:
2 मध्यम आकाराची सालीवर छोटे
छोटे टिपके असलेली पिकलेली
पिवळी केळी (केमिकलमध्ये न
पिकविलेली केळी)
2 मोठे चमचे मध किंवा साखर
(जर कां तुम्ही यामध्ये मध घालणार
असाल तर तो मिश्रण थंड झाल्यावर
घालावा, कारण उच्च तापमानांत मध
आपल्या नैसर्गिक गुणांना हरवू शकतो)
400 मिलीलीटर उकळते पाणी
तयारी:
केळ्याची साल काढून टाका. नंतर
ते स्मँश करा. त्यासाठी लाकडी चमचा
मिळाल्यास अतिउत्तम. त्यानंतर
त्यामध्ये साखर घालून व्यवस्थित
मिसळून घ्या. आता ह्या पेस्टमध्ये
गरम पाणी घालून ते व्यवस्थित ३०
मिनीटांसाठी झाकून ठेवा.
आपणांस जर कां मधाचा वापर
करावयाचा असल्यास पेस्टला
थंड झाल्यवर मध त्यामध्ये मिसळा.
शेवटी हे मिश्रण गाळणीने गाळून
घ्या.
खाण्याची रित :
ह्या पेस्टला हलकेसे गरम करून
दिवसातून ४ वेळा घ्यावे. म्हणजेच
प्रत्येक वेळेला १०० मिलि.चे सेवन करावे.
उपचारासाठी आपल्याला रोज नविन
पेस्ट बनविणे गरजेचे आहे. कांही
दिवसातच आपला खोकला हा
महागड्या औषधांशिवायच बरा
झालेला दिसेल.
केळे हे नरम असल्याने आपल्या
गळ्यावर ते अनुकूल असा परिणाम
करते. घशांत खवखव असल्यास
ह्याच्या सेवनाने केणत्याही प्रकारे
अनिष्ट परिणाम होत नाहीत किंवा
घसा सुजत नाही आणि त्यामुळे
खातांना त्रास होत नाही.
केळ्यामध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३
टक्के प्रोटीन, २४.७ टक्के कार्बोहाइड्रेट
आणि ब-याच कमी प्रमाणांत
ग्लाइसेमिक इंडेक्स असते.
(हे उपाय करतांना आपल्या डॉक्टरांचा
सल्ला घेतल्यास उत्तम)
No comments:
Post a Comment