Thursday, April 23, 2015

वडीलधारा सल्ला

वडीलधारा सल्ला

फेसबुक म्हणा, व्हॉट्स अप म्हणा,
हे माध्यम नसे वयस्कारांचे,
ट्वीटर म्हणा, बीटर म्हणा,
हे माध्यम असे तरुणाईचे.........!!!

तरुणाईच्या ग्रुपमध्ये,
करा त्यासाठी एकच नियम,
वयस्करांनी जावू नका तेथे,
हेच पाळा संयमन........!!!

ग्रुपच करायचा असेल अपुला,
तर ग्रुपमध्ये असतील वयस्कर,
हीच काळजी घ्या वयस्करांनो,
विसरा बाकी सोयीस्कर.........!!!

आपण जेव्हा जाता,
तरुणाईच्या ग्रुपमध्ये,
मुस्कटदाबी होते तरुणाईची,
तरुणाईच्या स्वतःच्या ग्रुपमध्ये.......!!!
.....................मयुर तोंडवळकर.........

Saturday, February 7, 2015

एक मालवणी कविता !!!

एक मालवणी कविता !!!
चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
कोकणी माणूस लय लय बरे....

शिवीगाळये घालतत खरे,
मनांत त्यांच्या काय नाय बरे.....
करवंदा खावची तर कोकणात
जावचा,
डोंगरातून फिरतांना, मजा लय
गावता....
नदी किनारी झाडा बघा
नारळाची,
पाणी पिता तेतूरला, स्वर्गच
गावता.....
हिरवी हिरवी गार आंब्याची
तोरा,
काजीचो रंग बघा लाली लाल
जरा....
जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका
ठाऊक हा,
पण डायाबिटीसवाल्यांका मात्र
लय लय भावता......
कापो आणि बरको, हे फणसाचे
प्रकार,
प्वॉटभर खाल्ल्यार वाढता
पोटाचो आकार.....
होडयेतून फिरतांना म्हणता,
वल्हव रे नाखवा,
मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका
कोकण दाखवा........इति
मयुर तोंडवळकर.

Saturday, September 13, 2014

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स.........!!!

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स.........!!!
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)

दारू पिऊन घालीत धिंगाणा,
म्हणू लागले चियर्स,
पायाखालची जमिन हलू लागली,
आणि झाले शेकर्स..........

सापडला त्यांना गड कोणता?
नावातच आहे सुधा,
हातातील पेला तोंडाला लागताच,
हरपू लागली ह्यांची बुधा...........

हरपलेल्या बुद्धीने,
एकत्र झाले ट्रेकर्स,
सुधा तोंडी लागताच,
नियमांचे झाले ब्रेकर्स..............

भान राहिले नाही त्यांना,
दारूच्या नशेत,
रात्रभर धिंगाणा केला,
सुधागडच्या कुशीत...............

शरमेने मान खाली घालावी,
असे होते त्यांचे कृत्य,
कसे म्हणावे महाराजांनी,
त्यांचे हे कृत्य स्तुत्य?............

सुधागडचे बुरुज शरमले,
त्यांच्या कृत्याने सगळे वरमले,
तरीही म्हणती ह्या अफवा असती,
नव्हती त्या रात्री तेथे आमची वसती................

काय म्हणावे ह्या बहाद्दरांना,
आणि अकलेच्या ह्या (कांद्यांना) सरदारांना,
आपल्या ह्या कृत्याचे समर्थन करता करता,
वेड्यातच काढती हे सगळ्यांना..........

...................................मयुर तोंडवळकर 

Sunday, July 13, 2014

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे......!!!

न टाकता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,
गळफास लावून घेवून मात्र प्रवासी आरामात निजे......!!!
वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी,

गावावी का या प्रवाशाची सगळ्यांनी थोरवी?

Wednesday, July 9, 2014

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!



पाहतो मी वाट चातकासारखी
आषाढ मासे प्रथम दिवसे,
परंतु कोणालाही चाहूल,
त्या पावसाची न दिसे..........

त्यातच आली जवळ आषाढी एकादशी,
वारीयांची वारी जवळ जात असे,
नामाचा गजर जोरदार झाला,
परंतु तो पाऊस तरीही न आला..........

पाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग.........

शेतकरी हवालदिल झाला,
शहरातही लोक झाले वेडेपिसे,
पाण्यावाचून माशाला वाटेल,
जीवन कसे जगावेसे?............

निराशेच्या ढगामुळे,
लागेल कां हो सगळ्यांना धग?
पाऊस नाही बरसला तर,
पाणी कसे मिळेल मग?...............
.........................मयुर तोंडवळकर



Tuesday, April 15, 2014

ओळखा पाहू हे कोण?

तळे राखी
तो पाणी चाखी,
हि ह्यांची राजनीति,
हलाखीची करीती,
हे जनतेची परिस्थिती,

ओळखा पाहू हे कोण?

Saturday, January 11, 2014

“स्त्री” एक विचार......

“स्त्री” “महिला” “मुलगी” किंवा “तनया” हे सगळे शब्द “स्त्रीलिंगी” आहेत. “पृथ्वी” हा देखील शब्द “स्त्रीलिंगीच” आहे.

आज काय दिसून येते कि स्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय. अशा परिस्थितीत “पृथ्वी” देखील सुटली नाहीयेय. पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय. पृथ्वीवरील वृक्षतोड, नैसर्गिक संपत्तीवर घाला घातला जातोय, यामुळे पृथ्वीवरील समतोल ढासळतोय. तिला आता ह्या विश्वभर होणाऱ्या अत्त्याचारांपासून परावृत्त करण्याची वेळ आलीय.

मग हे करणार कोण? तर आपणच. महिलांवरील अत्त्याचाराला आपणच कारणीभूत आहोत, तर पृथ्वीवरील अन्यायाला देखील आपणच कारणीभूत आहोत. अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत आपणच आपल्यावर बंधने घालून घेवून ह्या दोघांचे रक्षण करण्यास सरसावले पाहिजे. त्यासाठी अशी कृष्ण-कृत्ये करणाऱ्यांना वेळीच थांबविले पाहिजे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तरच आणि तरच आपल्या मुलींचे आपल्या माता-भगिनींचे, आपल्या पृथ्वीचे भवितव्य उज्ज्वल आहे अन्यथा ह्या दोघांचेही काही खरे नाही आणि त्याचबरोबर मानव समाजाचे देखील.


                                      मयुर तोंडवळकर  

Friday, November 15, 2013

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्य हे जगायचं असतं
क्षण आणि क्षण अनुभवायचं असतं...........!!
कधी तरी रडायचं असतं,
कधी कधी हसायचं असतं......................!!
मुलं मोठी होतात तशी, त्यांच्या कलानं घ्यायचं असतं,
सुनबाई घरात आल्यावर तर नातं आणि नातं जपायचं असतं...........!!
बालपणीच्या आठवणींवर आयुष्य हे पुढे ढकलायचं असतं,
मोठेपण आल्यावर,
त्याच आयुष्याला अनुभवाचं गाठोडं बांधायचं असतं........!!
बोलताना जिभेला हाड नसल्याची जान ठेवायचं असतं,
हातपाय गलितगात्र न होतील,
ह्याचही भान राखायचं असतं........!!
मनाच्या कप्प्या-कप्प्यांवर साचलेल्या जुनाट विचारांना
दूरवर फेकायचं असतं,
आयुष्यभर जपलेल्या हितकारक संस्कारांवर
उभं आयुष्य काढायचं असतं............!!
आयुष्य हे लढायचं असतं, आयुष्य हे कुढायचं नसतं,
आयुष्य हे येईल त्या प्रसंगांना सामोरं न्यायचं असतं........!!
आयुष्य हे रणांगणातून पळ काढायचं नसतं,
नको त्या प्रसंगांना टाळायचं असतं.........!!
कधी कधी माघार घेवूनसुद्धा,
आयुष्याच सोनं करायचं असतं........!!

Saturday, October 19, 2013

सोने

सोने

सोने शोधा, सोने शोधा,
साधुबाबांचे फर्मान आले,
निधर्मी म्हणविणारे सरकार,
ताबडतोब कामाला लागले......१

एक सरकार करते कायदा,
जादूटोणाविरोधी विधेयक आणून,
तर दुसरे सरकार राबवते कायदा,
साधुबाबांचे फर्मान ऐकून.......२

सोने शोधण्यासाठी लोटते जत्रा,
जनमाणसानसकट अधिकारी सतरा,
मिडिया म्हणा, वर्तमानपत्रे म्हणा,
सगळीकडे चर्चा, हा नाही नां खतरा?........३


Friday, August 23, 2013

गाव माझा, मी गावाचा.......!!!

गाव माझा, मी गावाचा, कोकण माझा देश,
फणसा सारखा काटेरी वरून, हाच असे माझा परिवेश.......!!!

आतून गरे बाहेर पडता, रसाळ म्हणा किंवा बरका कापा,
विसरतो मी माझ्या रागाचा अभिनिवेश.....!!!

काय वर्णावी गोडी ती आंब्याची, असे तो देवगड रत्नागिरीचा,
सारे त्याची वाहव्वा करिती, देश असो वा परदेश.....!!!

रस्ते जरी असले कोकणातले, नागमोडी वळणाचे,

माणसे मात्र कोकणी, करिती हृदयात प्रवेश.....!!!

उडविली त्यांची टोपी...!!!!

कांदा येतो आहे जाग्यावर,
रुपया जातो आहे झोपी,
त्रस्त झाली सारी जनता,

त्याने उडविली त्यांची टोपी...!!!!

Sunday, August 18, 2013

आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
नाही करणार दुनियादारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी आणलीत तुम्ही दुधारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी कापलात माना भारी,
आम्ही शांततेचेच पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
मौनाची केली आम्ही तयारी,
आम्ही शांततेचे पुजारी..........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
घेरलात जरी दिशा चारी,
आम्ही अपुले शांततेचे पुजारी.....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
हल्ला केलात अमुच्या वरी,
तरी आम्ही शांततेचेच पुजारी....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
कत्तल केली अमुच्या दारी,
तरी आम्ही अपुले शांततेचेच पुजारी......!!!



Wednesday, August 7, 2013

सांग सांग भोलानाथ......!!!

(भोलानाथांची आणि कवीची माफी मागून खालील विडंबन गीत सादर करीत आहे)

सांग सांग भोलानाथ,
खड्डे पडतील काय?
खड्ड्यांमध्ये जावून माझी
गाडी फसेल काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
रस्ते उखडतील काय?
रस्त्यांमधून चालताना,
त्यात माणसे पडतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
खाच-खळगे होतील काय?
खाच-खळगे पार करतांना,
नाकी नऊ येतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!


...............मयुर तोंडवळकर-(०७-०८-२०१३)

Friday, August 2, 2013

कुठे ती दुर्गा........!!!

कुठे ती दुर्गा,
कुठे कुणाची वाचाळता,
एकीचे कार्य मोठे,
तर एकीची गचाळता.........!
एकीने घेतली नाराजी,
लोकांचे कार्य करताना,
तर एकीने घेतली नाराजी,
नको ते बोलताना...........!!
अस्मितेचा प्रश्न असे हा,
मराठी आणि महाराष्ट्राचा,
म्हणून सगळ्यांनी सावध रहावे,

वाचाळता करताना............!!!

Wednesday, July 17, 2013

डांस बार !!!

डांस बार !!!

डांस बार,
करती गार,
गि-हाईके त्यांची,
सगळी माहितगार.....१
सरकारी मामला,
कोर्टात फसला,
सुप्रीम कोर्टाने,
दिला फैसला.........२
चालू राहू द्या,
पोट भरु द्या,
बंधन त्यांच्यावर,
टाकू नका........३
नाचणे, बागडणे,
हा नाही गुन्हा,
पुन्हा असे,
तुम्ही करू नका........४
मी बाई नारी,
भोळी गं,
अंगात माझ्या
चोळी गं........५
आरोप माझ्यावर,
करता कसले,
मन रिझविन्याचे,
कामच आपले.....६
गि-हाईके येती,
मन रिझवीती,
त्यातच मी,
फसले गं......७ 
हे शब्द ऐकून,
मन झाले बेजार,
सामान्य माणसाने,
घेतला आजार......८
सरकारची तर,
बोबडीच वळली,
कार्य करण्याची,
शक्तीच गळली.......९
जावे तर,
जावे कोठे?
ह्याची मात्र,
संभ्रमणा वाढली.....१०
आता म्हणती,
फेरविचार करू,
चुकलेले निर्णय
आपण सुधारू......११
पण हे डांस बार
बंद करू,
डांस बार,
बंद करू.........१२

................मयुर तोंडवळकर.

अनगडवाणी