Saturday, January 11, 2014

“स्त्री” एक विचार......

“स्त्री” “महिला” “मुलगी” किंवा “तनया” हे सगळे शब्द “स्त्रीलिंगी” आहेत. “पृथ्वी” हा देखील शब्द “स्त्रीलिंगीच” आहे.

आज काय दिसून येते कि स्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय. अशा परिस्थितीत “पृथ्वी” देखील सुटली नाहीयेय. पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय. पृथ्वीवरील वृक्षतोड, नैसर्गिक संपत्तीवर घाला घातला जातोय, यामुळे पृथ्वीवरील समतोल ढासळतोय. तिला आता ह्या विश्वभर होणाऱ्या अत्त्याचारांपासून परावृत्त करण्याची वेळ आलीय.

मग हे करणार कोण? तर आपणच. महिलांवरील अत्त्याचाराला आपणच कारणीभूत आहोत, तर पृथ्वीवरील अन्यायाला देखील आपणच कारणीभूत आहोत. अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत आपणच आपल्यावर बंधने घालून घेवून ह्या दोघांचे रक्षण करण्यास सरसावले पाहिजे. त्यासाठी अशी कृष्ण-कृत्ये करणाऱ्यांना वेळीच थांबविले पाहिजे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तरच आणि तरच आपल्या मुलींचे आपल्या माता-भगिनींचे, आपल्या पृथ्वीचे भवितव्य उज्ज्वल आहे अन्यथा ह्या दोघांचेही काही खरे नाही आणि त्याचबरोबर मानव समाजाचे देखील.


                                      मयुर तोंडवळकर  

No comments:

अनगडवाणी