Sunday, July 13, 2014

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे......!!!

न टाकता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,
गळफास लावून घेवून मात्र प्रवासी आरामात निजे......!!!
वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी,

गावावी का या प्रवाशाची सगळ्यांनी थोरवी?

Wednesday, July 9, 2014

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!



पाहतो मी वाट चातकासारखी
आषाढ मासे प्रथम दिवसे,
परंतु कोणालाही चाहूल,
त्या पावसाची न दिसे..........

त्यातच आली जवळ आषाढी एकादशी,
वारीयांची वारी जवळ जात असे,
नामाचा गजर जोरदार झाला,
परंतु तो पाऊस तरीही न आला..........

पाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग.........

शेतकरी हवालदिल झाला,
शहरातही लोक झाले वेडेपिसे,
पाण्यावाचून माशाला वाटेल,
जीवन कसे जगावेसे?............

निराशेच्या ढगामुळे,
लागेल कां हो सगळ्यांना धग?
पाऊस नाही बरसला तर,
पाणी कसे मिळेल मग?...............
.........................मयुर तोंडवळकर



Tuesday, April 15, 2014

ओळखा पाहू हे कोण?

तळे राखी
तो पाणी चाखी,
हि ह्यांची राजनीति,
हलाखीची करीती,
हे जनतेची परिस्थिती,

ओळखा पाहू हे कोण?

Saturday, January 11, 2014

“स्त्री” एक विचार......

“स्त्री” “महिला” “मुलगी” किंवा “तनया” हे सगळे शब्द “स्त्रीलिंगी” आहेत. “पृथ्वी” हा देखील शब्द “स्त्रीलिंगीच” आहे.

आज काय दिसून येते कि स्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय. अशा परिस्थितीत “पृथ्वी” देखील सुटली नाहीयेय. पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय. पृथ्वीवरील वृक्षतोड, नैसर्गिक संपत्तीवर घाला घातला जातोय, यामुळे पृथ्वीवरील समतोल ढासळतोय. तिला आता ह्या विश्वभर होणाऱ्या अत्त्याचारांपासून परावृत्त करण्याची वेळ आलीय.

मग हे करणार कोण? तर आपणच. महिलांवरील अत्त्याचाराला आपणच कारणीभूत आहोत, तर पृथ्वीवरील अन्यायाला देखील आपणच कारणीभूत आहोत. अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत आपणच आपल्यावर बंधने घालून घेवून ह्या दोघांचे रक्षण करण्यास सरसावले पाहिजे. त्यासाठी अशी कृष्ण-कृत्ये करणाऱ्यांना वेळीच थांबविले पाहिजे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तरच आणि तरच आपल्या मुलींचे आपल्या माता-भगिनींचे, आपल्या पृथ्वीचे भवितव्य उज्ज्वल आहे अन्यथा ह्या दोघांचेही काही खरे नाही आणि त्याचबरोबर मानव समाजाचे देखील.


                                      मयुर तोंडवळकर  

Friday, November 15, 2013

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्य हे जगायचं असतं
क्षण आणि क्षण अनुभवायचं असतं...........!!
कधी तरी रडायचं असतं,
कधी कधी हसायचं असतं......................!!
मुलं मोठी होतात तशी, त्यांच्या कलानं घ्यायचं असतं,
सुनबाई घरात आल्यावर तर नातं आणि नातं जपायचं असतं...........!!
बालपणीच्या आठवणींवर आयुष्य हे पुढे ढकलायचं असतं,
मोठेपण आल्यावर,
त्याच आयुष्याला अनुभवाचं गाठोडं बांधायचं असतं........!!
बोलताना जिभेला हाड नसल्याची जान ठेवायचं असतं,
हातपाय गलितगात्र न होतील,
ह्याचही भान राखायचं असतं........!!
मनाच्या कप्प्या-कप्प्यांवर साचलेल्या जुनाट विचारांना
दूरवर फेकायचं असतं,
आयुष्यभर जपलेल्या हितकारक संस्कारांवर
उभं आयुष्य काढायचं असतं............!!
आयुष्य हे लढायचं असतं, आयुष्य हे कुढायचं नसतं,
आयुष्य हे येईल त्या प्रसंगांना सामोरं न्यायचं असतं........!!
आयुष्य हे रणांगणातून पळ काढायचं नसतं,
नको त्या प्रसंगांना टाळायचं असतं.........!!
कधी कधी माघार घेवूनसुद्धा,
आयुष्याच सोनं करायचं असतं........!!

Saturday, October 19, 2013

सोने

सोने

सोने शोधा, सोने शोधा,
साधुबाबांचे फर्मान आले,
निधर्मी म्हणविणारे सरकार,
ताबडतोब कामाला लागले......१

एक सरकार करते कायदा,
जादूटोणाविरोधी विधेयक आणून,
तर दुसरे सरकार राबवते कायदा,
साधुबाबांचे फर्मान ऐकून.......२

सोने शोधण्यासाठी लोटते जत्रा,
जनमाणसानसकट अधिकारी सतरा,
मिडिया म्हणा, वर्तमानपत्रे म्हणा,
सगळीकडे चर्चा, “हा नाही नां खतरा?”........३


Friday, August 23, 2013

गाव माझा, मी गावाचा.......!!!

गाव माझा, मी गावाचा, कोकण माझा देश,
फणसा सारखा काटेरी वरून, हाच असे माझा परिवेश.......!!!

आतून गरे बाहेर पडता, रसाळ म्हणा किंवा बरका कापा,
विसरतो मी माझ्या रागाचा अभिनिवेश.....!!!

काय वर्णावी गोडी ती आंब्याची, असे तो देवगड रत्नागिरीचा,
सारे त्याची वाहव्वा करिती, देश असो वा परदेश.....!!!

रस्ते जरी असले कोकणातले, नागमोडी वळणाचे,

माणसे मात्र कोकणी, करिती हृदयात प्रवेश.....!!!

उडविली त्यांची टोपी...!!!!

कांदा येतो आहे जाग्यावर,
रुपया जातो आहे झोपी,
त्रस्त झाली सारी जनता,

त्याने उडविली त्यांची टोपी...!!!!

Sunday, August 18, 2013

आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
नाही करणार दुनियादारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी आणलीत तुम्ही दुधारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी कापलात माना भारी,
आम्ही शांततेचेच पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
मौनाची केली आम्ही तयारी,
आम्ही शांततेचे पुजारी..........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
घेरलात जरी दिशा चारी,
आम्ही अपुले शांततेचे पुजारी.....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
हल्ला केलात अमुच्या वरी,
तरी आम्ही शांततेचेच पुजारी....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
कत्तल केली अमुच्या दारी,
तरी आम्ही अपुले शांततेचेच पुजारी......!!!



Wednesday, August 7, 2013

सांग सांग भोलानाथ......!!!

(भोलानाथांची आणि कवीची माफी मागून खालील विडंबन गीत सादर करीत आहे)

सांग सांग भोलानाथ,
खड्डे पडतील काय?
खड्ड्यांमध्ये जावून माझी
गाडी फसेल काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
रस्ते उखडतील काय?
रस्त्यांमधून चालताना,
त्यात माणसे पडतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
खाच-खळगे होतील काय?
खाच-खळगे पार करतांना,
नाकी नऊ येतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!


...............मयुर तोंडवळकर-(०७-०८-२०१३)

Friday, August 2, 2013

कुठे ती दुर्गा........!!!

कुठे ती दुर्गा,
कुठे कुणाची वाचाळता,
एकीचे कार्य मोठे,
तर एकीची गचाळता.........!
एकीने घेतली नाराजी,
लोकांचे कार्य करताना,
तर एकीने घेतली नाराजी,
नको ते बोलताना...........!!
अस्मितेचा प्रश्न असे हा,
मराठी आणि महाराष्ट्राचा,
म्हणून सगळ्यांनी सावध रहावे,

वाचाळता करताना............!!!

Wednesday, July 17, 2013

डांस बार !!!

डांस बार !!!

डांस बार,
करती गार,
गि-हाईके त्यांची,
सगळी माहितगार.....१
सरकारी मामला,
कोर्टात फसला,
सुप्रीम कोर्टाने,
दिला फैसला.........२
चालू राहू द्या,
पोट भरु द्या,
बंधन त्यांच्यावर,
टाकू नका........३
नाचणे, बागडणे,
हा नाही गुन्हा,
पुन्हा असे,
तुम्ही करू नका........४
मी बाई नारी,
भोळी गं,
अंगात माझ्या
चोळी गं........५
आरोप माझ्यावर,
करता कसले,
मन रिझविन्याचे,
कामच आपले.....६
गि-हाईके येती,
मन रिझवीती,
त्यातच मी,
फसले गं......७ 
हे शब्द ऐकून,
मन झाले बेजार,
सामान्य माणसाने,
घेतला आजार......८
सरकारची तर,
बोबडीच वळली,
कार्य करण्याची,
शक्तीच गळली.......९
जावे तर,
जावे कोठे?
ह्याची मात्र,
संभ्रमणा वाढली.....१०
आता म्हणती,
फेरविचार करू,
चुकलेले निर्णय
आपण सुधारू......११
पण हे डांस बार
बंद करू,
डांस बार,
बंद करू.........१२

................मयुर तोंडवळकर.

Tuesday, July 9, 2013

रुपयाची एकसष्ठी !!!

रुपयाची एकसष्ठी !!!

सरकारी नाकर्तेपणाच्या धोरणामुळे,
रुपयाने गाठली एकसष्ठी,
जनसामान्यांनी करावे तर करावे काय -

काढावीत फक्त खरकटी आणि उष्ठी ?

Sunday, July 7, 2013

बुद्धांची गया बोधगया !

बुद्धांची गया बोधगया !

बुद्धांची गया बोधगया,
स्फोट घडवून आणून,
घालविली तिची रया,

शांतीचा केला खात्मा,
कसा बरे शांत होईल,
ह्या नराधमांचा आत्मा?


...................मयुर तोंडवळकर 

Friday, June 7, 2013

मदार त्या पाण्यावर !!!

मदार त्या पाण्यावर !!!

रक्ताचे पाणी झाले,
आणि बरसले छाताडावर,
पाणी पिऊन लोक X X करतात,
खुल्या मोकळ्या भिंताडावर.........

वाट बघतो तो शेतकरी,
पाणी कधी बरसणार,
चातकासारखे पक्षी सारे,
पाण्यासाठी केवळ तरसणार.......

एवढ्यात येती घन दाटून,
आपल्याच डोक्यावर,
काळोखी ती रात्र सरावी,
सर्वस्व मदार त्या पाण्यावर......
...................................मयुर तोंडवळकर

Friday, May 10, 2013

ओळखा पाहू मी कोण?


ओळखा पाहू मी कोण?
जेथे जातो,
तेथे मी खातो,
संपूर्ण खात्याला
मी बरबटवतो,
ओळखा पाहू मी कोण?
      भाषणबाजी करतो,
      नारेबाजी करतो,
      लोकांना भडकविण्याचे
      काम मी करतो,
      ओळखा पाहू मी कोण?
लोक येतात,
लोक जातात,
मागितलेली माहिती
देण्याचे टाळतात,
ओळखा पाहू मी कोण?
            मयूर तोंडवळकर 

Sunday, May 5, 2013

तरच आपला निभाव लागणार हाय............!!!


दोन सिमान्वरचे,  
दोन्हीही वैरी, झाडती फैरी, 
तरी आपण गप्प बसावे काय? 
गप्प बसण्याव्यतिरिक्त,  
आपण दुसरे काय करणार आहोत कि नाय ? 
किती दिवस लोकशाहीचे स्तोम माजवावे?   
ह्याला काय कालगणना आहे कि नाय? 

षंढत्वाची धरुनी कास, 
नाकर्तेपणाची धरुनी आस, 
मुत्सद्देगिरीची भाषा येथे कामाची नाय,  
एकाने खून केला,  
दुसर्र्याने सीमोलंघन केले, 
तरी सामोपचाराची भाषा वापरावी काय?  

हे कलियुग आहे,   
येथे गांधीगिरी चालणार नाय,

येथे हवी शिवबांची कठोरता,  
येथे हवी सुभाष चंद्रांची नितीमत्ता,  
येथे हवी सावरकरांची दैदीप्त्यमानता,  
येथे हवी भगत सिंगांची चपलता,  
तरच आपला निभाव लागणार हाय
         तरच आपला निभाव लागणार हाय............!!!
.................................................मयुर तोंडवळकर .




Tuesday, April 30, 2013

भारतमाता धाय मोकलून रडली .......!!!

दिल्ली ते गल्ली,
बलात्कारानी भिजली,
कोण करील रक्षण आपल्या मायभगिनीनचे,
म्हणून भारतमाता धाय मोकलून रडली .......!!!

Wednesday, April 24, 2013

नराधम...........!!!


नराधमांना नसे जात,
नराधमांना नसे पात,
नराधमांना नसे वय,
नराधमांना नसे भय,
नराधमांना नसे कामधाम,
बलात्कार करण्यावाचून दुसरे काम,
नराधमांची एकच मानसिकता,
बलात्कार करणे हीच अगतिकता,
माता न म्हणती, भगिनी न म्हणती,
उठती सुटती स्त्रियांच्या चरित्रावर घाला घालती,
अशा नराधमांना काय बरे करावे?
ह्यांना फाशीवर लटकवावे कि,
      भर चौकात गोळ्या घालून मारावे?
ह्यांचे अवयव कलम करावे कि,
      ह्यांना यमसदनी धाडावे ?
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
    नका घेवू विषाची परीक्षा........!!!
..............................मयूर तोंडवळकर 

अनगडवाणी