एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीन शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतू शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले, तर सताने ! जरी अघोराना वरद्हस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापीटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतू अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार. अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात. अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करत आहोत.
कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरानी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापर युगापासून जेवढे अघोर अवतार कार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवाना शक्य होइल का? ज्यांच्यासाठी ओम् कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्या करिता अनन्तानी ओमकाराना आदेश देवून जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सुक्ष्माचा नाश तुम्ही कलीयुगी मानव करू शकता का? आपण पाहतोच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्दीकरण स्थिती होत असताना काही बलाढय, तर काही महाबलाढय, ८५० पाय-या च्या अघोर ज्योतीचा देखील नाश केला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी – सिद्धी, तंत्र – मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धी करणातून नाश केला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहेच,
आन्धळ्याशी जग सारेची आंधळे
No comments:
Post a Comment