Tuesday, October 12, 2010

सत् भक्तीचे स्वरूप

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला)


हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची. आपण जाणताच हाताच्या बाजू दोन. एक उजवी अन् दुसरी डावी. त्या दोन बाजुमध्ये उजवा गट भक्ती अन् डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना. अन् भक्तियुक्त उपासना कोणती तर अखंड नाम ! त्या परते दुसरे काही नाही. जे सत् पदाने अखंड नाम सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे, हेच त्याचे मर्म !! अशा स्थितीत राहिले ते ऋषी-मुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले !! अन् या चौकट मुनींच्या कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरूकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन् त्यांची गुरुकुले, राक्षस. अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी. तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मऋषी, सप्त ऋषी यांचा ताफा मात्र लहान होता. परंतू तेजस्वी होता, तेजोबलासहित होता. याचे कारण सत् कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या ! सत् त्यानाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती, सत् आणि तामस असलेले लोक हे त्यांचेच भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी ! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग. भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे. त्यात काटे कुटे खाच खळगे काही नाही. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटे कुटे, खाच खळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतू भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे. आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पहिली, अनुभवली. या शुद्धीकरणात आपणा सर्वाना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरद् हस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्ठी होत्या.

No comments:

अनगडवाणी