Tuesday, July 10, 2012

आरोप पत्र .......!!! मयुर टीका .......वास्तविका ......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)


आरोप पत्र .......!!!

एका माजी मुख्यमंत्र्यांवर
आरोप पत्र दाखल झाले,
तिघा माजी मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, अधिकारी
यांना चौकशी आयोगासमोर उभे राहावे लागले,

लोकं म्हणतात,
मंत्री म्हणजे पाजी,
त्यात आले सगळे,
आजी आणि माजी

तर लोकसेवक,
झाले रिश्वतखोर.
सगळीकडून पैसे खाऊन,
बनलेत हरामखोर,

चारोळी......!!! भ्रष्टाचाराची प्रकरणे


चारोळी......!!!  भ्रष्टाचाराची प्रकरणे

भ्रष्टाचाराची प्रकरणे यांची झाली जगजाहीर
अनेक भानगडी आल्या त्यांच्या जगासमोर बाहीर
दोषी अधिकारी / नेत्यांवर कायद्याचा बडगा कोण आहे घालणार?
याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही मिळणार.......!!!

Monday, July 2, 2012

मला काय देणे घेणे?


मला काय देणे घेणे?

मंत्रालयातील आगीचे मला काय घेणे?
इथे तर चाले पैशाचे देणे-घेणे..........

     सहृदयता कोणी दाखवावी?
     सहृदयता का दाखवावी?
     सरकारला नाही ह्याचे काही सोयर-सुतक
     तर आम्हाला तरी का असावे ह्या गोष्ठीचे मिथक?

ह्याला अपवाद असे केवळ रतन टाटांचा
तर परकेपणाचा दृष्टीकोन असे सा-या उद्योग जगताचा
म्हणूनच रतन टाटांनी दिले स्वहस्ताक्षरातील लेटर
बाकी इतर म्हणतात काय अडले आहे आमचे खेटर ?
................................... काय अडले आहे आमचे खेटर ?

येरे येरे पावसा........!!!



येरे येरे पावसा........!!!

नव्या संदर्भात
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
रुपया झाला छोटा
    
     येरे येरे पावसा
     तुला देतो डॉलर
     डॉलर झाला मोठा
     रुपया ठरला खोटा

येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
खर्चाला नाही तोटा

     येरे येरे पावसा
     तुला देतो डॉलर
     डॉलर झाला मोठा
     पावसाला नाही तोटा

रुपयाचे झाले अवमूल्यन
डॉलरचे झाले मूल्यवर्धन
पाऊस म्हणतो, तुझा रुपया
कां बरे मी घेऊ तारण?

     पावसाचे म्हणणे –
     म्हणून मी येत नाही
     म्हणून मी घेत नाही

     त्यामुळे –
     रुपयाची झाली कोंडी
     लागली त्याला उतरंडी

रुपयाने घेतली पाण्यात उडी
माणसांसाठी ठरली जगबुडी

     रुपया गेला तळाला
     डॉलर मात्र वधारला.......

Wednesday, June 27, 2012

साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!


साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!

साक्षीची जिद्द पहा किती
तिने मारली विजयाची बाजी मोठी 

        घर नाही, दार नाही
        इतर कोणाची तिला साथ नाही

अशाही प्रतिकूल परिस्थितीत
९० टक्के मिळविले परिस्थितीवर करीत मात 

        साथीला फक्त माता आहे
        दैव देणारा दाता आहे

स्वयंप्रेरणेने अभ्यास करून
यशस्वी होण्याची ही गाथा आहे........!!!

(संदर्भ : मटा दिनांक: २६-०६-२०१२,
आवाहन:  समस्त वाचक वर्गाला कळकळीचे आवाहन, ज्या कोणाला साक्षीला आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी मटा किंवा मटा  हेल्प लाईनशी संपर्क साधावा)

अनगडवाणी