Tuesday, May 1, 2012

राज्यसभेचे जंतर-मंतर.........!!! मयुरटीका ..........हि नव्हे वात्रटिका ........तर हि आहे वास्तविका.......!!!




राज्यसभेचे जंतर-मंतर

राज्यसभा आहे
सभागृह श्रेष्ठांचे
वडिलकीच्या भूमिकेतून
मार्गदर्शन हवे आहे जेष्ठांचे

धीरगंभीर भाषणांमधून सरकारला
     मौलिक सूचना कराव्यात
अशा आशा नविन पिढीने
     नाही कां धराव्यात?

परंतु असे काही होताना येथे
     दिसत तर नाही
उलटपक्षी सभागृहाचे स्वरूप
     शुष्क वाळवंटासारखे होई 

जया बच्चनने राज्यसभा सदत्वाची
     पुन्हा शपथ घेतली
मुलायमसिंगानी अमरसिंगांच्या नाकावर टिच्चून
     तिला राज्यसभेत पाठविली

पत्रकारांशी बोलताना ती
     आता मोजकीच विधाने करते
काँग्रेसवाले आणि सोनिया समोर दिसली की
     तिचे मस्तकच भडकते 

काँग्रेसवाले महाचतुर,
त्यांनी खेळली एक खेळी
जया बच्चनला चिडविण्यासाठी
त्यांनी रेखाला सभागृहात आणले

राज्यसभेत दोघी जेव्हा
     समोरा-समोर येतील
बहुधा त्याचवेळेला
     सिलसिला २ सुरु होईल........२ सुरु होईल !!!

Saturday, April 28, 2012

खासदार सचिन .........!!! मयुरटीका .......!! हि नव्हे वात्रटिका....तर हि आहे वास्तविका......!!!




खासदार सचिन

सचिन तेंडूलकर
भारत रत्न आहे
की आहे
भारताची शान

ह्याचे स्पष्टीकरण
झाले नसताना
दिला त्याला
खासदारकीचा मान

खासदारकीचा मान मिळाला
राजकीय पक्षांचा तिळपापड झाला
सचिन काही बोलण्याअगोदरच
सगळीकडे त्याचा बोलबाला झाला..........


Friday, April 27, 2012

‘लेक टॅपिंग’चा प्रयोग.........!!! मयुरटीका .......वास्तविका....!!!




‘लेक टॅपिंग’चा प्रयोग

कोयना धरण
आहे महाराष्ट्राची शान
उद्योग आणि शेतीसाठी
ठरले आहे वरदान

वीजेची भासली
महाराष्ट्राला चणचण
‘लेक टॅपिंग’चा प्रयोग करून
मिटविली लोकांची वणवण

कोयनेत केला
जलकम्पाचा थरार
‘लेक टॅपिंग’चा प्रयोग
केला यशस्वीपणे पार........

Wednesday, April 25, 2012

अग्निची अग्निपरीक्षा........!!! हि नव्हे वात्रटिका ........तर हि आहे मयुरटीका .....हि आहे वास्तविका......!!!




अग्निची अग्निपरीक्षा

अग्निची झाली अग्निपरीक्षा
ओलांडली ५००० की.मी.ची कक्षा

अग्नि हवेत काय झेपावले
सारे जगतच थरारले

अर्धे जग मार्र्याच्या टप्प्यात आले
पाकिस्थान सकट चीन सुद्धा गडबडले

भारत देश झाला महाशक्तिमान
माझा भारत देश महान.......!!!
माझा भारत देश महान.......!!!   

Tuesday, April 24, 2012

ग्लोबल भरारी.......!!! मयुरटीका .......हि नव्हे वात्रटिका.....तर हि आहे वास्तविका .......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)

ग्लोबल भरारी.......!!!

आय टी आयच्या मुलांनी
घेतली ग्लोबल भरारी,
तीन वर्षात २८३ जणांना
ऑस्ट्रेलियात मिळाली नोकरी.......

दहावीत अपेक्षेपेक्षा टक्के मिळाले कमी,
म्हणून इंजिनिअरिंगला नाही मिळाली हमी,
जरी इंजिनिअरिंगला प्रवेश नाही मिळाला,
जागतिक स्तरावर मात्र ‘ब्ल्यु कॉलर’ वाला जाहला.....!!!

Sunday, April 22, 2012

पराभवाचा वचपा......!!!........मयुरटीका......वास्तविका.......!!!

पराभवाचा वचपा......!!!

मुंबई ठाण्यात
कॉंग्रेसचा पराभव झाला,
जिल्हापरिषद निवडणुकांत
राष्ट्रवादीने झेंडा फडकाविला.......

भिवंडी, चंद्रपूर, मालेगावात
कॉंग्रेसने पहिला क्रमांक मिळवला,
लातूरमध्ये दोन तृतीयांश बहुमत घेवून
अगोदरच्या पराभवाचा वचपा काढला......!!!

अनगडवाणी