Monday, April 9, 2012
Friday, April 6, 2012
पळून गेली श्रीमंती......!!!
मयुरटीका........वास्तविका.....!!!
ही नव्हे वात्रटिका,
तर ही आहे वास्तविका......!!!
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
पळून गेली श्रीमंती......!!!
बजेटने दिला दणका,
पेट्रोल / डिझेलचा
उडाला भडका,
सामान्य माणसांच्या
जीवनाला,
लागला भाववाढीचा
तडका......!!
विमान प्रवास महागला,
होटेल / ट्रान्सपोर्ट कडाडला,
रोजच्या धड्फडीत सामान्य
आपोआपच कलंडला,,,,,,,,!!
चार महिने अगोदर
तिकीट बुक करा,
‘कन्फर्म’ तिकीट
नाही मिळाले तर,
‘वेटिंग लिस्ट’ चा
सोपा,
मार्ग अनुसारा......!!
“शाकाहार” करावा तर भाज्या कडाडल्या,
“मांसाहार” करावा तर बाजार-भावही भडकला,
खावे काय? प्यावे काय? काहीच कळेना,
भाव-वाढीमुळे माणसांचे चित्त स्थिर
होईना....!!
महाग झाली भ्रमंती,
महाग झाल्या गमती,
जमती,
वाढलेले बाजार-भाव
पाहून,
पळून गेली
श्रीमंती......पळून गेली श्रीमंती.......!!!!
Wednesday, April 4, 2012
पर्दाफाश.......!!!
मयुरटीका........वास्तविका.....!!!
ही नव्हे वात्रटिका,
तर ही आहे वास्तविका......!!!
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
पर्दाफाश
‘ऑफर’ मागचं,
काय आहे गौडबंगाल?
सारेच जण निघाले,
कराया अपुला देश
कंगाल.....!!
कोण देतो लाच,
कोण घेतो लाच,
सामान्य माणसांच्या ढुंगणावर,
मागून मारतात टाच ........!!
कोणी करी आरोप,
कोणी देई निरोप,
निगरगट्ट सरकार
मात्र,
सर्वांचा करी
समारोप......!!
नाही निर्णय,
नाही पर्याय,
नाही संवाद,
नाही लवाद,
कोर्टामध्ये जाता होई,
सगळ्यांचा पर्दाफाश.......!!!!
Monday, April 2, 2012
Saturday, March 31, 2012
Thursday, March 29, 2012
काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!
काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!
“ए” ला पाठवायचे आहेत “बी” कडे पैसे,
हवाला ऑपरेटर त्यामध्ये असे,
ऑपरेटर मग आपल्या कॉनटॅक्टला फोन करीतसे,
“बी” चे नाव/गाव/पत्ता देत असे,
हा सोपस्कार पूर्ण झाल्यावर
“ए” व “बी” ला कोड मिळत असे,
ज्यावेळेला फोनवर “ए” व “बी” चा कोड जुळत असे,
त्याचवेळेला “बी” ला मिळत असत पैसे
“हवाला रॅकेट” ह्यालाच म्हणत असे.........!!!
मयुर तोंडवळकर .............9869704882
Subscribe to:
Posts (Atom)
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...



