Monday, July 2, 2012

मला काय देणे घेणे?


मला काय देणे घेणे?

मंत्रालयातील आगीचे मला काय घेणे?
इथे तर चाले पैशाचे देणे-घेणे..........

     सहृदयता कोणी दाखवावी?
     सहृदयता का दाखवावी?
     सरकारला नाही ह्याचे काही सोयर-सुतक
     तर आम्हाला तरी का असावे ह्या गोष्ठीचे मिथक?

ह्याला अपवाद असे केवळ रतन टाटांचा
तर परकेपणाचा दृष्टीकोन असे सा-या उद्योग जगताचा
म्हणूनच रतन टाटांनी दिले स्वहस्ताक्षरातील लेटर
बाकी इतर म्हणतात काय अडले आहे आमचे खेटर ?
................................... काय अडले आहे आमचे खेटर ?

येरे येरे पावसा........!!!



येरे येरे पावसा........!!!

नव्या संदर्भात
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
रुपया झाला छोटा
    
     येरे येरे पावसा
     तुला देतो डॉलर
     डॉलर झाला मोठा
     रुपया ठरला खोटा

येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
खर्चाला नाही तोटा

     येरे येरे पावसा
     तुला देतो डॉलर
     डॉलर झाला मोठा
     पावसाला नाही तोटा

रुपयाचे झाले अवमूल्यन
डॉलरचे झाले मूल्यवर्धन
पाऊस म्हणतो, तुझा रुपया
कां बरे मी घेऊ तारण?

     पावसाचे म्हणणे –
     म्हणून मी येत नाही
     म्हणून मी घेत नाही

     त्यामुळे –
     रुपयाची झाली कोंडी
     लागली त्याला उतरंडी

रुपयाने घेतली पाण्यात उडी
माणसांसाठी ठरली जगबुडी

     रुपया गेला तळाला
     डॉलर मात्र वधारला.......

Wednesday, June 27, 2012

साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!


साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!

साक्षीची जिद्द पहा किती
तिने मारली विजयाची बाजी मोठी 

        घर नाही, दार नाही
        इतर कोणाची तिला साथ नाही

अशाही प्रतिकूल परिस्थितीत
९० टक्के मिळविले परिस्थितीवर करीत मात 

        साथीला फक्त माता आहे
        दैव देणारा दाता आहे

स्वयंप्रेरणेने अभ्यास करून
यशस्वी होण्याची ही गाथा आहे........!!!

(संदर्भ : मटा दिनांक: २६-०६-२०१२,
आवाहन:  समस्त वाचक वर्गाला कळकळीचे आवाहन, ज्या कोणाला साक्षीला आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी मटा किंवा मटा  हेल्प लाईनशी संपर्क साधावा)

Tuesday, June 26, 2012

प्रतिभेशी फारकत.....!!!




(photo courtesy: Maharashtra Times)

नावात काय आहे?.......
प्रतिभेशी फारकत.....!!!

काय ह्यांची “प्रतिभा”
काय ह्यांची “पाटीलगिरी”
ह्यांच्या विक्रमात आहे
सर्वाधिक परदेशांची वारी

३५ जणांना दाखविली दया
ज्यांच्यामध्ये आहे गुन्हेगारीची छाया
५ वर्षाच्या कालावधीत
जमविली आहे भरपूर माया........!!!  

(संदर्भ : मटा मधील बातमी) 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14336868.cms

अनगडवाणी