Sunday, June 3, 2012

अडवाणीनींची नाराजी




भाजप अध्यक्षांवर अडवाणी नाराज
     नितीन गडकरींवर पडली त्याची गाज

अडवाणीनी उभारली गडकरींवर गदा
     ब्लॉगच्या माध्यमातून प्रगटली नाराजीची अदा

गडकरींना त्यांनी केले टार्गेट
     तर स्वराज, जेटलीना शाबासकी

भाजपने करावे आत्मचिंतन
     याची केली सुतोवाचकी ...........!!!

Saturday, June 2, 2012

पेट्रोल दरवाढ



इकडे आहे उन्हाचा तडाखा
तर तिकडे आहे महागाईचा भडका
कोणी देई फोडाफोडीचा दणका
     तर बंद कर्त्यांकडून येई मोडतोडीचा फटका

पेट्रोल झाले महाग
     डागी झाले सरकार
डाग धुण्यासाठी
     सरकार मग घेई माघार

पेट्रोल दरवाढ दीड – रुपयांनी
     घेई मागे सरकार साभार
धन्यवाद त्या जनतेचे
     ज्यांनी दिला संपाचा पुकार.........!!!

Friday, June 1, 2012

म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा रंग झाला फिका





पेट्रोल दरवाढीने बंदला चढला जोर
     महाग झालेल्या घरांमुळे दिल मांगे मोर

बंदचा फटका सोडतीला लागला
     दरवाढीने ग्राहक राजा थंडावला

ना उडाली झुंबड, ना दिसला जल्लोष
     दरवाढीने बेजार, ग्राहकांनी नोंदविला आपला रोष.......!!!

Friday, May 4, 2012

सी. डी. के पीछे क्या है ?


सी. डी. के पीछे क्या है ?

यु ट्यूब वर सी. डी. काय झळकली
     अभिषेक मनू सिंघवीची बोलतीच बंद झाली

सी. डी. ने केला सिंघविंचा घात
     सी. डी. मध्ये आहे काय अशी बात?

सी. डी. मुळे गेले सिंघविंचे अध्यक्षपद
     कॉंग्रेसने देखील मागे घेतले आपले प्रवक्तेपद

अशाप्रकारे सिंघविना सी. डी. फार भोवली
     सी. डी. प्रकरणामध्ये सिंघविंची प्रतिष्ठाच पणाला लागली.

Thursday, May 3, 2012

सुट्टीतील फेरफटका.......!!!........मयुरटीका ........वास्तविका...!!!




सुट्टीतील फेरफटका.......!!!

शाळा, कॉलेजांचे रीझल्ट
     एव्हाना लागले,
पालकांकडे भटकंतीचे
     मुलांचे हट्ट वाढू लागले,

कोणी म्हणतो, जाऊया पप्पा
     राणीच्या बागेत,
तर कोणी म्हणे, मारुया फेरफटका
     वस्तुसंग्रहालयाच्या जागेत,

मरीन ड्राईव्हला आहे,
     तारापोरवाला मत्स्यालय
तर भायखळ्याला आहे,
     जिजामाता प्राणीसंग्रहालय

फोर्टला जाऊ आणि पाहू,
     रिझर्व बँकेचे नाणे संग्रहालय
तर वडाळ्याला आहे,
     बेस्टचे वाहतूक संग्रहालय

ग्रांट रोडला आहे,
     गांधींचे मणी भवन
तर शिवाजी पार्कला आहे,
     संयुक्त महाराष्ट्र कला दालन


राणीच्या बागे शेजारी आहे,
     भाऊ दाजी लाड म्युझियम
तर गेट वे च्या शेजारी आहे,
     छत्रपती शिवाजी म्युझियम

गेट वे पाहता पाहता ईच्छा झाली
     पक्षांबद्दलची माहिती घेण्याची
तर थोडेच अंतर् पार करा आणि घ्या तसदी
     मुंबई नॅचरल हिस्टरी सोसाईटीत जाण्याची

अशा प्रकारे दिवस घालवा,
     आनंदाने मजेत
मुलांचेही लाड करा,
     हट्ट त्यांचे पुरवीत.

अनगडवाणी