Monday, January 30, 2012

माझी चेन्नई सफर.........!!! भाग २ रा


दिवस तिसरा –
अगोदरच्या दिवसाच्या प्रवासाचा शीन असल्यामुळे पहाटे जरा उशिरा, म्हणजे आठ वाजता उठलो. स्नान वगैरे सगळे विधी आटोपून सगळ्यांना चहा टाकला. नंतर चहापान करता करताच एकमेकांशी ओळखीपाळखी करून घेतल्या, सगळ्यांशी गप्पा मारल्या. अतुल बरोबर त्याचे मित्र होते – मुंबईचे निलेश ढमाले, जिग्नेश हिंगु, अक्षय नांदविकर तर चिंचवड पुण्याचा उदय डफळ आणि नागपूरचा गौरव कस्तुरे. दोघेजण अगोदरच निघून गेले होते.
ह्यांच्याशी गप्पा मारता मारता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ही नुकतीच वयाची बावीशी-तेविशी-पंचविशी ओलांडलेली मुले आपल्या घरी (कोणी मुंबईला, तर कोणी पुण्याला, तर कोणी नागपूरला आपल्या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असलेल्या घरी) जाण्यासाठी फारच उत्सुक होती. त्यांच्याशी संवाद साधताना असे कळून आले कि काहीजण दिवाळीत आप-आपल्या घरी जावून आलेत तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना फक्त एका मोबाईल फोनशिवाय दुसरा कोणताच आधार नव्हता कि पर्याय नव्हता. नाही म्हणायला एकाकडे लॅपटोप होता, तो त्यांचा मित्र आदित्य देखील, आम्ही ज्या दिवशी चेन्नईला पोहोचलो त्याच दिवशी, त्याची पुण्याला ट्रान्स्फर झाल्यामुळे संध्याकाळी मुंबईला जाण्यासाठी रवाना झाला होता. त्याचा लॅपटोप हा सगळ्यांचा विरन्गुळ्याचा एक मोठा आधार होता. त्या लॅपटोपवर ते सगळेजण सिनेमा पहावयाचे, तर कधी फेसबुकवर आपले प्रोफाइल अपडेट करावयाचे. घरात टी.वी. नसल्यामुळे त्या मनोरंजनाच्या साधनापासूनही ते वंचितच होते. त्यामुळे एकाकीपण आणखीनच वाढले तर नवल ते कोणते? अशा एकाकीपणाच्या वातावरणात मग विरंगुळा कोणता? तर सिनेमाला जा, फिरायला जा, खा-प्या मौज-मजा करा इत्यादी इत्यादी. परंतु पहिल्या दोन-तीन महिन्यातच हे सगळे आटोपलेले असल्यामुळे आता त्याचाही कंटाळा आलेला. त्यामुळे शनिवार, रविवारच्या रजेच्या दिवशी फक्त आराम आणि आरामच करावयाचा असल्यामुळे सकाळी उशिराने उठणे हे ओघाने आलेच.
ह्यात एक सुख:द धक्का मला मिळाला तो म्हणजे त्यांच्या वागणूकीमध्ये झालेला बदल पाहून. पहिले दोन-तीन महिने मौज मजा केल्यानंतर माझ्या चिरन्जीवांसह त्याच्या मित्रांमध्ये झालेला बदल म्हणजे बाहेर गेल्यावर येणारा खाण्या-पिण्याचा भरमसाट खर्च, या गोष्ठीची त्यांना झालेली जाणीव. ही जाणीव त्यांना झाल्यामुळे त्या सगळ्यांनी आता असे ठरविले होते की जेवणासाठी उठसुठ बाहेर न जाता घरीच जेवण बनवायचे. त्यांच्यामध्ये गौरव नावाचा त्यांचा नागपूरचा जो मित्र होता, तो जेवण करण्यात पटाईत होता. सोमवार ते शुक्रवार ते सगळे मित्र कॅम्पस मधूनच रात्रीचे जेवण करून बाहेर पडत व आपल्या रुमवर येत असत, त्यामुळे आठवड्यातील पांच दिवस दोन्ही वेळ त्यांना जेवणाची ददात नव्हती. प्रश्न होता तो फक्त दोन दिवसांचा, शनिवार आणि रविवारचा. तसे पाहिले तर तोही प्रश्न नव्हता, कारण कॅम्पसमध्ये तेही दोन दिवस जेवण मिळाले असते, परंतु हे सगळेजण साधारणपणे ऑफिसपासून एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे व रजेचे दिवस असल्यामुळे फक्त जेवणासाठी इतक्या लांबवर जाणे, प्रवास करणे त्यांना प्रसस्त वाटत नसावे, त्यातच त्यांचा तो शेफ मित्र त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्या सगळ्यांनी असा निर्णय घेतला की घरीच जेवण करायचे. यावरून त्यांच्यातील झालेला हा सकारात्मक बदल पाहून धन्यता वाटली. इतकेच नव्हे तर ही सगळी मित्र-मंडळी जेवण करताना गौरवला एकत्र येवून मदत करीत होती व स्वत: सुद्धा जेवण करण्याचे शिकून घेत होती. यातील काही मुलांनी त्यांच्या ह्या २० ते २५ वर्षाच्या आयुष्यात कधी गॅसजवळ जाण्याचा प्रयत्नही केला नसेल, त्यांनी हे उचलेले पाऊल पाहून खरोखरीच ऊर भरून आला आणि मनही निश्चींत झाले. वाटले खरोखरीच ही मुले मोठी झालीत, विचार करायला शिकलीत, आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाण आली आणि फक्त जाणच नाही आली तर त्याबरहुकूम ते योग्य तो निर्णय सुद्धा घेऊ लागलेत. कोणा माता-पित्याला हे पाहून आनंद नाही होणार? का आपल्या मुलांबद्दल अभिमान नाही वाटणार? खरोखरीच अशीच जर सगळी तरुणाई वागू लागली तर मला वाटते ही मुले जी आप-आपल्या घरादारापासून लांब असलीत, आपल्या आप्तांपासून दूर असलीत, तरी ती लांब नसून जवळच आहेत असे वाटू लागते. परंतु ह्याबरोबर हे ही जाणवले की ही मुले जर आपल्या घराजवळ, आई-वडिलांजवळ असती, तर निदान काही प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च टाळता आला असता, त्यामुळे आर्थिक बचत होऊन त्यांना ती भविष्यात उपयोगी ठरू शकली असती.
येथे एक नमूद करावेसे वाटते कि ह्या तरुणाईतल्या मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. आत्ताच कुठे ही मुले आपले बी.ई.चे शिक्षण संपवून बाहेर पडतात न पडतात तोच त्यांना आय.टी. क्षेत्रात नोकरी मिळाल्यामुळे व मुंबईमध्ये त्यांच्या कंपनीची (इन्फोसिस) ऑफिसेस नसल्यामुळे त्यांना आवडो अथवा न-आवडो मुंबई म्हणा, पुणे म्हणा किंवा नागपूर म्हणा आपले राहते घरकुल सोडून, आपल्या आई-वडिलांना सोडून, आपल्या प्रिय बंधू-भगिनींना सोडून, नातेवाईकांना सोडून ट्रेनिंगसाठी व नोकरीसाठी चेन्नई, मैसूर, बेंगलोर, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी यावेच लागते. तसे पाहिले तर ह्या मुलांनी आयुष्य असे किती पाहिले? आत्ताच तर त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात झालेली असतांना त्यांना आपल्या घरापासून, माता-पित्यांपासून, भावंडापासून, नातेवाईकांपासून लांब राहावे लागत आहे हे विचार मनात येताच आम्हा माता-पित्यांनाही मनातून दु:ख होतच असते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे ही मुले स्वावलंबी होताना पाहून, स्वत:चे योग्य निर्णय घेताना पाहून पुढच्याच क्षणाला वाटते की नाही हीच ती वेळ आहे ह्या मुलांनी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची, आपल्या आयुष्याचे सोने करण्याची. ह्याच वेळेला जर त्यांनी व पर्यायाने आम्ही पालकांनी थोडेसे कठोरपण नाही घेतले, थोडेसे बंध नाही ढिले केले, त्यांच्यावर विश्वास नाही टाकला, त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नाही साथ दिली, तर त्यांचे पुढील भविष्य कसे उभारेल? ते मोठे कसे होतील? आपल्या आयुष्यात उंची कशी गाठतील? आणि भविष्यात नावारूपाला कसे येतील?
त्यांच्या मनातील अशाप्रकारची घालमेल पाहताना व याचेच निरुपण करताना
दुस-या दिवशीच्या त्यांच्याबरोबरच्या चहापान करण्याच्या दरम्यान त्यांना हेच समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होतो. काही जणांना वाटत होते की त्यांचा बॉन्डचा कालावधी संपला की त्यांना पुण्याला (कारण मुंबईला त्यांच्या कंपनीची ऑफिसेस नसल्यामुळे) ट्रान्स्फर नाही मिळाली तर ते ही कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेणार होते. त्यावेळेस हे ऐकून मला मनस्वी दु:ख झाले, त्याला कारणेही अनेक होती, आणि तीच त्यांना समजावून सांगण्याचा मी तेव्हा प्रयत्न देखील केला, त्यातीलच काही मुद्दे येथे मांडीत आहे -
पहिल्या प्रथम त्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानले ते ह्यासाठी की अगोदरच म्हटल्याप्रमाणे या सगळ्यांनी आप-आपल्या मुलांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो किती धाडसाचा आणि योग्य होता. दुसरे असे की हे जरी खरे असले तरी आज माझ्यासमोर असणा-या या मुलांनी देखील आपल्या माता-पित्यांसारखे धैर्य दाखवून ह्या कंपनीची ऑफर स्वीकारली, हे देखील वाखाणण्या जोगेच नव्हे काय?
आज तसे पाहिले तर आय.टी. क्षेत्रामध्ये ज्या नाव घेण्यासारख्या कंपन्या आहेत त्यातील ब-याच वर असणारी, त्यांची निवड झालेली, अशी ही एक कंपनी आहे – इन्फोसिस. जागतिक स्तरावरील आई.बी.एम., अॅपल सारख्या कंपन्यांबरोबरच स्पर्धेत असणारी भारतातील क्रमांक दोनची ही कंपनी, आज विशेषत्वाने कशासाठी जर प्रसिद्ध आहे तर ती तिच्या कार्यालयीन संस्कृतीमुळे. श्रीयुत नारायण मूर्ती  आणि त्यांच्या पत्नी सौ. सुधा मूर्ती यांच्या संयुक्त कल्पनेतून साकारलेली, आणि आपल्या पुण्यातच मुहूर्तमेढ रोवलेली, आपल्याबरोबर असणा-या आपल्या कामगारांचा कुटुंब म्हणून स्वीकार करणारी, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारी, त्यांना आपल्या फायद्यात सामावून घेणारी अशी ही कंपनी मिळणे हे ही आपण आपले भाग्य का समजू नये?
कंपनीची बहुतेक कार्यालये ही जरी शहरांपासून लांब असलीत तरी अतिप्रशस्त अशा जागांवर, निसर्गाच्या कुशीत प्रस्थापित केलेली असून आजूबाजूला हेतुत: निसर्ग जपून आपला कामगार अशा हिरव्यागार वातावरणामुळे सदैव टवटवीत राहिल ह्याचीही खबरदारी कंपनीने घेतलेली दिसून येते. नुसते वातावरणच जपलेले नसून, कामगारांच्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवून, तेथें प्रत्येक गोष्ट त्यांना उपलब्ध होईल हे देखील कंपनीने पाहिलेले आहे. त्यामुळे झाले काय की एकदा का आपण कॅम्पसमध्ये पदार्पण केले की सगळ्या गोष्टी तेथें उपलब्ध असल्यामुळे कशाचीही उणीव भासत नाही व त्यामुळे सर्वस्वांचा विसर पडून आपण आपले काम जोमाने करू शकतो. हो, नाही म्हणायला उणीव भासते ती आपल्या घरच्यांची. ठीक आहे, हे जरी खरे असले, तरी आज माणसाला जी किंमत आहे ती त्याच्या आर्थिक सबलतेमुळे आणि त्याच्या समाजातील असणा-या स्थानामुळे, ह्या दोन्ही गोष्टींची येथे काळजी घेण्यात आलेली असल्यामुळे, आपण आपल्या नातलगांचा केलेला व त्यांनी आपला केलेला त्याग हा त्यामानाने फारच कमी पडावा. कारण, आज आपण आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थीदशेतून नुकतेच कुठे बाहेर पडलो आहोत आणि इथे तिथे न भटकता सरळ योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गावर आहोत, हे ही नसे थोडके.
आपल्या सारख्यांचे, वय-वर्षे २५ ते ४५ दरम्यानच जी काही प्रगती होईल त्यावरच संपूर्ण आयुष्य अवलंबून असेल हे ध्यानात घ्यावयास हवे. आणि येथे तर काही जण वयाच्या २३व्या वर्षांपासूनच इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये दाखल झालेले. ना नोकरी शोधण्याची दगदग, ना धडफड. फक्त आपण साध्य केलेल्या साध्यावर लक्ष केंद्रित करून आपण आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहणे महत्वाचे. अशावेळी जर का आपल्यासारख्यानी आपला ह्या कंपनीमध्ये येण्याचा उद्देश्य सफल झाल्यामुळे येथेच आपली प्रगती साधण्याचा निर्णय घेतल्यास योग्यच नाही का होणार? मग त्यासाठी आपणाला आपल्या घरापासून, आपल्या नातलगांपासून लांब रहावे लागले तरी बेहत्तर असे का बरे समजू नये? असे जर का आपण ठरवून आपला निर्णय घेतलात तर मला वाटते येत्या पांच वर्षात आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये, कंपनीमध्ये स्थिर होऊन एका विशिष्ट उंचीवर आलेले असाल आणि आज जी तुमच्या जीवाची घुसमट, घालमेल होतेय की मला माझे आई-बाबा मिळत नाहीत, माझे घर मिळत नाही, माझी भावंडे मिळत नाहीत, ती आपोआप दूर होईल. कशी दूर होईल? तर आपण आजपासून पांच वर्षांनी आजच्या पेक्षा आणखी जास्त पगार मिळवत असाल, आपली खर्चाची बाजू आजच्यापेक्षा थोडी जास्त असेल, परंतु आजच्या मानाने कमीच असेल, म्हणजेच आपली बचतीची बाजू आजच्यापेक्षा नक्कीच सुधारलेली असेल. बचत वाढल्यामुळे व पगारही जास्त असल्यामुळे, आपण आपल्या आई-बाबांना किंवा माता-पित्यांना, भाऊ-बंदाना तुम्ही जेथे असाल तेथें कधीही बोलावू शकाल, तुम्हाला आठवण झाल्यास तुम्ही रजा काढून स्वत: आपल्या माता-पित्यांना भेण्यासाठी कधीही आप-आपल्या घरी जावू शकाल आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल. मग मला सांगा हे बरे की आपण आपल्या माणसात राहून आपली प्रगती न होणे हे बरे?
असे म्हणण्याचे कारण इतकेच की, आज आपण पाहतो की विशेषकरून आपल्या मुंबईमध्ये दूरदूरवरचे, परक्या मुलुखातले लोक येऊन स्थिर झालेले आहेत. इतकेच नव्हे तर ते जीवनात यशस्वीही झालेले आहेत, नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून मुंबईचा स्वीकार केलेला आहे. उदा. अमिताभ बच्चन. ते ही आपल्या आई-वडिलांपासून, नातलगांपासून, भाऊ-बंदांपासून आपल्या घरादारापासून खूप दूरवर आलेले आहेत, परंतु आज ते जीवनात सगळ्या गोष्टीनी जसे, आर्थिक, व्यावसायिक वगैरे यशस्वी असल्यामुळे हवे तेव्हा, हवे तेवढयावेळा  आपल्या घरी-दारी, आपल्या मुला-माणसात जावू-येऊ शकतात. त्यांना कशाचेही बंधन नाही. कारण आज असलेली त्यांची आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, मानसिक परिस्थिती आणि ही परिस्थिती त्यांना कशामुळे प्राप्त झाली? तर त्यांच्या आर्थिक, मानसिक, व्यावसायिक सबलतेमुळे. एवढेच नव्हे तर त्यांनी ह्या जोरावर जागोजागी आपली घरे-दारे निर्माण करून ठेवलेली आहेत. आज त्यांना कशाचीही ददात वाटत नाही, पडत नाही. त्यांना आज कशाचीही खंत नाही किंवा काही घालविल्याचे, हरविल्याचे दु:ख नाही. तसे पाहिले तर सुरुवातीच्या काळात जें काही त्यांनी घालविले, हरविले, ते त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर पुन्हा मिळविले आणि आज ते एक यशस्वी, आनंदी, सुखी व्यक्तिमत्व म्हणून आपले जीवन सुखात जगताहेत. त्यांनी जर तशी खटपट, धडफड त्यांच्या सुरुवातीच्या काळात केली नसती, त्यांनी जर घराबाहेर पडण्याची जोखीम उचलली नसती तर त्यांना हे आज शक्य झाले असते काय? तर ह्याचे उत्तर आपणास नकारार्थीच मिळेल. मी जें काही निरुपण वर दिलेले आहे ते मुंबईमध्ये भरभराटीला आलेल्या बॉलिवूड – चित्रपट व्यवसायाला आणि त्यामध्ये असणा-या व्यावसायिकांना विशेषकरून लागू पडते. त्याकाळी आणि आजही मुंबई ही चित्रपट उद्योगाची पंढरी आहे. त्यामुळे आजही आपण पाहू शकतो की ह्या क्षेत्रामध्ये नाव कमविण्यासाठी बाहेरून लोकं येतच असतात, आपले नशीब अजमाविण्याचे प्रयत्न करीतच असतात.
ह्याचेच दुसरे उदा. लक्ष्मी मित्तल ह्या व्यावसायिकांचे. राजस्थान ह्या प्रांतातील सुपुत्र श्रीयुत लक्ष्मी मित्तल हे आज इंग्लंडसारख्या पर मुलुखात एक मोठे उद्योगपती म्हणून नावारूपाला आलेले आहेत. जागतिक स्तरावरील अर्सेलर या नामचीन कंपनीला त्यांनी खरेदी केले व आपल्या व्यावसायिक साम्राज्यात सामावून घेतले.
ते मुळचे तेथील होते का? तर नाही. परंतु तेथें जाण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता नां? आज त्यांना काय कमी आहे? ते वाटेल तेव्हा भारतात येऊ शकतात, जगामध्ये कोठेही फिरू शकतात, आपल्या नातेवाईकांना भेटू शकतात. अशी बरीच उदाहरणे सापडतील की जी आज जागतिक पातळीवरदेखील यशस्वी व्यक्तिमत्वे म्हणून ओळखली जातात.
आपले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व श्रीयुत विक्रम पंडित, हे आज जागतिक पातळीवरील सिटी बँकेचे सर्वेसर्वा आहेतच ना? असेच दुसरे एक मराठी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत धनंजय दातार. ह्यांनी अरब देशात जावून आपला मसाल्यांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते तेथें अल-आदिल ट्रेडिंग या कंपनीचे युनायटेड अरब एमिरेट्समध्ये गेली २५ वर्षे चेअरमन आणि सी.ई.ओ. म्हणून कार्यरत आहेत. आज ते दुबईतील मसाला किंग म्हणून ओळखले जातात. श्रीयुत मंदार जोगळेकर हे तर आपल्या रत्नागिरी जवळच्या साखरप्याचे. ह्यांनी देखील अमेरिकेत जावून आपला पुस्तकांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते बुकगंगा डॉट कॉम ह्या साईटवरून मराठी प्रकाशकांची हजारो मराठी पुस्तके जागतिक पातळीवर घरोघरी पोहचविण्याचे कार्य मोठ्या जोमाने पार पाडीत आहेत, तर ग्लोबलमराठी डॉट कॉमच्या रुपाने ते सोशियल नेटवर्किंग साईट देखील चालवीत आहेत. माय विश्व कार्पोरेशन ह्या नॉर्थ वेल्स्, फिलाडेलफिया, पेनीनसिल्वानिया स्थित अमेरिकेत स्थापित कंपनीचे संस्थापक सी.ई.ओ.ही आहेत.
आपल्या भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील त्रिची किंवा तीरुचीलापल्ली येथून परदेशी गेलेले असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सितारामण  नारायणन जें अडोब ह्या जागतिक कंपनीमध्ये ब-याच वरच्या हुद्द्यावर कार्यरत असून त्यांचे नाव फोटोशॉप हे सोफ्टवेअर उघडताना श्रेय नामावलीमध्ये प्रामुख्याने दिसून येत असते. अशी कित्येक उदाहरणे सापडतील की जी आपल्या घरापासून दूरवर गेल्यावर नावारूपाला आली आहेत.
तसेच जर आपण निवडलेल्या आई.टी. क्षेत्रामध्ये आपणास नावारूपाला यावयाचे असेल, तर आपणालाही ह्या क्षेत्रामधील आई.टी. हब असलेल्या (म्हणजेच पर्यायाने आय.टी.चे बॉलिवूड असणा-या, आय.टी.ची पंढरी असणा-या) चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, गुरगाव, पुणे येथेच किंवा परदेशामध्ये आपले नशीब अजमवावे लागेल, येथेच आपली प्रगती साधावी लागेल, येथेच आपल्याला आपल्या स्वबळावर नाव-लौकिक कमवावा लागेल, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनावे लागेल आणि मला वाटते आपण आणि आपल्या माता-पित्यांनी जो निर्णय काल घेतला होता तो खरोखरीच योग्य असा होता, आहेही आणि मला फक्त आशाच नाही तर पक्की खात्री आहे, तुम्ही लवकरच म्हणजे येत्या दोन-चार वर्षात तसा तो सिध्द कराल. फक्त त्यासाठी आपले मन थोडे खंबीर करा आणि कामाला लागा, जें तुम्ही लागलेलेच आहात, त्यामुळे तशी आशा आम्ही करावयास हरकत नाही.
मी आतापर्यंत केलेल्या अभ्यासात मला एक गोष्ट आढळून आली ती ही की जो मनुष्य आपल्या घरापासून लांब असतो, तो लवकर प्रगती करतो. आपण विचाराल, हे कसे? तर त्याचे कारण असे की, जो आपल्या मुलामाणसात असतो, ज्याचे घर जवळपास असते, त्याला कामावर असताना वेळ झाली की घरी जाण्याची ओढ लागते व थोडा जरी उशीर झाला की तो नाराज होतो, रागावतो, आपल्या वरीष्टांशी भांडतो, त्यामुळे होते काय की आपल्या कामात तो जास्त वेळ देण्यास का-कु करतो, जास्त परिणामकारकरित्या कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्याची त्याच्या कामातील प्रगती खुंटते, त्याचे सगळे लक्ष घरी जाण्याकडे असते, तर ह्याच्या उलट जो मनुष्य आपल्या घरापासून दूरवर परमुलखामध्ये असतो, त्याला त्याचे नातलग किंवा त्याचे घर जवळपास नसल्यामुळे ती ओढ राहत नाही, दुसरे असे की जेथे त्याने भाड्याने घर घेतले असेल तेथील ओढ ही आपल्या घराप्रमाणे नसल्यामुळे म्हणा किंवा अॅटचमेंट नसल्यामुळे म्हणा, किंवा खाण्यापिण्याची गैरसोय असल्यामुळे म्हणा तो जास्तीत जास्त वेळ-काळ आपल्या कामाच्या ठिकाणी देऊ शकतो, त्यामुळे होते काय की तो आपले जास्तीत जास्त लक्ष कामावर केंद्रित करू शकतो, कामासाठी जास्त वेळ देऊ शकतो, पर्यायाने आपल्या कामामुळे व वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपली प्रगती लवकरात लवकर करून घेऊ शकतो. अशाप्रकारे तत्पर प्रगती होण्याचा त्याचा मार्ग खुला होऊन तो लवकरच वरच्या पदाला पोहोचतो आणि एकदा का तुम्ही वरवर जात राहिलात, तर तुम्हाला काय कमी आहे? तुम्हाला हवे ते मिळू शकते. फक्त तुम्ही आर्थिक दृष्टीने सबळ होणे महत्वाचे आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही हे सर्वस्व आपल्या नित्यनियमित कामातून सगळ्यांना दाखवून द्याल. त्यासाठी तुम्हाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावयास हवे आणि ते शक्य होईल फक्त वर उल्लेखिल्याप्रमाणे.
मग आता मला सांगा, हे आपल्या डोक्यातील मुंबई म्हणा, पुणे म्हणा, नागपूर म्हणा जाण्याचे जें खुळ शिरले आहे, ते काढून नको का टाकावयास? अशाने का आपली प्रगती होणार आहे? तुम्ही जितके आपल्या घराच्या ठिकाणी जवळ याल, तेवढे तुमचे तुमच्या कामातील लक्ष जास्त प्रमाणात विचलित होईल व तुम्ही प्रगतीपासून दूर जाल, ह्याच्या उलट तुम्ही जेवढे म्हणून तुमच्या घरापासून लांब राहाल, तेवढे तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल. फक्त यावेळेस काळजी एवढीच घ्यावयाची ती म्हणजे वाईट संगत करावयाची नाही, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ज्या ज्या काही अवैध गोष्टी आहेत त्या टाळल्या म्हणजे झाले. पहा तुम्ही कसे प्रगतीपथावर चालू लागता ते.
ह्याची बरीचशी उदाहरणे आपण आज आपल्या मुंबईतच पाहतो. बरेच लोकं आज आपल्या मुंबईत बिहार राज्यातून, उत्तरप्रदेशातून, दक्षिणेकडील राज्यातून, उत्तरेकडून पूर्वेकडून, पश्चिमेकडून मुंबईत दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांपेक्षा अधिक यशस्वी झालेले आहेत. याचे कारण वर उल्लेखिल्याप्रमाणे त्यांच्याकडे असणारा अनिर्बंध वेळ, तसेच नातलग, भाऊ-बंद, यांच्या पाशापासून मुक्त असणारे त्यांचे जीवन. इतकेच नव्हे तर स्वत:च्या पोटाची, मीठ-भाकरीची त्यांना सतत असलेली काळजी. त्यामुळे होते काय की ही माणसे जास्तीत जास्त वेळ आपणा स्वत:ला आपल्या कामात गुंतवून घेतात व पर्यायाने यशस्वी होतात आणि आपण स्थानिक मात्र आहोत तेथेच  राहतो. 
दुसरे असे की, आज आपण भारतातच आहोत, परंतु घरापासून लांब आहोत म्हणून मनाला सारखे वाटते की आपल्या कार्यालयापासून आपले घर जवळ असते तर बरे झाले असते, आपली माणसे आपल्या जवळ असावीत आणि म्हणून मला मुंबईला जायचे आहे, मला पुण्याला जायचे आहे, मला नागपूरला जायचे आहे. परंतु विचार करा की समजा उद्या तुम्हाला भारताबाहेर पाठविण्यास तुमची कंपनी तयार झाली, तर त्यावेळेस देखील तुम्ही हेच म्हणणार काय की नाही मी भारताबाहेर जाणार नाही, मला आपली मुंबईच द्या किंवा पुणे द्या किंवा नागपूर द्या. मग मला सांगा अशावेळेस आपण सगळ्यांचा त्याग करून भारताबाहेर यु.एस.ए., यु.के.ला नाही का जाणार? अशावेळेस आपण म्हणणार का मला माझा देश सोडून नाही जायचे आहे.
अशावेळेस बाहेर जाणेच हिताचे ठरणार, त्यामुळेच आपली आर्थिक बाजू बळकट होणार आणि आपण आपले आपल्या जीवनात ठरविलेले ध्येय गाठू शकणार आहात.
आपण आपला काम-धंदा कशासाठी करीत असतो? आपण जीवनात शिक्षण कशासाठी घेत असतो?
आपण सगळेजण हे मान्य करू की आपण शिक्षण घेतो तेच मुळी चांगली नोकरी मिळावी म्हणून नाही का? मग चांगली नोकरी म्हणजे तरी काय? ती चांगली आहे हे कसे समजावे?
तर समाजामध्ये जें काही चाललेले आहे त्यावर आपण आपले लक्ष ठेवून असतो. शिक्षण घेता घेता आजूबाजूच्या लोकांकडून, शिक्षकांकडून, आपल्या आई-वडिलांकडून, वडीलधा-या मंडळीकडून ज्या काही गोष्टी शिकविल्या जातात, आपल्या स्वत:च्या अभ्यासातून, इतर मित्र-मंडळींच्या चर्चांमधून उलगडलेल्या अनेक गोष्टीचा परिणाम म्हणून जेव्हा आपणास कळते की अमुक एक कंपनी चांगली आहे किंवा वाईट आहे, तेथें मिळणारे आर्थिक लाभ, तसेच इतर लाभ हे इतरांपेक्षा चांगले आहेत, कंपनीचा आणि तेथील अधिका-यांचा त्यांच्या कामगारांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे, त्या कंपनीबद्दलचे त्या क्षेत्रात वावरणा-या तज्ञ लोकांकडून मिळालेले रिपोर्ट्स चांगले आहेत अशाप्रकारे जेव्हा आपणास माहिती होते, त्यावेळेसच आपण म्हणतो की कंपनी चांगली आहे. याचाच अर्थ नोकरी करण्यायोग्य ही कंपनी आहे.
अशाप्रकारे एकदा का आपण एखादी कंपनी निवडली की मग इथे तिथे न पाहता आपण आपल्याला आपल्या कामात सर्वस्व झोकून दिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीने विचलित न होता, आपले ठरविलेले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त वर्षे एका कंपनीमध्ये काढली पाहिजेत व त्याचबरोबर आपण आपल्या कामात प्रगतीही केली पाहिजे. इतकेच नव्हे तर वेळ मिळाल्यास किंवा न मिळाल्यास वेळ काढून आपण आपली शैक्षिणक पात्रता देखील वाढविली पाहिजे. आहे त्यातच समाधान जरूर माना, परंतु त्याचबरोबर नेहमी ज्ञानाचे भुकेले रहा आणि आपले ज्ञान वाढवीत रहा. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये वरची पायरी गाठ्ण्यासाठी त्याचा उपयोग होऊन आपण वर-वर जाऊ शकाल, आपणास पदोन्नती मिळेल, आपणास आपले जीवनातील ठरविलेले ध्येय गाठता येईल व पर्यायाने कंपनीची देखील भरभराट होईल. ह्याच्या उलट ज्यावेळेस आपण घाई-गडबडीने निर्णय घेवून थोड्या थोड्या कालावधीने कंपन्या बदलीत असतो, त्याचा परिणाम असा होतो की आपण आपली मन:स्थिति दुस-या कंपनीस दाखवून देत असतो. मुलाखतीला गेल्यावर त्या कंपनीच्या अधिका-यांच्या हे लक्षात येते व त्यांना वाटते की हा माणूस एका ठिकाणी स्थिर होत नाही, त्यामुळे जर का आपण ह्याला आपल्याकडे ठेवले तर कशावरून हा येथे स्थिर राहील व आपले काम चोख करील? म्हणून मग आपली निवड केली जात नाही व पर्यायाने आपण एका चांगल्या नोकरीस मुकतो. म्हणून एकादी कंपनी जर सोडायची असेल, तर त्यासाठी आपणाजवळ सबळ कारण हवे, त्याचबरोबर वर म्हटल्याप्रमाणे ज्या सर्वस्व गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामध्ये ती कंपनी बसली पाहिजे. फक्त ती घराजवळ आहे म्हणून नाही किंवा मला माझ्या नातेवाईकांमध्ये जाता येते म्हणून तिची निवड करणे योग्य होणार नाही.      
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण जें आपल्या कर्तव्यासाठी क्षेत्र निवडले आहे ते म्हणजे आय.टी., जें जागतिक स्तरावर विखुरलेले क्षेत्र आहे. आणि अशावेळी त्याची आपण जाण न ठेवताच जर कुपमंडूकवृत्तीने त्या डबक्यातील बेडकासारखे डबक्याच्या बाहेर न पडण्याचा मार्ग अवलंबिला, तर ते कितपत योग्य आहे? मग अशावेळेला आपली प्रगती कशी होईल? आपण आपल्या माता-पित्यांचे तसेच आपल्या स्वत:चे स्वप्न साकार कसे करणार? आपण उच्च पदावर कसे पोहचणार? तर वेळीच ह्या गोष्टीकडे लक्ष देवून आपण जो आपला मार्ग अनुसरला आहे, तो योग्य आहे हे सगळ्यांना, तसेच स्वत;लाही दाखवून देवून त्या मार्गाने जावूनच आपली प्रगती साधावयाची आहे, जीवनात ठरविलेली उंची गाठावयाची आहे आणि सर्वस्वानां सुखी करावयाचे आहे. आपण पद आणि पैसा कमाविलात की सगळी सुखे आपल्या पायाशी लोळण घ्यावयास लागतील. सर्वस्व आपल्या जवळ येईल आणि आता जी सर्वस्वांपासून लांब असल्याची भीती वाटते आहे ती नाहीशी होऊन, आपणच इतरांना, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू शकाल. यशाचा मार्ग दाखवू शकाल. मग हे माझ्या मित्रानो करणार ना?
मी तुमचा वडिलधारी असलो, तरी तुमचा एक मित्र म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करा व त्यासाठी कामात जास्तीत जास्त लक्ष घालून, वरिष्ठांची मर्जी राखून लवकरात लवकर मोठे व्हा. इतकेच नव्हे तर माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही तुमचे पुस्तकी ज्ञान देखील वाढवा, त्यासाठी भरपूर वाचन करा, नव-नविन शिक्षण घ्या व आपली पात्रता वाढवा आणि पर्यायाने उच्च पदावर आरूढ व्हा.       
आपण ज्या कंपनीत काम करीत आहात त्या कंपनीला आशियायी देशांमध्ये आय.टी. क्षेत्रातील कामगारांना ट्रेनिंग देणारी एक युनिवरसिटी आहे असे मानले जाते. इथे फक्त ट्रेनिंगच दिले जात नाही तर त्याचबरोबर तुम्हाला भरघोस असा पगारही दिला जातो. त्यामुळे होते काय की आपण आर्थिकदृष्टया देखील सबळ होतो. भरघोस म्हणण्याचे कारण आपल्यासारख्याना इतर कंपन्यांपेक्षा येथे सुरुवातीला देण्यात येणारा पगार हा इतरांपेक्षा थोडा जास्तच असतो असे पाहण्यात आलेले आहे. त्याचबरोबर येथे देण्यात येणारी व्यावसायिक ट्रेनिंग देखील सखोल अशी सहा महिन्यांची असते. ह्या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांची राहण्याची देखील काही नाममात्र चारजेस् घेऊन कंपनीकडून सोय केली जाते.
जी मुले आज बी.ई. करून येथे आलेली आहेत त्यांचे पगार भरघोस देण्यामागेसुद्धा श्रीयुत नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी हीच कारणीभूत आहेत. पूर्वीची पारंपारिक पद्दत मोडीत काढून ह्या दोघा पती-पत्नीनी कामगारांना कंपनीच्या फायद्यामध्येसुद्धा सामावून घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सर्वाथाने विचार करूनच ही कंपनी पुढे जात असताना, निश्चितच तिचे कामगारही आपल्या आयुष्यात उंची गाठ्णारच. असे असताना जी कंपनी आपल्या कामगारांच्या हिताचा नेहमीच विचार करते आहे, तिला सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्यात काय अर्थ आहे? का तर मला मुंबईला जायचे आहे म्हणून? की मला माझ्या घराजवळ जावयाचे आहे म्हणून? मी घराजवळ आल्यामुळे माझी प्रगती होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो विचार करूनच पुढील निर्णय घेणे योग्य नाही का होणार?
इतर कंपन्यांमध्ये जावयाचे झाल्यास तेथील कार्यालयीन संस्कृती (ऑफिस कल्चर) कशी आहे, तेथील वातावरण कसे आहे, तेथील वरिष्ठ कसे आहेत वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, कारण अशी संधी पुनः मिळणे नाही.
इतके करूनही जर कोणाला वाटत असेल की मला ही कंपनी सोडून माझ्या घराजवळील दुस-या कंपनीत भरती व्हायचे आहे, तर अशावेळी माझे तुम्हास सांगणे आहे की तुम्ही तेथील नोकरी स्वीकारण्याआधी तेथील सगळ्या गोष्टींची चौकशी करा, तेथील काम करीत असलेल्या कामगारांचे त्या कंपनीबद्दल असणारे मत विचारात घ्या, तेथील कामाचे स्वरूप लक्षात घ्या, तेथें देण्यात येणा-या पदोन्नतीबद्दल माहिती करून घ्या, तेथील इतर लाभांबद्दल माहिती घ्या, तेथें मिळणा-या आर्थिक लाभांबद्दल माहिती करून घ्या, इतकेच नव्हे तर तेथील कार्यालयीन संस्कृती पाहून मगच आपला निर्णय पक्का करा. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. नाहीतर उगाचच पस्तावण्याची वेळ आपणावर येईल. त्याबरोबरच आत्ताची कंपनी सोडवायची असल्यास, सोडण्यापूर्वी वरील सगळे प्रकार पडताळून पाहिल्यानंतरच व स्वत:ची खात्री झाल्यानंतरच रितसर राजीनामा देवून ही कंपनी सोडून जा. पळपुटयासारखे पहिल्या कंपनीस न कळविताच व दुस-या कंपनीकडून ऑफर लेटर मिळाल्याशिवाय अगोदरची कंपनी सोडू नका. माझी आपणा सर्वस्वांस विनंती आहे की येती पांच वर्षे तरी ही कंपनी सोडू नका आणि  जो काय निर्णय घेणार असाल तो पांच वर्षानंतरच घ्या.
तर मित्रानो, तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे आणि माझे हे स्वप्न पुरे करणार ना?
अशाप्रकारे माझ्या चिरंजीवाना व त्याच्या मित्रांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या. त्यामुळे येथे आल्याचे समाधान मिळाले. इतकेच नव्हे तर वेळीच आपणास सावध करण्याची संधी मिळाल्याबद्दल मन:पूर्वक धन्यता वाटली.
आजचा कार्यक्रम होता चिरंजीवांच्या ऑफिस कॅम्पसला भेट देणे. त्यामुळे ११ वाजता बाहेर पडलो आणि बस आणि रिक्षा करीत कॅम्पसला पोहोचलो. परवानगीचे सोपस्कार पूर्ण करून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतील इमारती आणि आजूबाजूचे वातावरण पाहून मन एकदम खुष झाले. माझा भाचा तर एवढा खुष झाला की म्हणायला लागला की मला जर अशी कंपनी मिळाली असती तर मी ती कधी सोडलीच नसती. बाहेरील कंपन्यांमध्ये कसे प्रकार घडतात, कशाप्रकारे कामगारांना हाताळण्यात येते, कशाप्रकारचा त्रास असतो इत्यादिबद्दल तो ही के.पी.ओ. मध्ये कामाला असल्यामुळे त्यानेही थोडक्यात माहिती दिली.
अगोदरच म्हटल्याप्रमाणे येथील वातावरण फारच विलोभनीय होते. काय तो परिसर? काय त्या इमारती? काय ती रंगसंगती? सगळेच कसे, आपण कोठेतरी विदेशात असल्यासारखे वाटावे इतके सुंदर दृश्य होते ते. प्रशस्त रस्ते, लांबवर असलेल्या इमारती आणि त्या गाठण्यासाठी जागोजागी ठेवलेल्या सायकली. कोणतीही सायकल घ्या आणि चालू पडा आपल्या इप्सित स्थळी जाण्यासाठी.
चौकशी करता असे कळले की या कॅम्पसमध्ये जवळ जवळ १० हजारांवर कामगार आहेत. त्यांच्यासाठी आहे मोठे कॅफेटेरिया. एकावेळेस हजारो कामगार बसू शकतील अशी व्यवस्था केलेली. कॅफेटेरियाचे तीन भाग होते. जेवणाचे तसेच खाण्या-पिण्याचे निरनिराळे प्रकार उपलब्ध असल्यामुळे आपण एखाद्या स्टार हॉटेलमध्ये तर नाही ना बसलो आहोत, असा सतत भास होत होता. हे एकच कॅफेटेरिया नव्हते तर पुढे आणखीही अशाच प्रकारचे दुसरे कॅफेटेरिया देखील होते. तेही प्रशस्त होते.
एका इमारतीमध्ये स्टोरस् होते तसेच स्क्वाश कोर्ट, बॉलिंग अॅली, टेबल-टेनिस, स्वीमिंगसाठी स्वीमिंग पूल, आईसक्रीम पार्लर, केक शोप, व्यायाम  करणां-यासाठी ही मोठी जिम्नेशियम होती. तर दुस-या इमारतीमध्ये इंग्लिश पिक्चरमध्ये दाखवितात तसे कित्येक ऑटोमॅटीक मशिननी भरलेली कपडे धुण्यासाठी भली मोठी लोन्ड्री होती. येथे पूर्वी धुण्यासाठी टाकलेले कपडे ठेवून जाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे बरीच गर्दी असायची, परंतु आता आपण सकाळी कपडे तेथें धुण्यासाठी टाकून, घरी जाताना संध्याकाळी परत घेण्याची सोय केल्यामुळे तितकी गर्दी नसते. आणि ते सगळ्यांना सोयीस्कर देखील होते, त्यामुळे फक्त शनिवार, रविवारसाठी देखील थांबण्याची गरज भासत नाही.
अशाप्रकारे दोन तीन तास मजेत घालवून, मनसोक्त फिरून व येथील आठवणी मनात साठवून व तेथेच जेवण घेवून आम्ही नंतर तीनच्या सुमारास बाहेर पडलो ते मरीना बीचवर जाण्यासाठी. त्यासाठी ऑफिसच्या बाहेर येताच रिक्षा उभेच होते, त्यांतील एक रिक्षा पकडून तेथूनच पुढे ब-याच अंतरावर असणा-या परमूर या लोकल रेल्वेच्या स्टेशनात गेलो. येथून जवळ जवळ एक तासावर मरीना बीच होते. त्यामुळे भर दुपारी बीचवर नको म्हणून चेन्नई एगमोर या अलीकडच्या स्टेशनात उतरलो. तेथून रिक्षा पकडून आम्ही जवळच असलेल्या एक्सप्रेस अवेन्यू या मॉलमध्ये वेळ घालविण्यासाठी गेलो. तेथें थोडे फिरल्यावर तेथून मरीना बीचवर जाण्यासाठी बाहेर पडलो. रिक्षावाल्यास विचारणा केली असता ते काहीतरीच भाडे सांगू लागले. कोणी १०० रुपये सांगत होते, तर कोणी ८० रुपये सांगत होते. शेवटी एकजण ५० रुपयांना तयार झाला. हे सांगयचे कारण इतकेच की रिक्षावाले मग ते मुंबईमधील असोत किंवा चेन्नईमधील असोत, इथून तिथून सारखेच. ते प्रवाशांच्या अज्ञानाचा फायदा उठविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. रांगड्या भाषेत सांगायचे तर लुटायला बसलेत. आतमधील गल्यागल्या पार करून ज्यावेळेस रिक्षा मेन रोडवर आली त्यावेळेस कळले की अरे आपण तर चेन्नई सेंट्रल स्थानकापासून जवळच होतो व मरीना बीचही तेथून जवळच आहे.
रीक्षावाल्यांकडून दोन गोष्ठी समजल्या त्या म्हणजे मरीना बीचला दोन ठिकाणांवरून प्रवेश घेता येतो. एक म्हणजे युनिवरसिटी जवळील मार्गाने व दुसरा मार्ग म्हणजे गांधी मार्ग. ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे हे मरीना बीच आशियातील सगळ्यात मोठे असे बीच आहे. येथे बीचवर जाताना मला आपल्या गिरगाव चौपाटीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. बीचसमोरील रस्ता तसाच प्रशस्त. तशीच पोलिसांची वर्दळ. ठराविक जागेवरूनच रस्ता ओलांडून पलीकडे बीचवर जाण्यासाठी पोलिसांचे असलेले मार्गदर्शन इत्यादी इत्यादी. परंतु आपल्या चौपाटीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असणारी ही चौपाटी होय, तर चौपाटीसमोरील रस्ता हा गिरगाव चौपाटीपेक्षा कितीतरी लहान.
रस्ता ओलांडून बीचवरील वाळूवर पाय टाकला आणि जस जसे पुढे पुढे जायला लागलो, तस तसे जाणवू लागले की आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी बरेच चालावे लागणार आहे. पाणी तर दिसतच नव्हते. वाटले आणखी किती पुढे जायला लागणार आहे कोणास ठाऊक? परंतु आणखी थोडे अंतर चालून गेल्यावर पाणी दिसायला लागले आणि हुश्श वाटले. थोडेफार इकडे तिकडे भटकंती केली, फोटो काढलेत आणि परत परतीच्या मार्गाला लागलो, तेव्हा कळले की येथील पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री रामचंद्रन ह्यांच्या स्मरणार्थ एक स्थळ बाजूलाच उभारण्यात आलेले आहे, त्यामुळे तेथेही फेरफटका मारून शेवटी घरी परत जाण्यासाठी बाहेर पडलो. पुन्हा एकदा अडचण आली ती म्हणजे कोणती बस पकडायची? यावर उपाय म्हणून शेवटील तेथें उपस्थित पोलिसांनाच गाठले आणि त्यांच्याकडून बसची माहिती करून घेतली. त्याप्रमाणे बसमध्ये बसलो व परतीच्या प्रवासास सुरुवात केली. बस स्टोप सोडून बस पुढे सरकू लागली आणि थोड्याचवेळाने उजवीकडे वळली आणि पुन्हा एकदा आठवण झाली ती विल्सन कोलेजजवळील सिग्नलची. वाटले आपण गिरगाव चौपाटीजवळच असून विल्सन कोलेजला वळसा घालून चाललो आहोत.     
प्रवासास सुरुवात केल्याकेल्या एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील बोलीभाषा. या अगोदरच म्हटल्याप्रमाणे मुंबईहून येताना मनामध्ये जी सल होती ती म्हणजे येथे संवाद कसा साधावयाचा. असे ऐकून होतो की हे लोक (तमिळ) हिंदी येत असली तरी बोलत नाहीत आणि तमिळला पर्याय म्हणून फक्त कधी कधी इंग्रजी बोलतात. त्यामुळे यांच्याशी संवाद साधने कठीण होणार हे अगोदरच गृहीत धरले होते.
पण या माझ्या चेन्नई सफरीमुळे एक गोष्ट मला शिकता आली ती म्हणजे आपणाला ज्या मुलुखामध्ये जावयाचे आहे तेथील संपूर्ण भाषा आली नाही तरी चालेल, परंतु रोजच्या व्यवहारातले काही त्यांच्या बोलीभाषेतील शब्द येणे गरजेचे आहे.  उदाहरणच द्यावयाचे म्हणजे, येथे प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणालाही जर हाक मारावयाची असेल किंवा त्या व्यक्तीशी संवाद साधावयाचा असेल तर त्याला अण्णा म्हणून पुकारायचे. त्यामुळे झाले काय की त्या स्थानिक माणसाला असे वाटायचे की कोणीतरी त्यांचाच माणूस त्याला हाक मारतोय आणि त्यामुळे तो आपल्या हाकेला लगेच प्रतिसाद द्यायचा व दोन अनभिज्ञ माणसांमधील जो न दिसणारा असा आडपडदा होता तो आपोआप गळून पडायचा. संवादाला सुरुवात व्हायची. या गोष्टीचा परिणाम असा झाला की पुढील संपूर्ण प्रवासात आम्हाला भाषेमुळे होणारा त्रास तसा फारसा कोठेच झाला नाही. तसेच दुसरे एक पथ्य मी पाळले ते म्हणजे जर कोणाला काही विचारायचेच झाल्यास रस्त्यावरील ह्याला त्याला न विचारत बसता पोलीस गाठायचो आणि त्याला अगोदरच म्हटल्याप्रमाणे अण्णा म्हणून पुढील जें काही विचारायचे आहे ते इंग्रजीत विचारायचो. याचाच परिणाम असा झाला की प्रत्येक वेळेला मी जी जी  काही विचारणा केली ती फलद्रूप झाली. एखाद दूसरा प्रसंग सोडला तर मला कोठेच नकाराची घंटा ऐकायला मिळाली नाही. इतकेच नव्हे तर प्रवासात बसमध्येही काही प्रवाशांनी मला उत्तम प्रतिसाद दिला. बसस्टॅापची कल्पना दिली, कोठे उतरायचे ते सांगितले. एकंदरीत काय, मला अगोदरच गृहीत धरल्याप्रमाणे, कोठेही भाषेची अडचण जाणवली नाही. उलट असे वाटले की मी मुंबईतच फिरतो आहे.
दुसरी गोष्ट अशी जाणवली ती म्हणजे हा जो भाषेचा बागुलबोवा कित्येकांनी त्यांच्या बाबतीत उभा केलेला आहे, तो मुळी योग्य नाही असे माझे मत या दरम्यान झाले. त्याला कारण असे की ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा परमुलुखात जातो तेव्हा आपण नेहमीच अपेक्षा करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावे आणि त्यांनी तसे ते द्यावे यात काहीही वावगे नाही. परंतु आपण हे साफ विसरतो की जेवढी म्हणून आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, तेवढीच आपलीही जबाबदारी असते की आपणही त्यांच्यासमोर उभे ठाकल्यानंतर त्यांच्याही काही अपेक्षा आपणाकडून असतात, जशा त्यांना समजेल अशा बोलीभाषेत आपण त्यांच्याशी संवाद साधणे.
माझे हे उदारीकरणाचे गणित चुकतही असेल, परंतु माझे असे मत झाले की चेन्नई सारख्या शहरात थोडी शिकलेली, इंग्रजी शिकलेली माणसे भेटतीलही त्यामुळे माझ्या फॉरम्युलानुसार मला उत्तरे मिळालीत, संवाद साधता आला. परंतु जर का मी अगदी आतील गावाकडील भागामध्ये गेलो तर तेथें ती मला भेटतीलच असे नाही. तेथील स्थानिक कदाचित शिकलेले नसतीलही, त्यामुळे त्यांना त्यांच्या तमिळ भाषेव्यतिरिक्त इतर भाषा येत नसतील. मग अशावेळेस जर मी त्यांच्याकडून अपेक्षा केली की त्यांनी इंग्रजी बोलावे, तर ते साफ चुकीचे ठरेल. याचे उदाहरणच द्यावयाचे झाल्यास आपल्या महाराष्ट्र देशामध्येसुद्धा जर का आपण एखाद्या गावात गेलो, तर तेथील गावातील गावकरी माणसांना इंग्रजी कोठे येते? हिंदी कोठे येते? अशावेळी मी जर त्यांच्याशी संवाद इंग्रजी किंवा हिंदीमधून साधू लागलो, तर मला काय किंवा इतरांना काय उत्तरे मिळूच शकणार नाहीत. मग मी असे म्हणावे काय की मराठी माणसे जाणून-बुजून हिंदी किंवा इंग्रजी बोलत नाहीत. तर ते तसे नाही आहे. हा सगळा प्रश्न शिक्षणाचा आहे. हे जरी खरे असले तरी, मी जर का अगोदरच ज्या मुलुखात जाणार आहे त्या मुलुखाची तेथील बोलीभाषा अवगत करून गेलो तर मला वाटते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. जास्त नाही तरी पोटापुरता का होईना मी संवाद साधू शकेन. परंतु त्यासाठी मला तेथील बोलीभाषेमध्ये कशाप्रकारे एकाद्याला बोलाविले जाते याची कल्पना असावयास हवी. जसे, तमिळ भाषेमध्ये अण्णा म्हटल्यावर काम होते, तसे मराठी भाषेमध्ये भाऊ म्हटल्याने काम होते, तर गुजराती भाषेमध्ये भाय म्हणून काम करून घेता येते, तर इंग्रजी भाषेमध्ये ब्रदर म्हणून हाक मारता येते. अशाप्रकारे कामचलाऊ भाषा जर मी का थोडीशी शिकून घेतली, तर मला वाटते भाषेची अडचण टाळून मला पोटापुरता संवाद साधता येऊन माझे कार्य सुकर होईल आणि एकाद्या भाषेबद्दल आणि ती बोलणा-या माणसांबद्दल असे टोकाचे मत व्यक्त करण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू. 
मयुर तोंडवळकर ............9869704882

Sunday, January 29, 2012

माझी चेन्नई सफर.........!!!


दिवस पहिला आणि दुसरा -
माझा ज्येष्ट चिरंजीव अतुलच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी मुंबईबाहेर आणि पर्यायाने महाराष्ट्राबाहेर जाण्याचा योग आला, त्यामुळे ब-याच नव-नवीन गोष्टीना व  अनुभवांना सामोरे जाता आले.
माझ्याबरोबर माझा भाचा सूर्यकांत होता. छत्रपती शिवाजी टर्मीनसवरून दुपारी २.०० ची सी.एस.टी.-चेन्नई ट्रेन सुटली आणि त्याच क्षणापासून चेन्नई भेटीचे वेध सुरु झाले. ह्यापूर्वी पूर्वाश्रमीचे मद्रास आणि आताच्या तामिळनाडूबद्दल बरेच काही ऐकून होतो, त्यामुळे माझा चिरंजीव तेथे कसा राहत असेल आणि आता मी चाललो आहे तो तेथे कसा काय राहणार, ह्याबद्दल मनात जरा धाक-धुकच होती. परंतु माझा चिरंजीव सध्या राहत असलेल्या रूमवर राहावयाचे असल्याने रूमची शोधा-शोध मात्र करावी लागणार नव्हती.
माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते.
दुपारी ट्रेन सुटल्यानंतर रात्र होईपर्यंत भाच्याबरोबर इकडच्या-तिकडच्या गप्पा मारीत मारीत वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही. साधारणपणे ७.३० नंतर दौंड स्टेशन गेल्यानंतर काही पोलीस गाडीत आले व त्यांनी प्रत्येकाला आप-आपल्या बाजूला असणा-या खिडक्यांची बाहेरील बाजूस असणारी लोखंडी तावदाने बंद करून घेण्याचा सल्ला दिला. चौकशी करता असे समजले की मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून काही विघ्नसंतोषी समाजविघातक प्रवृत्तीचे लोक म्हणे गाडीवर दगडफेक करतात.
सूचना मिळताच सगळ्यांनी आपापली तावदाने भराभरा खाली ओढून घेतली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की मी जेथे बसलो होतो त्याच्या डाव्या हाताकडील ते लोखंडी तावदान काही केल्या बंद होत नव्हते. माझा जीव टांगणीला लागला होता. मनात वाटत होते की जर हे तावदान बंद झालेच नाही तर? आणि खरोखरच जर का दगडफेक झाली तर मग पुढे काय? ह्या भीतीने मी अर्धमेला झालो होतो, भाचाही धास्तावला होता. काय करावे काही सुचत नव्हते. त्या खिडकीवरील प्रवाशास तावदान बंद करण्यासाठी मदत करावी म्हणून उठलो खरा, परंतु कसले काय आणि कसले काय माझा प्रयत्नही थिटा पडला आणि ते तावदान काही बंद झाले नाही. मनात पुन्हा एकदा भीतीची पाल चुकचुकली. आता करायचे काय? हा विचार करीतच होतो तेवढ्यात त्या प्रवाशाचा मित्र जो बाजूला बसला होता तो उठून तेथे आला आणि त्याने ते तावदान बंद करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली. बरीच झटापट केल्यानंतर त्यात त्याला यश आले आणि एकदाची ती खिडकी बंद झाली. तोपर्यंत त्या कम्पार्टमेंटमधील सगळ्या खिडक्या बंद झाल्या होत्या. डाव्या हाताकडील ती सगळ्यांना कसरत करायला लावणारी खिडकी देखील बंद झाल्यामुळे जीवात जीव आला आणि निवांत झालो. एक सुटकेचा नि:श्वास टाकला आणि मनातल्या मनात भगवंताचे आभार मानीत पुढील प्रवासास सिद्ध झालो.
असाच थोडा वेळ गेला असेल नसेल पोलिसांनी दिलेली सूचना खरी ठरली. पहिलाच दगड जो आला तो नेमका जी खिडकी बंद होत नव्हती त्या माझ्या डाव्या हाताकडील खिडकीवरच आणि लागोपाट सगळीकडे दगडफेकीचे आवाज उमटू लागले. मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि विचार करू लागलो, जर का हि खिडकी बंद झाली नसती तर आम्हा प्रवाशांचे काय झाले असते? आठवण होवूनच पोटात गोळा आला. निश्चितच कोणीतरी ह्या गोष्टीला नक्कीच बळी पडला असता. त्यानंतर मनाने निश्चिंत झाल्यामुळे झोप केव्हा लागली हे कळलेच नाही आणि ह्या दरम्यान कर्नाटक राज्य केव्हा सोडले हे देखील समजले नाही. रात्रीच्या अंधारातच कर्नाटक पार करून आमच्या गाडीने सकाळी-सकाळी आंध्रप्रदेशामध्ये प्रवेश केला.
जरी रात्री दगडफेकीच्या प्रकारानंतर झोप लागली होती, तरी मधून मधून जाग येतच होती. सकाळी जेव्हा पूर्ण जाग आली तेव्हा कळले की आपण आंध्र प्रदेशामध्ये आहोत. आजूबाजूचा आपणास नवखा असलेला प्रदेश डोळ्याखालून घालू लागलो. हा आंध्रचा प्रवास जवळ जवळ आठ-नऊ तासांचा होता. रेल्वेच्या डब्ब्याच्या दोन्ही बाजूला दूरवर शेकडो एकर पसरलेली जमीन दृष्टीस पडत होती. काही जमिनींवर सूर्यफुलाची शेती केलेली होती त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाचे साम्राज्य पसरलेले दिसून येत होते तर काही ठिकाणी शेती न केलेली अशी जमीन लांबवर पसरलेली दिसत होती. काही ठिकाणी तर दोन्ही बाजूना मोठमोठाले दगडांचे डोंगर दिसत होते, तर काही जमिनी नुसत्या दगडांनी खच्चून भरलेल्या दिसून येत होत्या आणि त्याबरोबरच दोन्ही बाजूंना मोठमोठे सिमेंटचे कारखानेहि दिसून येत होते. त्यामुळे येथे अशाप्रकारचे सिमेंटचे कारखाने उदयास येण्यामागील रहस्य आपोआपच उलगडले गेले.
विशेष म्हणजे येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमच्या गाडीमध्ये बरीच माणसे ही मुंबई, पुणे व इतर महाराष्ट्रभरातून आलेली होती आणि ती सगळी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारी होती, त्यामुळे त्यांचाच भरणा अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत होते. त्यामानाने तामिळनाडूमध्ये जाणारी तमिळ माणसे हि कमी प्रमाणात दिसून आलीत.
अशाप्रकारे तासावर तास ढकलत आमचा प्रवास पुढे पुढे चालला होता, परंतु आंध्र प्रदेश संपण्याचे चिन्ह काही दिसत नव्हते. दुपारी दोन वाजता गाडी रेनुगुंटा स्थानकात प्रवेशती झाली आणि डब्ब्यातील ब-याच माणसांची उतरण्याची लगबग सुरु झाली. बरीच माणसे उतरताना पाहिल्यावर चौकशी केली तेव्हा असे कळले की ही सगळी तिरुपती  बालाजीच्या दर्शनाला जाणारी माणसे येथेच उतरतात. येथून जवळ जवळ अडीच-तीन तासांच्या प्रवासानंतर तिरुपती बालाजीला जाता येते, तर रेल्वेने तसेच पुढे गेले असता तीन तासांवर असणारे आमचे गंतव्य स्थान चेन्नईही गाठता येते. यावरून अंदाज आला तो म्हणजे चेन्नई हे जरी तामिळनाडूमध्ये असले तरी ते आंध्रप्रदेश व तामिळनाडूच्या सीमेवर आहे.
आमच्या गाडीने रेणूगुन्टा स्टेशन सोडल्यावर आणि आम्हाला हे कळल्यामुळे की चेन्नई आता तसे फार दूर नाही, आम्ही केव्हा एकदा चेन्नईला पोहचतो असे झाले. येथपर्यंत आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशी तीन राज्ये पार केली होती. नवीन प्रदेश पाहावयाचा होता, माझ्या चिरन्जीवाना आणि पर्यायाने त्याच्या मित्रांना भेटावयाचे होते, चिरंजीवांचे ऑफिस (इन्फोसिस, महिंद्र सिटी, चेन्नई) पहावयाचे होते, ऑफिस म्हणण्यापेक्षा ऑफिसचा कॅम्पस म्हणणे योग्य होईल कारण येथे कामगारांच्या नातेवाईकांना ऑफिसच्या आत प्रवेश दिला जात नाही, तर फक्त कॅम्पस डोळ्याखालून घालण्याची परवानगी देण्यात येते. चिरन्जीवाना अगोदरच कल्पना दिली गेली असल्यामुळे आम्हाला स्टेशनवरून घेवून जाण्यासाठी ते स्टेशनला येणार होते आणि तो क्षण आला. आम्ही दोघे, मी आणि माझा भाचा, गाडी चेन्नईला थांबल्यावर गाडीतून उतरलो आणि मेन गेटजवळ येऊन थांबलो. तेथेच चिरंजीव येणार होते. फोनवरून त्याला आम्ही उतरल्याचे कळविल्यावर तो पंधरा मिनिटातच तेथे पोहचला. स्टेशनच्या बाहेरच बसेस मिळत असल्यामुळे धावतच एका ए.सी. बसपाशी जाऊन चौकशी केल्यावर ती आमच्या राहण्याच्या ठिकाणच्या बाजूलाच जात असल्याचे कळल्यामुळे त्यामध्ये बसलो.
तसे पाहिले तर चेन्नई स्टेशन ते चिरंजीवांचे राहण्याचे ठिकाण उरपक्कम् मधील देश अपार्टमेंट, जे हायवेवरच आहे, अंतर जवळ जवळ एक-दीड तासांचे होते, परंतु संध्याकाळची वेळ असल्यामुळे मुंबईसारखेच सर्वत्र ट्रॅफिक जाम होत होते, त्यामुळे हा प्रवास अडीच-तीन तासांवर लांबला. घरी पोहचता पोहचता रात्रीचे ७.३० वाजले. ह्या दरम्यान थोडेसे चेन्नईचे दर्शन घेता आले, परंतु जानेवारी महिना असल्यामुळे व दिवस छोटा असल्यामुळे लवकरच काळोखाचे साम्राज्य पसरू लागले. एकंदरीतच हा माझा प्रवास गुरुवारी दुपारी २.३० वाजता जो सुरु झाला होता तो शुक्रवारी रात्री ७.३० वाजता संपला, म्हणजेच साधारणपणे २९ ते ३० तासानंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो. गाडीतच दिवस गेल्यामुळे पहिल्या प्रथम आंघोळ वगैरे विधी आटोपून आम्ही जेवणासाठी पुन्हा खाली उतरलो. जेवून आल्यावर माझ्या चिरंजीवांचे रूमवरचे मित्रही आलेत, त्यांना भेटून झोपी गेलो.        
पुढे चालू........२.........

Friday, December 23, 2011

घसरगुंडी

घसरगुंडी

मध्य रेल्वेची झाली घसरगुंडी,
त्यामुळे चाकरमान्यांची झाली कोंडीच कोंडी............

सकाळचा हा प्रहर नउचा,
सगल्यांची असते घाई गडबड
चाकरमानी ऑफिसात पोहचण्यासाठी
करू लागले जीवाची धडपड...........

धडपड करून सुद्धा,
नाही आले काही हाती,
पडायचा तो पडला लेट मार्क
सह्यांच्या वह्यान्वरती .................

मयुर तोंडवळकर...........9869704882

संवाद.........!!!

संवाद.........!!!
लिहिता नाही आले, वाचता नाही आले,
तरी वाटले असे काही तरी करून जावे,
पाहणा-यांच्या डोळ्यांचे,
पाहताच पारणे फिटावे........

हे चित्र नव्हे,
तर हि आहे भाषा अन्तरिची,
संवाद साधण्यासाठी
गरज नसे भाषेची..............

न बोलता, न लिहिता,
हि साधते संधान अंतराशी,
एक चित्र पाहोनी आपोआप,
संवाद घडतो इतरांशी.........

एक चित्र ते काय, एक चित्र ते काय,
डोळ्यांसमोर ते दिसू लागता,
भडभडा बोलू लागते,
भाषा सगळ्यांच्या मनीची..............
मयुर तोंडवळकर – 9869704882

Thursday, March 3, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-6)



आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मूनिन्बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग, या अशा आसनाच्या सेवेक-याची पटली कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलीयुगात असले तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत, मग आपल्या विचारांची गती, विशालता उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, “आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे.” त्यांनीच पुढे संदेश दिले, “तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ”. तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो अशा मानवाची जार तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ट नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का? आमचे संदेशच असे आहेत, “सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल, तर तू कसा बरे मला पाहू शकशील. मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”
असा दृढ:निश्चयी भक्त असेल, त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणव वेदही प्रगट होतो.
हे जे स्थान आहे, ते सत् पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही, ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत. तेथे ऋद्धी-सिद्धी नाही. तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग आहे – तो म्हणजे नामस्मरण ! ध्यान धारणा अन् मन सत् चरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ती केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या ठिकाणीच अनंतांचा वास आहे. त्या ठिकाणीच अष्ट सिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ओम्कारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे? ज्या ओम्कारांच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेक-याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा ! पण आपण एवढेच म्हणायचे, “अनंता ! मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथे जवळच असते पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जार पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणव वेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे तिच्या बरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत् सान्निध्यात आहेत. सूक्ष्म त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामीनी म्हटले आहे, “वाजे पावूल अपुले, म्हणे मागोती कोण आले?”
जेथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च त-हा असणार पण जेथे श्रीहरीचे स्थान तेथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो भक्त आहे.

समाप्त .....................

Tuesday, March 1, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-5)



समजा पाचवा प्रणव वेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरू दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होवू शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थूलत वास करणारे तत्व तुमच्या बरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सातचे सत् चरण तुम्ही पाहणार आहात, ते तत्व! मनाला जाणीव देवून मनाला हलविते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जान असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताला सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत. तू आणि सत् एकच आहेत. कवचात तूही आहेस अन् कवचात सत्, मी देखील आहे. आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याच्या प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंच महाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देवून कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुनांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलत कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे का? मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, सेवेकरनीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्च्यर्या केली? आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होवू लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, “लाघव करण्यासाठी चैत्यन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या, चैत्यन्याला त्यांनीच निर्माण केले, आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यानीच बहाल केलेत अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच ! जन्माला त्यानीच पाठविले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेतांना आपणही स्थिर आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतीना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्या कडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे. आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुध्द शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरू कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्ष हे देणार नाहीत. क्रमश:पुढेचालू ........................(५)

Friday, February 25, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-4)
पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Sunday, February 20, 2011

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

MAYUR TONDWALKAR: पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-3)



पाचवा प्रणव वेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जार सद्गुरुमय बनला, मग वेगळे काय शिल्लक राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरू मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरू म्हणतात, त्याली मी माझ्या वेगळा का ठेवू? जे मन सातावेगले दुसरे काही पाहत नाही मग ते सातपासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या वेदाचा घाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत् चरण मिळवावयाचे असतील तर सत् चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कालीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, “सत् युगात जसा कस होता तसा कस आता घ्यावयाचा नाही.” पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसत उतरत नाहीत. फक्त म्हणतात, “सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही.” लक्षात घ्या सेवेक-यानो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, “मन ते मजपासोनी जाण”. मन माझ्यावेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणव वेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा. पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन अम्हप्रात लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो, मन सत् मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणव वेद पाहता येणार नाही. क्रमश: पुढे चालू ........................(४)

Saturday, February 19, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-2)



नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानन्दाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनन्तांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ओम् कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यान धारणेकरिता आसन आहे. अर्थात ध्यान धारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच काम नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील, पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशा त-हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी ऊर्ध्वतेणे वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणव वेद प्रगत होणारच. पण पाचवा प्रणव वेद प्रगत होण्यासाठी सद्गुरू दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरू दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरू दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी.
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होवून गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता महान महान ऋषी-मुनी होवून गेले. पण प्रत्येक जण आपापल्या पायरीप्रमाणे राहणार. संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आध्य कर्तव्य आहे. आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशय युग आहे. मन चलबिचल होते, द्विधा होते. लक्षात घ्या, तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही देणे घेणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरू! आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्या नंतर तुम्ही कधीही अनंतांपासून दूर जाणार नाही. क्रमश:पुढे चालू ........................(३)

Saturday, January 22, 2011

पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)..............1


पाचवा प्रणव वेद (भाग पहिला)
पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होतो? तर तो आपणास ज्ञान मार्गामुळे मिळतो. स्वयं प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञान मार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद् गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरुंशी बोलणे, चालणे होवू लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला. जरी पाचवा प्रणव वेद प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालवायची आहे. प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकारस्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगत झाला असे म्हणता येईल.

मग अशी ज्योत सद्गुरू सान्निध्याने कुठेही जावू शकते. सद्गुरू सान्निध्या शिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे, हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणव वेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेवू शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही. पाचवा प्रणव वेद सुरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूंना संदेश आपण पहातो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सुक्ष्माने कुठेही आदेशानुसार जावून येते की नाही?
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्याखेरीज ही जी देवाण-घेवाणीची त-हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची त-हा साध्य होणार नाही, साध्य होवू शकणार नाही. पण पाचवा प्रणव वेद सिद्ध होण्यासाठी, सापडण्यासाठी भक्ताने वा सेवेक-याने काय केले पाहिजे? तर नामस्मरण केले पाहिजे. मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण तर करतोच आहे. आम्ही नाही असे म्हणत नाही. पण नामस्मरण कसे केले पाहिजे? क्रमश:पुढे चालू ........................(२)

Friday, December 3, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

धन संपत्तीत देखील फरक आहे. एक सात्विक संपत्ती आणि एक अघोर संपत्ती. कष्ठ करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जीत प्राप्त झाली ती सत संपत्ती. परंतू इतरांना त्रास देवून, खोटे बोलून, विश्वासघात करून, प्राप्त झाली ती अघोर संपत्ती. सात्विक संपत्तीला विचार असतो. अघोर संपत्तीला विचार कोठला ? अघोर संपत्ती कमविणारे अघोर अविचाराने पाहणार. कितीही अघोर संपत्ती एकाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार. परंतू भक्ती मार्गाने जाणारे, सत संपत्तीचा संचय करणा-यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार. सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्तीला पुरवणी नसते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतू सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी.
ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असू द्यावे समाधान !!
आपले सद्गुरू जे आपल्याला सांगत असतात त्यांची छानणी करणे, उजळणी करणे, प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरुंनी सांगितलेली एखादी गोष्ठ लक्षात आली नाही तर समजावून सांगतील. परंतू तुम्ही भक्तीची चाकोरी सोडू नका. एक अखंड नाम हि महान चित् शक्ती आहे. भक्ती आणि तपोभूमी यांची तुलना होवू शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ट आहे. सतयुगापासून ज्योतींना अदृश्य त-हेने सत सान्निध्य मिळवावयाचे आहे. प्रत्येक सेवेक-याने याकरिता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंताना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.

समाप्त ..........

Wednesday, December 1, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात. शैवाणी तिला आत नेवून ठेवले. तिची भक्ती श्रेष्ट होती, तिची तप:स्च्यर्या खूप ! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलून काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू, या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला.
भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम ! महान चैतन्य शक्ती, चित् शक्ती म्हणजेच अखंड नाम. या नामाच्या जोरावर या अघोरांचा नाश केला. अनंताचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ, भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तीचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत. सद्गुरुना बनविणे उपयोगाचे नाही. या सर्वस्वांची नोंद होते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही. ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल? सद्गुरुना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरुंनी त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात, अरे या मानवी सेवेक-याने किती जन्म घेतले आहेत अन आता जर तो पुन्हा अनाठायी गेला, तर कुठे व कसा भात्केल हे सांगता येत नाही. हि चिंता सद्गुरुना असते. किती श्रेष्ठत्व आहे, हे लक्ष्यात घ्या. ते क्षणीक पाहत नाहीत.
“तूरत् दान महापुण्यम” नाही. पुढे हि ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरुना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेक-यांची कशी प्रगती होईल? म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात. भक्तीनेच सेवेकरी पुढे जावू शकेल. स्वत:ची प्रगती साधू शकेल. तप:स्च्यर्येने अनंतना प्राप्त करून घेवू म्हणाल तर कितीही जन्म घेवून देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतू भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल. पाहू शकाल.


पुढे चालू..........6

Friday, November 26, 2010

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला).....5


म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नाश / नि:प्पात kकरता आला. या सर्वस्वांचे मुळ कोणते तर भक्ती ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतू आजच्या कलियुगी मानवाना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही. तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामानसात रहा अन जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा. अन मला डोळे भरून पहा. अन हे दोघांचे एकदा समीकरण केलेत कि पाचवा प्रणव प्रगत होईल. अन एकदा का पाचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तीने लावला. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राज मार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !
गुरुदेव कसे आहेत? तर अत्यंत लीन अन् अफाट शक्ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे. भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य या त्रिभुवनात कोणाकडे नाही. या नामाचा नाश हे तपस्वी देखील करू शकणार नाहीत. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नाम् रहित ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहित तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहित ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त ! अहंकार षड् रिपू  रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.
भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अखंड चित् शक्ती आहे.
या एका नामावर त्रिभुवन तरलेले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतू कलियुगी मानवाना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र वेळ मिळतो, परंतू नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. सेवेक-यानो ! किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, दिवसातला तुमचा वेळ किती फुकट जातो.” 

जाते घडी हि अपुली साधा ! काय करता करा !!
आजचा दिवस गेला उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे, अन प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची मर्यादा किती आहे? मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमविता येत नाही. नामाच्या या महान चित् शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला. तीच चित् शक्ती तुम्हाला बहाल केली आहे. ध्यान करा, नामस्मरण करा अन तीच चित् शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ती. सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सातच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे, कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकारणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंताची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाहीत. आपण जाणताच कि अघोर ज्योती सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्य नाश केलेल्या ज्योतीना वर काढत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधन टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येइना.
आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर अघोरानी. परंतू शेवटी विजय कोणाचा तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे. वृंदा वर्तुळात जावून राहिली सताच्या वर्तुळात शैvaniवाणी तिला आत नेवून ठेविले होते. तिची भक्ती श्रेष्ठ होती, तिची तप:स्च्यर्या खूप! पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार प्राप्त झाले होते. त्रीगुनाना देखील या अघोरानि हाकलुन काढले होते. कलीयुगात या अघोरानी अशी त-हा करून ठेवली होती. परंतू या सर्वांचा नाश भक्तीच्या अंगानेच केला. आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणे? तर अघोरांनी. परंतू शेवटी विजय कोणाचा ? तर सताचा ! भक्तीचाच विजय आहे.

पुढे चालू..........5

Wednesday, November 24, 2010

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

MAYUR TONDWALKAR: सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

सत् भक्तीचे स्वरूप (भाग पहिला) परम पूज्य श्री सद् गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नत मस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती? असे ते गुरुदेव पितामह ! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ठ यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगीनींचा छळ करायला निघाला, ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! ब्रम्ह म्हणजे सर्व व्यापक आहे. ते ब्रह्म. अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट आणि गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरानि कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र – मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ असेल, तरी देखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्याचे काही चालत नाही. चालणारहि नाही. भक्ती म्हणजे काय, एकच नामस्मरण ! अन सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती !!

हि भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ती कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या तीस वर्षात जी काही कर्तव्ये या आसना कडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो कि भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महा बलाढय चालत नसे. ह्या अघोरणी सर्व काही प्राप्त करून घेतले होते. तरीदेखील तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती कि अघोर तप:श्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ. एकाच नामाच्या जोरावर चालणारी हि भक्ती ! अघोरांकडे मात्र अनेक त-हा, मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे? तर सताचे !


पुढे चालू..........

अनगडवाणी